Stock to buy | टाटा समूहाचा हा शेअर 900 रुपयांवर जाण्याची शक्यता, जबरदस्त कमाईची संधी, जाणकार म्हणतात करा खरेदी

Tata group : शेअर बाजारात (Share Market)सध्या कमाईच्या संधी दिसून येत आहेत. त्यातच जर टाटा समूहातील (Tata Group)एखाद्या कंपनीची चर्चा असेल तर गुंतवणुकदारांचे तिकडे लगेच लक्ष जाते. जर तुम्ही टाटा समूहाच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक जबरदस्त शेअर आहे. जाणकारांना या शेअरमध्ये तेजी येण्याची चिन्हे दिसत असून ते खरेदी करण्याचा सल्ला देत आहेत. देशातील आघाडीचे ब्रोकरेज हाऊस असलेल्या ICICI डायरेक्टने टाटा समूहाच्या या शेअरला 'BUY' रेटिंग दिले आहे.

Investment opportunity in Tata Group share
टाटा समूहाच्या शेअरमध्ये कमाईची संधी 
थोडं पण कामाचं
  • टाटा समूहातील एफएमसीजी क्षेत्रातील कंपनीची जोरदार कामगिरी
  • कंपनीच्या उत्पन्नात आणि नफ्यात वाढ
  • जाणकारांच्या मते हा शेअर तेजी दाखवणार, गुंतवणुकीची संधी

Tata Consumer Products Ltd stock to buy : मुंबई : शेअर बाजारात (Share Market)सध्या कमाईच्या संधी दिसून येत आहेत. त्यातच जर टाटा समूहातील (Tata Group)एखाद्या कंपनीची चर्चा असेल तर गुंतवणुकदारांचे तिकडे लगेच लक्ष जाते. जर तुम्ही टाटा समूहाच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेडच्या (Tata Consumer Products Ltd) शेअर्सवर लक्ष ठेवू शकता. वास्तविक ब्रोकरेज हाऊसेस सध्या एफएमसीजी (FMCG)क्षेत्रातील या कंपनीच्या शेअर्सवर लक्ष ठेवून आहेत. जाणकारांना या शेअरमध्ये तेजी येण्याची चिन्हे दिसत असून ते खरेदी करण्याचा सल्ला देत आहेत. देशातील आघाडीचे ब्रोकरेज हाऊस असलेल्या ICICI डायरेक्टने टाटा समूहाच्या या शेअरला 'BUY' रेटिंग दिले आहे. (This Tata group stock can rise upto Rs 900, earning opportunity, experts gave buy rating)

अधिक वाचा : Multibagger Stock | हा शेअर 36 पैशांवरून पोचला 80 रुपयांवर...एका वर्षात 50 हजाराचे झाले 1.11 कोटी

910 रुपयांचे टार्गेट

आयसीआयसीआय डायरेक्टने टाटा कंझ्युमर प्रोडक्ट्सच्या शेअरच्या (Share price of Tata Consumer Products Ltd)किंमतीला 910 रुपयांच्या टार्गेट किंमतीसह बाय रेटिंग (Buy rating) दिले आहे. कंपनीच्या शेअरची सध्याची किंमत 816.20 रुपये प्रति शेअर आहे. म्हणजेच यात तेजी असून कमाई करता येऊ शकते. या वर्षी आतापर्यत या शेअरमध्ये वाढ होत तो जवळपास 10% वाढला आहे. त्याच वेळी कंपनीने दीर्घकालीन गुंतवणुकदारांना मजबूत परतावा दिला आहे. गेल्या पाच वर्षांत हा शेअर सुमारे 440% वाढला आहे.

अधिक वाचा : Multibagger Stock | 'मै रुकेना नहीं साला'...असे म्हणत या पेनी स्टॉकने 1 लाखाचे केले 16 कोटी, गुंतवणुकदारांची आयुष्यभराची कमाई

ब्रोकरेज फर्मने काय सांगितले?

आयसीआयसीआय डायरेक्टने आपल्या नोटमध्ये म्हटले आहे की, मजबूत व्हॉल्यूम वाढ आणि किंमतीतील घसरणीच्या पार्श्वभूमीवर टाटा ग्राहक उत्पादनांमध्ये 4% महसूल वाढ अपेक्षित आहे. भारतातील शीतपेये आणि आंतरराष्ट्रीय शीतपेय श्रेणीमध्ये विक्री स्थिरच राहणार आहे. तर भारतीय खाद्य व्यवसाय (मीठ, कडधान्ये आणि इतर) विक्रीत 19% वाढ नोंदवेल अशी अपेक्षा आहे. सरलेल्या आर्थिक वर्षात उत्तर भारतातील सरासरी चहा खरेदीच्या किमतींमध्ये 15% ची घट झाली आहे. त्यामुळे 437 bps ग्रॉस मार्जिन वाढण्याची अपेक्षा आहे.

अधिक वाचा : Multibagger Stock | 10 पैशांची किंमत ती काय? नाही...10 पैशांच्या या शेअरने बनवले करोडपती, अजूनही संधी

टाटांची ही कंपनी काय करते? किती कमावते?

तुमच्या माहितीसाठी, टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेड ही एफएमसीजी (FMCG) क्षेत्रातील कंपनी आहे. ही 1962 साली स्थापन झालेली कंपनी आहे. ही एक लार्ज कॅप कंपनी असून तिचे मार्केट कॅप म्हणजे बाजारमूल्य 75023.53 कोटी रुपये आहे. 31-12-2021 ला संपलेल्या तिमाहीत, कंपनीने एकत्रित एकूण 3233.42 कोटी रुपायंचे उत्पन्न नोंदवले. मागील तिमाहीशी तुलना करता कंपनीच्या उत्पन्नात 5.23% ची वाढ झाली आहे. मागील तिमाहीत कंपनीला 3072.74 कोटी रुपयांचे एकूण उत्पन्न मिळाले होते. चौथ्या तिमाहीअखेर कंपनीने 287.68 कोटी रुपयांचा करपश्चात निव्वळ नफा नोंदवला आहे.

(डिस्क्लेमर : आर्थिक साक्षरता वाढवणे हाच टाइम्स नाऊ मराठीचा उद्देश आहे. शेअर बाजारातील गुंतवणूक जोखीमयुक्त असते. आम्ही कोणत्याही प्रकारची गुंतवणूक सुचवत नाही. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या आर्थिक सल्लागाराच्या मार्गदर्शनाखाली योग्य तो निर्णय घ्यावा.)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी