Costly Fruit | हे फळझाड बनवेल करोडपती, पाहा कशी लावायची बाग आणि किती आहे किंमत

Costly Fruit & earning opportunity | सध्या नैसर्गिक शेतीतून तयार होणाऱ्या शेतमाला, फळांना (Fruits) प्रचंड मागणी आहे आणि शिवाय त्याला चांगली किंमतदेखील मिळते आहे. त्यामुळे अनेकांना यात कमाईची संधी दिसते आहे. उत्पन्नाची चांगली संधी (Earning opportunity)दिसत असल्यामुळे अनेक लोक नैसर्गिक शेतीकडे वळत आहेत. एक खास प्रकारचा आंबा आहे. भारतात काही मोजक्याच लोकांनी याची लागवड केली आहे.

costliest fruit
दणदणीत कमाई करून देणारे फळ 
थोडं पण कामाचं
  • हे झाड तुम्हाला करोडपती बनवू शकते
  • पाहा याची बाग कशी बनवायची
  • एकाच सीझनमध्ये कोट्यवधी रुपये

Costly Fruit | नवी दिल्ली :  अलीकडच्या काळात लोक नैसर्गिक शेती किंवा ऑर्गेनिक फार्मिंगकडे (Organic Farming) वळताना दिसत आहेत. कारण सध्या नैसर्गिक शेतीतून तयार होणाऱ्या शेतमाला, फळांना (Fruits) प्रचंड मागणी आहे आणि शिवाय त्याला चांगली किंमतदेखील मिळते आहे. त्यामुळे अनेकांना यात कमाईची संधी दिसते आहे. उत्पन्नाची चांगली संधी (Earning opportunity)दिसत असल्यामुळे अनेक लोक नैसर्गिक शेतीकडे वळत आहेत. यात काही झाडे किंवा पीके अशीदेखील आहेत जी तुम्हाला कोट्यवधींची कमाई करून देऊ शकतात. एखादा चांगला सीझन तुमचे आयुष्यच बदलून टाकू शकतो. (This fruit will make you millionaire, see how to cultivate it)

आंब्याची बाग

आंब्याच्या बागा तर आपल्याकडे सर्वत्र आढळतात. मग यात नवीन काय असे तुम्हाला वाटेल. मात्र आंब्याच्या बागेद्वारे तुम्ही कोट्यवधींची कमाई करू शकतो. अर्थात हा एक खास प्रकारचा आंबा आहे. भारतात काही मोजक्याच लोकांनी याची लागवड केली आहे. मुळातच आंब्याचे हे वाण सहजासहजी उपलब्ध होत नाही, मात्र या आंब्याला आंतरराष्ट्रीय बाजारात मोठी मागणी आहे. अर्थात हा आंबा भारतीय नाही तर जपानी आहे. या आंब्याला मियाझाकी (Miyazaki Mango)असे म्हटले जाते. जगभरातील देशांमध्ये याची निर्यात करण्याआधी एकेक आंब्याची तपासणी केली जाते. या प्रक्रियेत काही निवडक आंब्यांची सर्वोच्च गुणवत्ता लक्षात घेऊन त्यांना एग्ज ऑफ सन (Eggs of Sun) असा टॅग दिला जातो.

करोडपती बनवणारे झाड

मियाझाकी आंब्याची शेती करणे किंवा याला विकत घेणे ही प्रत्येकाच्याच आवाक्यातील गोष्ट नव्हे. प्रसार माध्यमांमधून समोर आलेल्या माहितीनुसार २०२० मध्ये मियाझाकी आंब्याची किंमत २.७० लाख रुपये प्रति किलो इतकी होती. जपानमधील मूळचे वाण असलेल्या या खास आंब्याची लागवड मध्य प्रदेशातील एका शेतकऱ्यानेदेखील केली आहे. त्याने आपल्या शेतात हा आंबा लावला आहे. याचे त्या शेतकऱ्याला चांगले उत्पन्न मिळते आहे. अर्थात या आंब्याची सुरक्षा करण्यासाठी आणि राखण करण्यासाठी त्याला शेतता सुरक्षा रक्षक ठेवावे लागले आहेत. 

मियाझाकीची बाग

या आंब्याची लागवड करण्यासाठी खास तयारी करावी लागते. या आंब्याला अधिक पावसाची आवश्यकता असेत. शिवाय याला चांगल्या उन्हाचीही आवश्यकता असते. मियाझाकी आंब्याची गणना जगातील सर्वात महागड्या फळांमध्ये केली जाते. याचे रोप कुठे मिळेल आणि एका एकरमध्ये किती लागवड केली पाहिजे याची माहिती तुम्हाला कृषींसंबधित सरकारी पोर्टलवर किंवा शेतीशी निगडीत मार्गदर्शन करणाऱ्या पोर्टलवर मिळू शकेल.  

मियाझाकीची सुरूवात कशी झाली

जपानमधील एक शहर मियाझाकी येथे पहिल्यांदा १९८४ मध्ये या आंब्याची लागवड सुरू झाली होती. तेथील उष्ण हवामान, दीर्घ काळ मिळणारे ऊन आणि चांगला पाऊस यामुळे तिथे या फळाची लागवड अत्यंत चांगल्या पद्धतीने होऊ लागली. या आंब्याचा सीझन एप्रिल ते ऑगस्ट दरम्यान असतो. सध्या याची लागवड बांग्लादेश, इंडोनेशिया, फिलिपाइन्स या मोजक्याच देशांमध्ये केली जाते. याच्या झाडाचा आकार पूर्ण वाढवण्याआधीपासूनच याची खास देखभाल करावी लागते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी