Bank Holidays August: या आठवड्यात विविध भागात 6 दिवस बंद राहणार बँका, पाहा कधी आणि कुठे आहे सुट्टी

Bank Holidays : ऑगस्ट महिन्यात सुट्ट्यांमुळे बँका (Bank Holidays)अनेक दिवस बंद राहणार आहेत. या महिन्यात मोहरम (Moharam), स्वातंत्र्य दिन (Independence Day), श्री कृष्ण जन्माष्टमी (Janmashtami), रक्षाबंधन (Rakshbandhan 2022) असे महत्त्वाचे सण आहेत. त्यामुळे विविध शहरांमध्ये अनेक दिवस बँक कर्मचाऱ्यांना सुट्टी असेल. या आठवड्यात विविध राज्यांमध्ये 6 दिवस बँका बंद राहणार आहेत.

Bank Holidays in August
या आठवड्यात बॅंकांना मोठ्या सुट्ट्या 
थोडं पण कामाचं
  • आरबीआयच्या नोटिफिकेशननुसार असतात बॅंकांना सुट्टया
  • या महिन्यात मोहरम (Moharam), स्वातंत्र्य दिन (Independence Day), श्री कृष्ण जन्माष्टमी (Janmashtami), रक्षाबंधन (Rakshbandhan 2022) असे महत्त्वाचे सण
  • या आठवड्यात विविध राज्यांमध्ये 6 दिवस बँका बंद राहणार

Bank Holidays August : नवी दिल्ली : ऑगस्ट महिन्यात सुट्ट्यांमुळे बँका (Bank Holidays)अनेक दिवस बंद राहणार आहेत. या महिन्यात मोहरम (Moharam), स्वातंत्र्य दिन (Independence Day), श्री कृष्ण जन्माष्टमी (Janmashtami), रक्षाबंधन (Rakshbandhan 2022) असे महत्त्वाचे सण आहेत. त्यामुळे विविध शहरांमध्ये अनेक दिवस बँक कर्मचाऱ्यांना सुट्टी असेल. या आठवड्यात विविध राज्यांमध्ये 6 दिवस बँका बंद राहणार आहेत. कुठे आणि केव्हा बॅंकांना सुट्टी असणार हे जाणून घ्या. (This week bank will have 6 holidays in different parts of country)

अधिक वाचा : Maharashtra TET Scam : टीईटी घोटाळ्यात अब्दुल सत्तारांच्या मुलांची नावं; चर्चा होताच सत्तारांना आला बदनामीचा संशय

या महिन्यात अनेक सण आणि महत्त्वाचे दिवस आहेत. त्यामुळे बॅंकांच्या सुट्ट्यांची रेलचेल असणार आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) ऑगस्ट महिन्यासाठी बँकांच्या सुट्ट्यांची (Bank Holidays)यादी जारी केली आहे. ऑगस्ट महिन्यात (दुसरा/चौथा शनिवार आणि रविवार वगळता) एकूण 18 दिवस बँका बंद राहतील. स्वातंत्र्य दिन , रक्षाबंधन, गोकुळाष्टमी आणि गणेश चतुर्थी यासह अनेक मोठे सण ऑगस्टमध्ये येत आहेत. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला पुढील महिन्यात बँकेशी संबंधित कोणतेही काम असेल, तर तुम्ही बॅंकेची सुट्टी पाहून त्यानुसार बँकेत जाण्याचा प्लॅन करा.

या आठवड्यात बँकेच्या सुट्ट्या कधी ?

8 ऑगस्ट - मोहरम (आशुरा) - जम्मू, श्रीनगर
9 ऑगस्ट - मोहरम (आशुरा) - आगरतळा, अहमदाबाद, बेलापूर, बेंगळुरू, भोपाळ, चेन्नई, हैदराबाद, जयपूर, कानपूर, कोलकाता, लखनौ, मुंबई, नागपूर, नवी दिल्ली, पाटणा, रांची आणि रामपूर येथे बँका बंद राहतील.
11 ऑगस्ट - रक्षा बंधन - अहमदाबाद, भोपाळ, डेहराडून, जयपूर आणि शिमला
12 ऑगस्ट - रक्षा बंधन - कानपूर आणि लखनौ
13 ऑगस्ट - देशभक्त दिवस - इंफाळ
14 ऑगस्ट - रविवार साप्ताहिक सुट्टी

अधिक वाचा : Iphone Vs Android : आयफोन आणि अँड्रॉईडमध्ये काय आहे वेगळेपण? किंमतीत का असतो एवढा फरक? वाचा सविस्तर

पुढच्या आठवड्यात बँकांना कधी सुट्टी-

15 ऑगस्ट - स्वातंत्र्य दिन
16 ऑगस्ट - पारशी नववर्ष - बेलापूर, मुंबई आणि नागपूर
18 ऑगस्ट - जन्माष्टमी - भुवनेश्वर, डेहराडून, कानपूर आणि लखनौ
19 ऑगस्ट - जन्माष्टमी - अहमदाबाद, चंदीगड, चेन्नई, गंगटोक, जयपूर, जम्मू, पाटणा, रायपूर, रांची, शिलाँग आणि शिमला
20 ऑगस्ट - श्रीकृष्ण अष्टमी - हैदराबाद
21 ऑगस्ट - रविवार (साप्ताहिक सुट्टी)
28 ऑगस्ट - रविवार (साप्ताहिक सुट्टी)
29 ऑगस्ट - श्रीमंत शंकरदेव (गुवाहाटी) यांची तारीख
31 ऑगस्ट - गणेश चतुर्थी (गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटकात बँका बंद राहतील)

अधिक वाचा : खाटूश्यामजी जत्रेत चेंगराचेंगरी; मंदिराचे दरवाजे उघडताच घडली घटना, 3 महिलांचा गुदमरुन मृत्यू

सर्व राज्यांसाठी वेगवेगळे नियम

लक्षात घ्या की या सर्व सुट्ट्या सर्व राज्यांमध्ये लागू होणार नाहीत. रिझर्व्ह बॅंकेच्या (Bank Holidays List 2022) अधिकृत वेबसाइटवर दिलेल्या सुट्ट्यांच्या यादीनुसार, बँकिंग सुट्ट्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये साजरे होणारे सण किंवा त्या राज्यांमधील विशेष प्रसंगी दिलेल्या नोटिफिकेशनवर देखील अवलंबून असतात.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी