Multibagger Stock | फक्त 3.48 रुपयांच्या या शेअरने एक लाखाचे केले 27 लाख...गुंतवणुकदार मालामाल

Multibagger Penny Stock : शेअर बाजारातील (Share Market)चढ-उताराच्या दरम्यान काही छोट्या शेअर्सनी म्हणजे पेनी स्टॉक्सने (Penny Stock) कमाल दाखवली आहे. हे शेअर्स गुंतवणुकदारांसाठी जबरदस्त कमाईचे साधन ठरले आहेत. या शेअर्सना मल्टीबॅगर शेअर्स (Multibagger Stock) म्हणतात. फक्त काही महिन्यात किंवा वर्ष-दीड वर्षात या मल्टीबॅगर शेअर्सनी गुंतवणुकदारांना आयुष्यभराची कमाई करून दिली आहे. छोट्याशा गुंतवणुकीद्वारे या शेअरने गुंतवणुकदारांसाठी मोठी संपत्ती निर्माण केली आहे.

Multibagger Stock
मल्टीबॅगर शेअर 
थोडं पण कामाचं
  • गुंतवणुकदारांना छप्परफाड कमाई करून देणारा पेनी स्टॉक
  • या शेअरने दिला 2584 टक्क्यांचा तुफान परतावा
  • वर्षभरात एक लाख रुपयांच्या गुंतवणुकीचे झाले जवळपास 27 लाख रुपये

Mutlibagger Penny Stock in 2022 : मुंबई :  शेअर बाजारातील (Share Market) चढ-उताराच्या दरम्यान काही छोट्या शेअर्सनी म्हणजे पेनी स्टॉक्सने (Penny Stock) कमाल दाखवली आहे. हे शेअर्स गुंतवणुकदारांसाठी जबरदस्त कमाईचे साधन ठरले आहेत. या शेअर्सना मल्टीबॅगर शेअर्स (Multibagger Stock) म्हणतात. फक्त काही महिन्यात किंवा वर्ष-दीड वर्षात या मल्टीबॅगर शेअर्सनी गुंतवणुकदारांना आयुष्यभराची कमाई करून दिली आहे. असाच दणदणीत आणि सुपरफास्ट नफा कमावणाऱ्या शेअर्सपैकी एक दमदार शेअर म्हणजे ब्राइटकॉम ग्रुप (Brightcom Group) या कंपनीचा शेअर. या कंपनीच्या शेअरने गेल्या वर्षभरात 2584 टक्क्यांचा छप्परफाड परतावा दिला आहे. वर्षभरापूर्वी ब्राइटकॉम समूहाच्या एका शेअरची किंमत फक्त 3.48 रुपये होती. जबरदस्त तेजी दाखवत हा शेअर आता 106 रुपयांवर पोचला आहे. (This Multibagger stock turned investment of Rs 1 Lakh into 27 lakhs in one year)

अधिक वाचा : Multibagger Stock | फारशी चर्चा न झालेला हा आहे छुपा रुस्तम शेअर...हजार गुंतवणाऱ्यांनी कमावले लाखो!

एक लाखाचे झाले 27 लाख

8 एप्रिल 2021 ला ब्राइटकॉम ग्रुपचा शेअर राष्ट्रीय शेअर बाजारात 3.91 रुपये प्रति शेअरच्या (Share Price of Brightcom Group)पातळीवर होता. तर सध्या म्हणजेच 8 एप्रिल 2022 ला हा शेअर तब्बल 106 रुपयांच्या पातळीवर व्यवहार करत होता. या कालावधीत या शेअरने 2584 टक्क्यांची वाढ नोंदवली आहे. म्हणजेच ज्या गुंतवणूकदाराने वर्षभरापूर्वी त्यात एक लाख रुपये गुंतवले असतील त्याचे मूल्य आज जवळपास 27 लाख रुपये झाले आहे.

अधिक वाचा : Multibagger Stock | अदानींच्या या शेअरने घातली आकाशाला गवसणी....27 रुपयांचा शेअर पोचला 2420 रुपयांवर

3 वर्षात एक लाखाचे झाले 55 लाख रुपये

जर एखाद्याने महिन्यापूर्वी ब्राइटकॉम ग्रुपच्या शेअर्समध्ये एक लाख रुपये गुंतवले असते तर त्याचे मूल्य आता 1,88,000 रुपये झाले आहे. या कालावधीत समभागाने 88.48 टक्के परतावा दिला आहे. 15 वर्षांपूर्वी ज्यांनी एक लाख रुपये गुंतवले ते करोडपती झाले आहेत. छोट्याशा गुंतवणुकीद्वारे या शेअरने गुंतवणुकदारांसाठी मोठी संपत्ती निर्माण (Wealth Creation) केली आहे. 15 वर्षापूर्वी ब्राइटकॉम ग्रुपच्या शेअरमध्ये जर 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती तर त्याचे मूल्य आज जवळपास 55 लाखांच्या पुढे गेले आहे. या कालावधीत या शेअरने 5437 टक्के परतावा दिला आहे. तिमाही ते तिमाही आधारावर, कंपनीच्या महसुलात 83.11 टक्क्यांनी वाढ झाली आहे. मागील 3 वर्षांतील ही सर्वोच्च वाढ आहे.

अधिक वाचा : Multibagger Stock | फक्त 40 पैशांच्या शेअरने घातला धुमाकूळ...12 महिन्यांत 1 लाखाचे झाले 80 लाख रुपये, चिल्लरने बनवले करोडपती!

मोठ्या प्रमाणात चढउतार असतानादेखील भारतीय शेअर बाजाराला सध्या सुगीचे दिवस आले आहेत. मोठ्या प्रमाणावर सर्वसामान्य गुंतवणुकदार शेअर बाजाराकडे आकर्षित होत आहेत. जगभरातील मोठ्या गुंतवणुकदारांचे लक्ष भारतीय शेअर बाजाराकडे आहेच, मात्र त्याचबरोबर देशांतर्गत गुंतवणुकदारांचाही कल शेअर बाजारातील गुंतवणुकीकडे वाढत चालला आहे. त्यातच वर्ष-दीड वर्षात अनेक मल्टीबॅगर शेअर्स समोर आले आहेत. त्यामुळे छोट्याशा गुंतवणुकीद्वारे कमी कालावधीत मोठी कमाई करण्याकडे गुंतवणुकदारांचा कल वाढत चालला आहे.

(डिस्क्लेमर : आर्थिक साक्षरता वाढवणे हाच टाइम्स नाऊ मराठीचा उद्देश आहे. शेअर बाजारातील गुंतवणूक जोखीमयुक्त असते. आम्ही कोणत्याही प्रकारची गुंतवणूक सुचवत नाही. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या आर्थिक सल्लागाराच्या मार्गदर्शनाखाली योग्य तो निर्णय घ्यावा.)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी