Children Adhar Card : मुलांचं आधार कार्ड बनवताना या गोष्टी विसरू नका, अन्यथा भविष्यात होईल डोकेदुखी

आधार कार्ड ही प्रत्येक भारतीयाची गरज बनली आहे. लहान मुलांचं आधारकार्ड तयार करताना काही मूलभूत गोष्टींची काळजी घेतली, तर भविष्यात कुठलाच त्रास होणार नाही.

Children Adhar Card
मुलांचं आधार कार्ड बनवताना या गोष्टी विसरू नका  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • लहानांपासून मोठ्यांना आधार कार्ड आवश्यक
  • लहान मुलांचं आधार कार्ड असतं वेगळं
  • आधार कार्डसाठी अर्ज करताना घ्या ही काळजी

Children Adhar Card | आधार कार्ड हा प्रत्येक भारतीयाच्या ओळखीचा पुरावा झाला आहे. बँकेत खातं सुरु करायचं असो किंवा ड्रायव्हिंग लायसन्स काढायचं असो, आधार कार्डशिवाय काहीच होऊ शकत नाही. अगदी शाळेत प्रवेश घेण्यापासून कुठलाही सरकारी दस्तावेज मिळवण्यासाठी आधार कार्डाची गरज लागतेच. आधार कार्ड नसेल तर अनेक सरकारी कामंही अडकून पडतात. अर्थात, सध्याच्या डिजिटल जमान्यात आधार कार्ड बनवणं ही काही फारशी अवघड गोष्ट राहिलेली नाही. सध्या जवळपास प्रत्येक शहरात आणि गावात आधार केंद्र सुरू झालं आहे. 

मुलांच्या आधार कार्डचं वेगळेपण

प्रौढ व्यक्ती आणि लहान मुलांच्या आधारकार्डात काही मुलभूत फरक असतात. लहान मुलांचं आधारकार्डही तयार करता येतं. लहान मुलांच्या आधार कार्डाचा रंग निळा असतो. या आधार कार्डात मुलांच्या बोटांचे ठसे आणि रेटिनाचे स्कॅन घेतले जात नाहीत. या दोन्ही बाबींची नोंद वयाच्या पाचव्या वर्षानंतर करण्यात येते. पाच वर्षांपेक्षा कमी वयाचे असताना तयार केलेल्या आधार कार्डमध्ये पाच वर्षे पूर्ण झाल्यावर बाकीचे अपडेट्स भरणं अपेक्षित असतं. 

या गोष्टींची घ्या काळजी

मुलांचं आधार कार्ड तयार करणं जितकं गरजेचं आहे, त्यापेक्षा अधिक महत्त्वाचं आहे ते त्यात योग्य माहिती योग्य प्रकारे भरणं. जर एखादी माहिती चुकीची भरण्यात आली, तर ती दुरुस्त करण्यासाठी मोठा मनस्ताप आणि व्याप तुम्हाला सहन करावा लागू शकतो. त्यासाठी अगदी छोटेमोठे तपशील भरतानाही सावध राहणं आणि योग्य तेच तपशील भरणं गरजेचं आहे. त्यासाठी या गोष्टींची काळजी घ्या.

नाव

मुलाचं नाव आणि आडनाव या गोष्टी लिहिताना त्याचं स्पेलिंग तपासून घ्या. स्पेलिंगमध्ये झालेली थोडीशी चूकही महागात पडू शकते. ही चूक नंतर लक्षात आली तर ती दुरुस्त करण्यासाठी बराचसा वेळ आणि ऊर्जा खर्च करावी लागते.

अधिक वाचा - Nupur Sharma Controversy : नुपूर शर्मा चुकल्याच, पण त्यावरून होणारा हिंसाचार सर्वस्वी चुकीचा! मुख्तार अब्बास नक्वीचं रोखठोक मत

आईवडिलांचं नाव

आधार कार्डवर आई आणि वडिलांचं नाव योग्य प्रकारे लिहिलेलं असणं गरजेचं आहे. आई किंवा वडील यापैकी कुणा एकाच्या नावात चूक झाली तरी गडबड होऊ शकते. या प्रकारच्या चुका सर्वाधिक प्रमाणात होत असल्याचं दिसून आलं आहे. 

अधिक वाचा - United Nations: लेफ्टनंट जनरल मोहन सुब्रह्मण्यम दक्षिण सुदानमध्ये शांती सेनेचे कमांडर

योग्य पत्ता

मुलाच्या आधार कार्डवरील पत्ता नीट भरा. साधारणतः वडिलांच्या आधार कार्डवर असणारा पत्ताच मुलाच्या आधार कार्डसाठी भरला जातो. त्यासाठी वडिलांचे डॉक्युमेंट्स मागितले जातात. मात्र तरीही कॉम्प्युटरवर भरलेली माहिती सबमिट करण्यापूर्वी एकदा सर्व तपशील योग्य प्रकारे भरले आहेत का, याची खातरजमा करून घेणं गरजेचं आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी