Post Office Investment | पोस्ट ऑफिसच्या या योजनेत १० वर्षात मिळवा १६ लाख रुपये, दरमहा गुंतवा इतके पैसे

Post Office : पोस्ट ऑफिसमधील (Post Office Investment) गुंतवणूक योजना या सर्वसामान्यांसाठी चांगला गुंतवणूक पर्याय ठरतात. पोस्ट ऑफिस स्मॉल सेव्हिंग स्कीम (Post Office Small Saving Scheme) यादृष्टीने लोकप्रिय आहेत. तुम्हीही भविष्यातील गुंतवणुकीची योजना आखत असाल आणि मोठी रक्कम उभारू इच्छित असाल तर हा गुंतवणूक पर्याय तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकतो. पोस्ट ऑफिसच्या या योजनेत गुंतवणूक केल्यास तुम्हाला १० वर्षांत चांगली रक्कम हाती येईल.

Post Office RD Scheme
पोस्ट ऑफिसची आरडी योजना 
थोडं पण कामाचं
  • पोस्ट ऑफिसची आरडी योजना
  • सुरक्षित आणि चांगला परतावा देणारी योजना, किमान ५ वर्षांसाठी गुंतवणूक
  • पोस्टाच्या या योजनेत गुंतवणूक करून मिळवा मोठी रक्कम, ५.८ टक्के व्याज

Post Office RD Scheme : नवी दिल्ली: भविष्यातील आर्थिक गरजांच्या पूर्ततेसाठी गुंतवणूक (Investment)करणे आवश्यक असते. सुरक्षित आणि चांगला परतावा देणारा गुंतवणूक पर्याय याला नेहमीच प्राधान्य दिले जाते. पोस्ट ऑफिसमधील (Post Office Investment) गुंतवणूक योजना या सर्वसामान्यांसाठी चांगला गुंतवणूक पर्याय ठरतात. पोस्ट ऑफिस स्मॉल सेव्हिंग स्कीम (Post Office Small Saving Scheme) यादृष्टीने लोकप्रिय आहेत. तुम्हीही भविष्यातील गुंतवणुकीची योजना आखत असाल आणि मोठी रक्कम उभारू इच्छित असाल तर हा गुंतवणूक पर्याय तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकतो. पोस्ट ऑफिसच्या या योजनेत गुंतवणूक केल्यास तुम्हाला १० वर्षांत चांगली रक्कम हाती येईल. पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिट (Post Office RD Scheme) तुम्हाला कोणत्याही तणावाशिवाय गुंतवणूक आणि कर लाभ मिळवू देते. (This Post Office Scheme will give you Rs 16 lakhs in 10 years)

पोस्ट ऑफिस आरडी योजना (Post Office RD Scheme)

ही योजना भारतातील सर्व नागरिकांसाठी उपलब्ध आहे, ज्यामध्ये १० वर्षांचे मूल देखील खाते उघडू शकते. पोस्ट ऑफिसद्वारे ऑफर केलेली आरडी ही मध्यम मुदतीची बचत योजना म्हणून चालवली जाते. या योजनेद्वारे ठेवीदार त्याची गुंतवणूक किमान ५ वर्षांसाठी करतो. या प्रकारच्या योजना जोखीममुक्त मानल्या जातात कारण त्या बाजारावर अवलंबून नसतात. या योजनेंतर्गत, तुम्ही तुम्हाला हवी तितकी वर्षे गुंतवणूक करू शकता, ज्यामध्ये दर तीन महिन्यांनी चक्रवाढ व्याज दिले जाते. त्यावर ५.८% व्याज दिले जाते.

फक्त १०० रुपयात खाते सुरू करता येते

या योजनेअंतर्गत, गुंतवणूकदार १०० रुपयांसह खाते सुरू करू शकतात आणि दरमहा किमान रु. १० गुंतवू शकतात. मात्र, या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी कमाल रकमेची अट नाही. या योजनेत, गुंतवणूकदाराच्या मृत्यूनंतर, नॉमिनीची संपूर्ण रक्कम दिली जाते. यासोबतच तुम्ही आरडी स्कीममध्ये बचत खात्यात सहज पैसे ट्रान्सफर करू शकता. खातेदार खाते उघडल्यानंतर एक वर्षानंतर त्यांच्या खात्यातील रकमेच्या ५०% पर्यंत काढू शकतात.

१६ लाख रुपये कसे मिळवायचे

जर तुम्हाला आरडी स्कीममध्ये गुंतवणूक करून १६ लाख रुपये मिळवायचे असतील तर तुम्हाला १० वर्षांसाठी दरमहा १०,००० रुपये जमा करावे लागतील. म्हणजेच, दरवर्षी तुम्हाला खात्यात १,२०,००० रुपये जमा करावे लागतील. ज्यावर तुम्हाला ५.८% दराने व्याज दिले जाईल. चक्रवाढ व्याजदराचा लाभ होत १० वर्षात तुमच्या हाती चांगली रक्कम येईल.

आरडी खात्यात एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल ती म्हणजे हे नियमितपणे सुरू राहिले पाहिजे. जेव्हा रक्कम करायला हवी तेव्हा ती झालीच पाहिजे. जर तुमच्या खात्यात रक्कम जमा होणे बंद झाले तर त्या खात्याला पुन्हा सुरू करण्यासाठी तुम्हाला दंड भरावा लागेल. दर महिन्याच्या रकमेच्या १ टक्क्यांप्रमाणे हा दंड भरावा लागतो. लागोपाठ चार वेळा जर खात्यात रक्कम जमा झाली नाही तर खाते बंद होते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी