Multibagger Stock | फक्त ९ महिन्यात १४० रुपयांवरून ८,५७६ रुपयांवर पोचला हा शेअर, ५,७०० टक्क्यांचा छप्परफाड परतावा

Multibagger stock Investment : ईकेआय एनर्जी सर्व्हिसेसचा शेअर एप्रिल २०२१ला १४० रुपयांच्या पातळीवर होता. तर सध्या हा शेअर ८,१६८ रुपयांच्या पातळीवर पोचला आहे. कालच्या सत्रात या शेअरला ५ टक्क्यांचे अप्पर सर्किट लागले होते. त्यामुळे ७,७७९ रुपयांवरून या शेअरची किंमत ८,१६८ रुपये झाली होती. आज पुन्हा या शेअरला ५ टक्क्यांचे अप्पर सर्किट लागल्यावर शेअरची किंमत ८,५७६.६० रुपये झाली आहे.

EKI Energy services share
ईकेआयची एनर्जी सर्व्हिसेसच्या शेअरची तुफान घोडदौड 
थोडं पण कामाचं
  • ईकेआय एनर्जी सर्व्हिसेसच्या शेअरमध्ये झाली ५८ पट वाढ
  • कंपनीने मागील तिमाहीत कमावला दणदणीत नफा
  • ९ महिन्यात दिला ५,७०० टक्क्यांपेक्षा जास्त जबरदस्त परतावा

Share Market Investment| मुंबई:  ईकेआय एनर्जी सर्व्हिसेस (EKI Energy Services)या कंपनीच्या शेअरने मागील नऊ महिन्यात गुंतवणुकदारांचे नशीबच पालटून टाकले आहे. मागील वर्षभरात शेअर बाजारात (Share Market)अनेक शेअर्स मल्टीबॅगर्स (Multibagger)बनले आहेत. गुंतवणुकदारांना अभूतपूर्व पैसा कमावण्याची संधी यातून मिळाली आहे. ईकेआय एनर्जी सर्व्हिसेसचा शेअर एप्रिल २०२१ला १४० रुपयांच्या पातळीवर होता. तर सध्या हा शेअर ८,१६८ रुपयांच्या पातळीवर पोचला आहे. कालच्या सत्रात या शेअरला ५ टक्क्यांचे अप्पर सर्किट लागले होते. त्यामुळे ७,७७९ रुपयांवरून या शेअरची किंमत ८,१६८ रुपये झाली होती. आज पुन्हा या शेअरला ५ टक्क्यांचे अप्पर सर्किट लागल्यावर शेअरची किंमत ८,५७६.६० रुपये झाली आहे. विशेष म्हणजे याच वर्षी या शेअरची नोंदणी मुंबई शेअर बाजारात (BSE)१०२ रुपयांवर झाली होती. (This Multibagger share of EKI Energy Services gave more than 5,700 % returns in 9 months)

९ महिन्यात १ लाखाचे झाले ५८.३४ लाख रुपये

ईकेआय एनर्जी सर्व्हिसेसच्या शेअरमध्ये ९ महिन्यांआधी गुंतवलेल्या १ लाख रुपयाचे मूल्य आज ५८.३४ लाख रुपये झाले आहे. त्या तुलनेत सेन्सेक्स २,६१४ अंशांनी म्हणजे ५२६ टक्क्यांनीच वाढला आहे. कंपनीचे एकूण बाजारमू्य ५,६१४ कोटी रुपये आहे. ईकेआय एनर्जी सर्व्हिसेसच्या शेअरने मागील सहाच महिन्यात १,१३४ टक्क्यांचा जबरदस्त परतावा दिला आहे. मागील काही दिवसांपासून या शेअरमध्ये जबरदस्त तेजी असून किंमत वेगाने वाढते आहे. सप्टेंबरअखेर या कंपनीत सात प्रवर्तकांचा मिळून ७३.४७ टक्के हिस्सा आहे. तर २६२ सर्वसामान्य गुंतवणुकदारांकडे २६.५३ टक्के शेअर्स आहेत. दोन परकी पोर्टफोलिओ गुंतवणुकदारांकडे कंपनीचे ३.६८ लाख शेअर्स आहेत. एकूण शेअर्सचा हा ५.३६ टक्के इतका हिस्सा आहे.

ईकेआयचा जगभर विस्तार

ईकेआय एनर्जी सर्व्हिसेस ही कंपनी कार्बनच्या बाजारपेठेत आहे. कंपनी आपल्या व्यवसायाचा जगभर विस्तार करते आहे. अलीकडेच कंपनीने एक उपकंपनी देखील सुरू केली आहे. ही कंपनी इंदूरस्थित असून लवकरच रॉयल डट शेलबरोबर एक संयुक्त कंपनी सुरू करणार आहे. या नव्या उपक्रमात डच कंपनी १.६ अब्ज डॉलरची गुंतवणूक पाच वर्षांच्या कालावधीत करणार आहे. कंपनीच्या शेअरमध्ये झालेली तुफान घोडदौड तिच्या आर्थिक कामगिरीला साजेशीच आहे.

दणदणीत आर्थिक कामगिरी

सप्टेंबरअखेर सरलेल्या तिमाहीत कंपनीच्या निव्वळ नफ्यात १२७.३३ टक्क्यांची वाढ होत तो ८१.२५ कोटी रुपयांवर पोचला आहे. जूनअखेर सरलेल्या तिमाहीत कंपनीला ३५.७४ कोटींचा नफा झाला होता. तर निव्वळ विक्रीतील वाढदेखील १२९.३७ टक्के असून ती १९३.३४ कोटी रुपयांवरून ४४३.४७ कोटी रुपयांवर पोचली आहे. २०२०-२१ या आर्थिक वर्षात ईकेआय एनर्जी सर्व्हिसेसचा नफा १८.७० कोटी रुपयांवर पोचला होता. त्याआधीच्या आर्थिक वर्षात कंपनीला ४.५१ कोटी रुपयांचा नफा झाली होता. कंपनीची विक्रीदेखील ६५.९० कोटी रुपयांवरून वाढून १९०.७९ कोटी रुपयांवर पोचली आहे.

(डिस्क्लेमर : आर्थिक साक्षरता वाढवणे हाच टाइम्स नाऊ मराठीचा उद्देश आहे. शेअर बाजारातील गुंतवणूक जोखीमयुक्त असते. आम्ही कोणत्याही प्रकारची गुंतवणूक सुचवत नाही. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या आर्थिक सल्लागाराच्या मार्गदर्शनाखाली योग्य तो निर्णय घ्यावा.) 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी