Tata Group | सौदीची ही कंपनी करू शकते टाटांच्या या कंपनीत गुंतवणूक, पाहा काय आहे प्लॅन...

Saudi PIF : सौदी अरेबियाचा पब्लिक इन्व्हेस्टमेंट फंड (PIF) टाटा समूहाच्या कंपनीत गुंतवणूक करण्याच्या तयारीत आहेत. टाटा समूहाची (Tata Group)आघाडीची कंपनी असलेल्या टाटा पॉवर कंपनी लिमिटेड (Tata Power) च्या ग्रीन एनर्जी, पॉवर ट्रान्समिशन आणि वितरण व्यवसायातील हिस्सा खरेदी करण्याची सौदी पीआयीएफची तयारी आहे.

Tata Power
सौदी कंपनी टाटा पॉवरमध्ये गुंतवणूक करणार 
थोडं पण कामाचं
  • सौदी अरेबियाचा पब्लिक इन्व्हेस्टमेंट फंड (PIF) टाटा समूहाच्या कंपनीत करणार गुंतवणूक
  • BlackRock आणि UAE सार्वभौम संपत्ती फंड मुबादला इन्व्हेस्टमेंट कंपनी टाटा पॉवरमध्ये गुंतवणूक करणार
  • भारतातील ऊर्जा क्षेत्रातील कंपन्यांमध्ये आखाती देशातील कंपन्यांना स्वारस्य

Saudi company to invest in Tata group company : नवी दिल्ली  : सौदी अरेबियाचा पब्लिक इन्व्हेस्टमेंट फंड (PIF) टाटा समूहाच्या कंपनीत गुंतवणूक करण्याच्या तयारीत आहेत. टाटा समूहाची (Tata Group)आघाडीची कंपनी असलेल्या टाटा पॉवर कंपनी लिमिटेड (Tata Power) च्या ग्रीन एनर्जी, पॉवर ट्रान्समिशन आणि वितरण व्यवसायातील हिस्सा खरेदी करण्याची सौदी पीआयीएफची तयारी आहे. सूत्रांकडून समोर आलेल्या माहितीनुसार, ही सौदी कंपनी टाटा पॉवरमध्ये गुंतवणूक करण्याच्या विचारात आहे. मात्र, याबाबत कंपनीकडून कोणतेही वक्तव्य आलेले नाही. (This Saudi copmany wants to invest in Tata group company)

अधिक वाचा : Tata Name | पहिल्यांदा जेव्हा कोणत्याही कंपनीसाठी‘टाटा’नाव वापरण्यात आले...त्याची रंजक कहाणी

काय आहे योजना 

सूत्रांच्या माहितीनुसार, PIF ने प्रस्तावित केलेली गुंतवणूक म्हणजे टाटा पॉवरद्वारे सुरू होत असलेल्या नवीन ऊर्जा कंपनीमध्ये  BlackRock आणि UAE सार्वभौम संपत्ती फंड मुबादला इन्व्हेस्टमेंट कंपनी गुंतवणूक करण्याची योजना आखत आहे. "कंझ्युमर रिन्युएबल्स" म्हणून ओळखल्या जाणार्‍या या व्यवसायात कोळसा-इंधन उर्जा प्रकल्प आणि कार्बन प्रकल्प वगळता टाटा पॉवरची सर्व मालमत्ता असेल. पीआयएफच्या व्यवस्थापनाखाली सुमारे 600 अब्ज डॉलरची मालमत्ता आहे.

अधिक वाचा : Gold Price Today | लग्नसराईत मोठी संधी...सोन्याची झळाळी आणि चांदीची चमक घटली...पाहा ताजा भाव

टाटा पॉवर काय करते?

टाटा पॉवर ही भारतातील सर्वात मोठ्या एकात्मिक ऊर्जा कंपन्यांपैकी एक आहे. कंपनी अक्षय आणि पारंपारिक ऊर्जा, विद्युत पारेषण आणि वितरण, कोळसा आणि मालवाहतूक, लॉजिस्टिक आणि ट्रेडिंगमध्ये काम करते. टाटा पॉवर उत्तर दिल्ली आणि ओडिशातील 1.2 कोटी ग्राहकांना त्यांच्या वितरक कंपन्यांमार्फत वीज पुरवठा करते.

अधिक वाचा : Linking PF account with PAN | तुमचे पीएफ खाते पॅनशी लिंक आहे का? नसेल तर लागेल दुप्पट कर...पाहा नवीन नियम आणि लिंक करण्याची पद्धत

अदानींच्या कंपन्यांमध्येही गुंतवणूक

तेलसंपन्न पश्चिम आशियाई देशांतील कंपन्या त्यांच्या होल्डिंगमध्ये विविधता आणण्यासाठी भारताच्या हरित ऊर्जा क्षेत्रात गुंतवणूक करण्याचा विचार करत आहेत. याआधी शुक्रवारी, अबुधाबीस्थित आंतरराष्ट्रीय होल्डिंग कंपनी पीजेएससीने अदानी समूहाच्या ग्रीन एनर्जी लिमिटेड, अदानी ट्रान्समिशन लिमिटेड आणि अदानी एंटरप्रायजेस लिमिटेड या तीन कंपन्यांमध्ये 2 अब्ज डॉलरची गुंतवणूक करण्यास सहमती दर्शवली.

या कंपन्यांवर लक्ष केंद्रित करा

कॅनडाची ब्रूकफील्ड अॅसेट मॅनेजमेंट इंक महिंद्रा सस्टेन मधील भरीव भागभांडवल विकत घेण्याचा विचार करत आहे. भारतातील अपारंपारिक ऊर्जा क्षेत्रातील कंपनी असलेल्या Sprung Energy चे अधिग्रहण करण्यासाठी शेल plc Actis LLP सर्वात आघाडीवर आहे. याव्यतिरिक्त, सिंगापूरचे सेम्बकॉर्प इंडस्ट्रीज लिमिटेड, अनफिनिटी ग्लोबल इंकआणि JSW समूहाला ग्रीन एनर्जी उत्पादक माइट्र्ा एनर्जी इंडिया प्रा.चे अधिग्रहण करण्यासाठी निवडण्या आले होते. टाटा पॉवर आपली टाटा पॉवर रिन्युएबल एनर्जी लिमिटेड मधील हिस्सेदारी कमी करण्याचा विचार करते आहे.

टाटा समूह आपल्या नवीन 'सुपर अॅप'सह बाजारात खळबळ माजवण्यासाठी सज्ज झाला आहे. यामध्ये खरेदीपासून ते पेमेंटपर्यंत अनेक सेवा उपलब्ध होणार आहेत. त्याला टाटा न्यू अॅप असे नाव देण्यात आले आहे. त्याचे पेज Google Play Store वर लाइव्ह झाले आहे. सध्या हे अॅप फक्त टाटा ग्रुपच्या कर्मचाऱ्यांपुरते मर्यादित आहे. लॉन्च झाल्यानंतर ते सर्व लोकांसाठी उपलब्ध होईल. त्यामुळे Amazon, Flipkart, Paytm सारख्या कंपन्यांना तगडी स्पर्धा मिळू शकते, असे मानले जात आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी