Portable Air Conditioner : नवी दिल्ली : उन्हाचा तडाखा जोरात वाढला आहे. वाढणारा तापमानाचा पारा (Rising temperature)दिवसेंदिवस घाम फोडतो आहे. अशावेळी उन्हाळ्यात (Summer) उकाड्यापासून मुक्त होण्यासाठी आपल्याला आठवण येते ती एअर कंडिशनरची (Air Conditioner). जसे प्रत्येक सीझनमध्ये त्या त्या सीझनमधील गोष्टींची मागणी वाढते तसेच उन्हाळ्यात एअर कंडिशनरचीदेखील मागणी वाढते. मात्र एसी बसवणे हे प्रत्येकाच्याच सोयीचे नसते. त्यातच कूलरप्रमाणे जर एसी घरातील कोणत्याही खोलीत नेता आला तर काय मजा येईल. तुम्हालाही असे अनेकवेळा वाटत असेल की कधीही कुठेही नेता येईल असा एसी हवा. मग मित्रांनो आता तुमच्या या गरजेसाठी बाजारात पोर्टेबल एसी (Portable Air Conditioner)उपलब्ध झाले आहेत. (This portable AC will make you cool in this summer, available on Flipkart & Amazon)
हे पोर्टेबल एसी आपल्या नेहमीच्या एसीप्रमाणेच तुमची खोली थंडगार करतो. पण याला एकाच जागी बसवण्याची आवश्यकता नाही. कारण हा आहे पोर्टेबल एसी. कूलरप्रमाणे तुम्ही याला एका खोलीतून दुसऱ्या खोलीत किंवा घरात कुठेही नेऊ शकता. शिवाय याची किंमतदेखील खूप नसते. नेहमीच्या एसीइतक्याच किंमतीत तुम्ही हा पोर्टेबल एसी मिळवू शकता. ब्ल्यू स्टार (Blue Star) या कंपनीचा एक जबरदस्त पोर्टेबल एसी आहे. या मॉडेलचे नाव आहे ब्ल्यू स्टार 1 टन पोर्टेबल एसी (Blue Star 1 Ton Portable AC). हा पोर्टेबल एसी तुम्ही कोणत्याही ई-कॉमर्स वेबसाइटवरून विकत घेऊ शकता. सध्या हा पोर्टेबल एसी 39,500 रुपयांच्या किंमतीला मिळतो आहे. महत्त्वाचे म्हणजे तुम्ही याला ईएमआयवर देखील विकत घेऊ शकता.
अधिक वाचा : SBI update | महत्त्वाची बातमी! स्टेट बॅंकेचे होम लोन, कार लोन महागले...ईएमआय वाढणार
ब्ल्यू स्टार 1 टन पोर्टेबल एसी (Blue Star 1 Ton Portable AC)तुम्ही फ्लिपकार्टवर 1351 प्रति महिन्याच्या ईएमआयवरदेखील विकत घेऊ शकता. यातील खास मुद्दा म्हणजे कंपनी यात 10 दिवसांच्या परतीची सुविधा (10 Days raplacement policy)देते आहे. या पोर्टेबल एसी मध्ये हाय एफिशिएन्सी रोटरी कॉम्प्रेसर आहे. शिवाय कंपनीच्या म्हणण्यानुसार याला अॅंटी बॅक्टेरियल सिल्व्हर कोटिंगच्या तंत्रज्ञानासह बनवण्यात आले आहे. आपल्या नेहमीच्या एसीप्रमाणेच यातदेखील ऑटो मोड देण्यात आला आहे.
ब्ल्यू स्टार 1 टन पोर्टेबल एसीच्या नावात असल्याप्रमाणेच हा एसी फक्त 1 टनाचाच आहे. ब्ल्यू स्टार कंपनीच्या म्हणण्यानुसार हा एसी 90 चौ. फूटांची खोली थंड करू शकतो. या एसीत डायनामिक ड्राइव्ह डिझाइनचे तंत्रज्ञान वापरण्यात आलेले आहे. यामुळे कमी ऊर्जा वापरून जास्त थंडावा मिळतो. कंपनीने यापेक्षा मोठा आणि अॅडव्हान्स एसीदेखील विक्रीसाठी उपलब्ध करून दिला आहे. 11,000 BTU Portable Air Conditioner, Dehumidifier and Fan अॅमेझॉनवर विक्रीसाठी उपलब्ध आहे. हा एसी 500 चौ. फूटांपर्यतची खोली थंड करू शकतो.