Shakuntala Railways Line: नवी दिल्ली : भारतीय रेल्वेचे (Indian Railways)जाळे प्रचंड आहे. देशाच्या कानाकोपऱ्यात रेल्वे पोचली आहे. कोट्यवधी भारतीय आजही प्रवासासाठी रेल्वेवरच अवलंबून आहेत. मात्र महाराष्ट्रातील एक रेल्वे मार्ग अत्यंत खास आहे. हा रेल्वे ट्रॅक महाराष्ट्रातील अमरावती येथे आहे. या मार्गावर धावणाऱ्या शकुंतला एक्स्प्रेसमुळे (shakuntala express) याला 'शकुंतला रेल्वे मार्ग' (Shakuntala Railway line)असेही म्हणतात. 1903 मध्ये क्लिक निक्सन या ब्रिटिश कंपनीच्या वतीने हा ट्रॅक बनवण्याचे काम सुरू करण्यात आले. रेल्वे ट्रॅक टाकण्याचे काम 1916 मध्ये पूर्ण झाले. ही कंपनी आज सेंट्रल प्रोव्हिन्सेस रेल्वे कंपनी म्हणून ओळखली जाते. (This Indian railway line still belongs to British, railway pays taxes to British company)
अमरावतीचा परिसर कापसासाठी देशभर प्रसिद्ध होता. मुंबई बंदरात कापूस नेण्यासाठी ब्रिटिशांनी या परिसरात रेल्वेचे जाळे बांधले होते. त्याकाळी फक्त खाजगी कंपन्याच रेल्वेचे जाळे बांधण्याचे काम करत असत.
आजही हा ट्रॅक ब्रिटनच्या या कंपनीच्या ताब्यात आहे. त्याच्या देखभालीची संपूर्ण जबाबदारीही त्यांच्यावर आहे. दरवर्षी पैसे देऊनही हा ट्रॅक अतिशय जीर्ण झाला आहे. गेल्या 60 वर्षांपासून त्याची डागडुजीही झाली नसल्याचे रेल्वे सूत्रांचे म्हणणे आहे. त्यावर चालणाऱ्या JDM मालिकेतील डिझेल लोको इंजिनचा कमाल वेग 20 किमी प्रतितास ठेवण्यात आला आहे.
या रेल्वे मार्गावरील सिग्नल आजही ब्रिटीशकालीन आहेत. येथून धावणाऱ्या शकुंतला एक्स्प्रेस ट्रेनमध्ये दररोज हजाराहून अधिक लोक प्रवास करतात.
भारतीय रेल्वेच्या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. रेल्वे बोर्डाने (Railway Board) रेल्वे कर्मचाऱ्यांना (Railway Employee)आनंदाची बातमी दिली आहे. कर्मचाऱ्यांना एक मोठी भेट दिली आहे. रेल्वे कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात (DA Hike)वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रसार माध्यमांमधून समोर आलेल्या माहितीनुसार, रेल्वे बोर्डाने जारी केलेल्या आदेशानुसार, अशा रेल्वे कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ज्यांना सध्या 6 व्या वेतन आयोगांतर्गत (6th Pay Commission)पगार दिला जातो आहे अशा कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्यात एकरकमी 14 टक्के वाढ करण्यात येत आहे. डीएमध्ये जोरदार वाढीसह कर्मचाऱ्यांना आणखी एक आनंदाची बातमी मिळणार आहे. ती म्हणजे सरकारने डीएतील वाढीबरोबर कर्मचाऱ्यांना 10 महिन्यांची थकबाकी देण्याचा निर्णयही घेतला आहे.
अधिक वाचा : घरगुती वापराच्या एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत वाढ
रेल्वे कर्मचाऱ्यांना आतापर्यंत सहाव्या वेतन आयोगांतर्गत पगार मिळत होता. रेल्वे बोर्डाच्या आदेशानुसार या कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता जुलै 2021 साठी 189 टक्क्यांवरून 7 टक्क्यांवरून 196 टक्के करण्यात आला आहे. त्यानंतर जानेवारी 2022 पासून त्यात पुन्हा 7 टक्क्यांनी वाढ करण्यात आली. त्यामुळे महागाई भत्त्यातील वाढ आता 203 टक्क्यांवर पोचली आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांमध्ये सातवा आणि सहावा वेतन आयोगासंदर्भात वेतनात फरक आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांना सध्या 7व्या वेतन आयोगाच्या (7th Pay Commission)शिफारशींनुसार पगार दिला जातो, मात्र अनेक रेल्वे कर्मचाऱ्यांना 6व्या वेतन आयोगाअंतर्गतच पगार मिळत आहे.