5G च्या जमान्यात BSNL होणार 4G, BBNL विलीनीकरणावर शिक्कामोर्तब

Cabinet Meet:केंद्रीय मंत्रिमंडळाने भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) च्या पुनरुज्जीवनासाठी 1.64 लाख कोटी रुपयांच्या पॅकेजला मंजुरी दिली आहे. बीएसएनएल आणि भारत ब्रॉडबँड नेटवर्क लिमिटेड (बीबीएनएल) यांच्या विलीनीकरणालाही मंत्रिमंडळाने हिरवा कंदील दिला आहे.

This plan of the government to save BSNL / MTNL, the merger of BBNL is approved
5G च्या जमान्यात BSNL होणार 4G, BBNL विलीनीकरणावर शिक्कामोर्तब ।   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • केंद्रीय मंत्रिमंडळाने BSNL साठी 1.64 लाख कोटी रुपयांच्या पुनरुज्जीवन पॅकेजला मंजुरी दिली आहे.
  • बीएसएनएल आणि भारत ब्रॉडबँड नेटवर्क लिमिटेड (बीबीएनएल) यांच्या विलीनीकरणालाही मंत्रिमंडळाने हिरवा कंदील दिला आहे.
  • यासोबतच देशातील सर्व गावे 4G मोबाईल सेवेने जोडली जाणार आहेत.

BBNL and BSNL Merger: बीएसएनएलच्या पुनरुज्जीवनासाठी मोठ्या पॅकेजची घोषणा देशातील फायबर नेटवर्क वाढवण्यास मदत करेल. बुधवारी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएलसाठी मोठी घोषणा करण्यात आली. वास्तविक, सरकारने बीएसएनएल आणि बीबीएनएलच्या विलीनीकरणाच्या प्रस्तावावर शिक्कामोर्तब केले आहे. 

अधिक वाचा : SpiceJet वर DGCA ची मोठी कारवाई, ५० टक्के उड्डाणांवर बंदी

1.64 लाख कोटींचे पॅकेज

केंद्रीय मंत्रिमंडळाने बीएसएनएलच्या पुनरुज्जीवनासाठी 1.64 लाख कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले आहे. केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ही माहिती दिली आहे. ते म्हणाले की, बीएसएनएल सरकारने हमीपत्र जारी करण्यास मंजुरी देण्याबरोबरच बॉण्ड हमी शुल्क माफ करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.

अधिक वाचा : Zomato कर्मचार्‍यांना मिळणार 1-1 रुपयांत 4.66 कोटींचे शेअर्स

यासोबतच बीएसएनएल/एमटीएनएल कर्ज पुनर्गठन प्रस्तावालाही मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. हे लक्षात घेण्यासारखे आहे की दूरसंचार कंपनी BSNL आतापर्यंत जिल्ह्यापासून ब्लॉकपर्यंतचे नेटवर्क व्यवस्थापित करते, तर ब्लॉकपासून पंचायतपर्यंतचे नेटवर्क भारत ब्रॉडबँड निगम लिमिटेड (BBNL) द्वारे व्यवस्थापित केले जाते.

अधिक वाचा : सरकारी कर्मचाऱ्यांना होणार आनंदी-आनंद गडे; तीन आठवड्यानंतर मिळणार प्रमोशन लेटर

बीएसएनएल सेवांचा विस्तार होईल

या विलीनीकरणामुळे, बीएसएनएलच्या सेवांचा विस्तार आणि वेग यासह त्याच्या ताळेबंदावरील दबाव कमी करण्यासाठी आणि फायबर नेटवर्क वाढवण्याच्या उपाययोजनांवर लक्ष केंद्रित केले जाईल. यामुळे सरकारी दूरसंचार कंपनीला ग्रामीण भागात आपली सेवा विस्तारण्यास मदत होणार आहे.


4G सेवा सुरू करता येईल

या विलीनीकरणाच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर आता बीएसएनएल सध्याच्या सेवांचा दर्जा सुधारू शकेल, 4जी सेवा सुरू करू शकेल आणि आर्थिकदृष्ट्या अत्यंत सक्षम असेल. सरकारच्या या निर्णयामुळे, या पुनरुज्जीवन योजनेच्या अंमलबजावणीसह, बीएसएनएल 2026-27 या आर्थिक वर्षात नफा मिळवेल अशी अपेक्षा आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी