मुंबईतील 'या' भागात सर्वात महागडी घरं, १ स्क्वेअर फूट किंमत ऐकून तुम्हीही व्हाल थक्क! 

काम-धंदा
Updated Sep 09, 2019 | 17:49 IST

भारतात सगळ्यात महागडी घरं ही मुंबईत आहे. त्यामुळे येथे जमिनीला अक्षरश: सोन्याचा भाव आला आहे. जाणून घ्या मुंबईत सर्वात महागडी घरं कुठे आहेत.

Mumbai
मुंबईतील 'या' भागात सर्वात महागडी घरं, १ स्क्वेअर फूट किंमत ऐकून तुम्हीही व्हाल थक्क!  |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

  • देशातील सर्वात महागडी घरं मुंबईत
  • मुंबईतील ताडदेव परिसर सर्वात महागडा
  • पाहा देशातील महागड्या घरांची यादी

मुंबई: मुंबईत राहणं हे सध्या फारच महागडं झालं आहे. त्यात मुंबईत घर घेणं हे तर आज सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेलं आहे. मुंबईत घरं घेणं हे आज एक प्रकराचं स्वप्न होऊन बसलं आहे. विशेषत: दक्षिण मुंबईत. आज देशातील सर्वात महागडा परिसर हा दक्षिण मुंबईतील ताडदेव हा परिसर समजला जातो. कारण येथे एका घराच्या चौरस फूटाची किंमत ही तब्बल ५६ हजार रुपये एवढी प्रचंड आहे. रिअल इस्टेटबाबत माहिती देणाऱ्या एनरॉक कंपनीने ही माहिती दिली आहे.

एनरॉकच्या मते, ताडदेवनंतर वरळी आणि महालक्ष्मी या परिसरात देखील घरांच्या किंमती प्रचंड आहेत. वरळीमध्ये एका स्क्वेअर फूटची किंमत ही ४१.५०० रुपये आहे तर महालक्ष्मीमध्ये ४० हजार रुपये स्क्वेअर फूट किंमत आहे. एनरॉक या कंपनीने देशातील १० सगळ्यात महागड्या ठिकाणांची यादी तयार केली आहे. ज्यामध्ये मुंबईचा क्रमांक हा पहिला आहे. मुंबईत घरांच्या किंमती एवढ्या वाढल्या आहेत की, दोन स्क्वेअर फूटच्या किंमतीत दुसऱ्या एखाद्या ठिकाणी आपण जमिनीचा एखादा तुकडा खरेदी करु शकता. 

एनरॉक कंपनीचे अध्यक्ष अनुज पुरी यांनी याबाबत माहिती देताना असं सांगितलं की, ५६,२०० रुपये प्रति स्क्वेअर फूट किंमत असलेल्या ताडदेवने या यादीत पहिला क्रमांक मिळवला आहे. तर चेन्नईच्या नुंगमबक्कम येथे १८ हजार रुपये स्क्वेअर फूट असा दर आहे. त्यामुळे या यादीत ते चौथ्या स्थानी आहे. तर १५,१०० स्क्वेअर फूटसह एगमोर हे पाचव्या स्थानी आहे. तर चेन्नईमधीलच अन्ना नगर हे १३ हजार रुपये स्क्वेअर फूटसह सातव्या स्थानी आहे. 

दुसरीकडे राजधानी दिल्लीमधील काही ठिकाणी घरांच्या किंमती या प्रचंड जास्त आहे. दिल्लीतील करोलबाग येथे घरांच्या किंमती या १३,५०० रुपये प्रति स्क्वेअर फूट आहेत. त्यामुळे एनरॉकच्या यादीत करोलबाग हे सध्या सहाव्या स्थानी आहे. दुसरीकडे गुरुग्रामच्या गोल्फ कोर्स रोडवर १२,५०० रुपये स्क्वेअर फूट दर असून ते नवव्या स्थानी आहे. तर पुण्यातील कोरेगाव आणि कोलकातामधील अलीपूर येथे अनुक्रमे १२,५०० रुपये आणि ११,८०० रुपये प्रति स्क्वेअर फूट दर असून हे अनुक्रमे आठव्या आणि दहाव्या स्थानी आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...