Multibagger Stock | टाटांच्या या दोन छुप्या रुस्तम शेअर्सनी गुंतवणुकदारांना केले श्रीमंत, तुम्हाला माहित आहेत का?

Investment in Multibagger stock : शेअर बाजारात कमाईच्या अनेक संधी मिळत असतात. चांगल्या प्रसिद्ध कंपन्यांचे शेअर्स कमाई करून देतातच. मात्र अनेकवेळा फारशा प्रसिद्ध नसणाऱ्या शेअर्समधूनदेखील गुंतवणुकदारांना छप्परफाड परतावा मिळत असतो. मागील वर्षभरात असे अनेक मल्टीबॅगर शेअर्स दिसले आहेत ज्यांनी गुंतवणुकदारांना तुफान कमाई करून दिली आहे. टाटा समूहाच्या अशा दोन शेअर्सबद्दल जाणून घेऊया जे फारसे लोकप्रिय नाहीत. मात्र परताव्याच्या बाबतीत ते सुपरहिट आहेत.

Multibagger Stock
मल्टीबॅगर शेअर 
थोडं पण कामाचं
  • अनेकवेळा फारशा प्रसिद्ध नसणाऱ्या शेअर्समधूनदेखील गुंतवणुकदारांना छप्परफाड परतावा मिळतो
  • टाटा समूहाच्या फारसे प्रसिद्ध नसणाऱ्या दोन कंपन्यांच्या शेअर्सनी गुंतवणुकदारांना दिला 10 पट परतावा
  • 12 महिन्यात 1 लाख रुपयांच्या गुंतवणुकीचे झाले 10 लाख रुपये

Multibagger Stocks of Tata Group : मुंबई : शेअर बाजारात (Share Market)कमाईच्या अनेक संधी मिळत असतात. चांगल्या प्रसिद्ध कंपन्यांचे शेअर्स कमाई करून देतातच. मात्र अनेकवेळा फारशा प्रसिद्ध नसणाऱ्या शेअर्समधूनदेखील गुंतवणुकदारांना छप्परफाड परतावा मिळत असतो. मागील वर्षभरात असे अनेक मल्टीबॅगर शेअर्स (Multibagger Stock) दिसले आहेत ज्यांनी गुंतवणुकदारांना तुफान कमाई करून दिली आहे. एरवी शेअर बाजारातील गुंतवणूकदार टाटा समूहातील (Tata Group) कंपन्यांमध्ये गुंतवणुकीच्या संधी शोधत राहतात. टाटा समूहाच्या अशा दोन शेअर्सबद्दल जाणून घेऊया जे फारसे लोकप्रिय नाहीत. मात्र परताव्याच्या बाबतीत ते सुपरहिट आहेत. हे दोन भन्नाट शेअर्स म्हणजे ऑटोमोटिव्ह स्टॅम्पिंग अँड असेंबली (Automotive Stamping And Assemblies Limited) आणि टाटा टिनप्लेट (Tata Tinplate). त्यांच्याबद्दल सविस्तर जाणून घेऊया...(These two Tata group Multibagger stocks gave 10 fold returns to investors)

1. ऑटोमोटिव्ह स्टॅम्पिंग आणि असेंब्ली लि.च्या शेअरची किंमत (Share price of Automotive Stamping And Assemblies Limited)

टाटा समूहाच्या कमी लोकप्रिय असलेल्या हा  शेअर गेल्या एका वर्षात 910 टक्क्यांहून अधिक वाढला आहे. ऑटोमोटिव्ह स्टॅम्पिंग आणि असेंब्ली शेअर एका वर्षापूर्वी 12 मार्च 2021 रोजी  37.50 रुपयांना उपलब्ध होता. तर 11 मार्च 2022 ला या शेअर्सची किंमत वाढून 378.80 रुपये प्रति शेअर इतकी झाली आहे. या कालावधीत या समभागाने 910.13% पर्यंत परतावा दिला आहे. गेल्या 6 महिन्यांत कंपनीचे शेअर्स 56.70 रुपयांवरून 378.80 रुपयांपर्यंत वाढले आहेत. या कालावधीत या समभागाने 568.08% चा परतावा दिला आहे. म्हणजेच, जर एखाद्या गुंतवणूकदाराने या कंपनीवर वर्षभरापूर्वी म्हणजे 12 महिन्यांपूर्वी यात 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती तर आज त्या गुंतवणुकीचे मूल्य जवळपास 10.10 लाख रुपयांपेक्षा जास्त झाले असते. त्याच वेळी, सहा महिन्यांत 1 लाख रुपयांची गुंतवणूक 6.68 लाख रुपये झाली असती.

कंपनीचा व्यवसाय 

ही ऑटो उपकंपनी प्रामुख्याने टाटा मोटर्ससाठी प्रवासी आणि व्यावसायिक वाहनांसाठी शीट-मेटल स्टॅम्पिंग, वेल्डेड असेंब्ली आणि मॉड्यूल्स तयार करते. याशिवाय, कंपनी आपली उत्पादने जनरल मोटर्स इंडिया, फियाट इंडिया, पियाजिओ व्हेइकल्स, अशोक लेलँड, जेसीबी, टाटा हिटाची आणि एमजी मोटर्स सारख्या टॉप ऑटोमोबाईल कंपन्यांना विकते.

2. टाटा टिनप्लेट म्हणजेच द टिनप्लेट कंपनी ऑफ इंडिया लि.च्या शेअरचा ट्रेंड (Share Price of Tata Tinplate) (The Tinplate Company of India Limited)

टाटा टिनप्लेटचा शेअर एका वर्षापूर्वी १८ मार्च २०२१ रोजी १५६.२० रुपयांवर होता. तर ११ मार्च २०२२ रोजी तो ३६८.३५ रुपयांवर पोचला होता. सरलेल्या आठवड्यात या समभागाने 9% पर्यंत उसळी मारली. या काळात या समभागाने 135.82% चा मजबूत परतावा दिला आहे. पाच वर्षांत हा जबरदस्त शेअर 81.40 रुपये प्रति शेअरच्या पातळीवरून 368.35 रु. पर्यंत वाढला आहे. यादरम्यान त्याने 352.52% परतावा दिला आहे. या वर्षी या शेअरमध्ये 33% वाढ झाली आहे. म्हणजेच, जर एखाद्या गुंतवणूकदाराने वर्षभरापूर्वी या शेअरमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते, तर त्याचे मूल्य 2.35 लाख रुपये झाले असते. त्याच वेळी पाच वर्षापूर्वी या शेअरमध्ये गुंतवलेल्या 1 लाख रुपयांचे मूल्य आज जवळपास 4.52 लाख रुपये झाले असते.

कंपनी काय करते?

टिनप्लेट कंपनी ऑफ इंडिया (TCIL) ही टिनप्लेटची सर्वात मोठी उत्पादक आहे. TCIL, देशातील पहिली टिनप्लेट उत्पादक कंपनी असून कंपनीची स्थापना 1920 मध्ये झाली होती. ही कंपनी कट शीट आणि कॉइल फॉर्म, टिनप्लेट आणि शीट फॉर्ममध्ये टिन फ्री स्टील (TFS) ऑफर करते. टिनप्लेट कंपनीची दोन मुख्य उत्पादने टिनप्लेट आणि टीएफएस आहेत, जी प्रक्रिया केलेल्या अन्नाच्या पॅकेजिंगमध्ये काम करतात. याव्यतिरिक्त, कंपनी खाद्यतेल, पेंट आणि कीटकनाशके, बॅटरी आणि एरोसोल आणि बॉटल क्राउन उत्पादकांसह उद्योगांची लार्जचेन सेवा पुरवते. भारतातील टिनप्लेट कंपनी ही टाटा स्टीलची उपकंपनी आहे. कंपनीत टाटा स्टीलचा 74.96% हिस्सा आहे.


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी