VIDEO: भरमसाठ वीज बिलामुळे त्रस्त? मग या 5 गोष्टी करुन पाहाच...

Electricity Bill reduce tips: वीजेचा योग्य वापर केल्यास तुम्हाला वीज बिल जास्त येणार नाही. तुम्ही दैनंदिन आयुष्यात सोप्या टिप्सचा वापर केल्यास वीज बचत नक्की करु शकता. 

Representative Image
प्रातिनिधिक फोटो (Photo: iStock) 

Electricity Bill: सध्याच्या काळात अनेकांना भरमसाठ वीज बिल येत असल्याचं पहायला मिळतं. वाढत्या महागाईत वीज बिलाचा शॉक नागरिकांना खूपच त्रासदायक ठरत आहे. वीज दरात झालेली वाढ आणि वीजेचा वाढता वापर यामुळे वीज बिल जास्त येत आहे. वीज बिल कमी करणं हे तुमच्या हातात नाहीये मात्र, वीजेचा वापर किती आणि कसा करावा हे तुमच्या हातात नक्कीच आहे. वीजेचा वापर कमी केल्याने तुम्हाला वीज बिल कमी येण्यास नक्कीच मदत होईल. (tips to reduce electricity bill watch video in marathi)

तुम्ही अनेक छोटे-छोटे बदल करुन आपलं वीज बिल कमी करु शकता. एका अभ्यासानुसार, घरगुती वीजेच्या वापरात जवळपास 80 टक्के वापर हा कूलिंग आणि हिटिंग रूम यांचा असतो. आज आम्ही तुम्हाला अशा काही टिप्स सांगणार आहोत ज्यामुळे तुम्हाला वीज बिल कमी येण्यास नक्कीच मदत होईल.

LED बल्बचा वापर

जर तुम्ही आपल्या घरात किंवा ऑफिसमध्ये जुने बल्ब किंवा ट्यूबलाईट वापरत असाल तर त्याऐवजी एलईडी लाईट्सचा वापर करा. कारण, जुन्या बल्बमुळे वीजेची खपत जास्त होते आणि परिणामी वीज बिलही जास्त येते.

एसीचं तापमान

तुमच्या घरातील एसीचं तापमान हे खूपच कमी किंवा खूपच जास्त नसावे. कारण, असे केल्याने वीजेचा वापर जास्त प्रमाणात होतो. 

वॉशिंग मशीन

वॉशिंग मशीनमध्येही त्याच्या क्षमतेनुसार कपडे टाका. 

टीव्ही आणि कम्युटर

तसेच टीव्ही, कम्प्युटर याचा वापर होत नसेल तर त्याचे स्विच बंद करा. वीजेचा वापर जास्त होऊ नये म्हणून पावर सेव्हिंग मोडवर ठेवता येईल.

गिजर आणि हिटर

घरातील गिजर आणि हिटरचा वापर नसेल तेव्हा ते तात्काळ बंद करा. कारण, गिजर आणि हिटरमुळे वीजेचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. अनेकदा हिटरचा वापर केल्यावर ते बंद करण्यास आपण विसरतो. थंडीच्या काळात हिटर आणि गिजरचा वापर मोठ्या प्रमाणात होतो आणि त्यामुळे वापर झाल्यास ते तात्काळ बंद करा.

सोलर पॅनलचा वापर

जर तुम्ही तुमच्या घरात वीजेचा वापर कमी करु इच्छित असाल तर सोलर पॅनलचा उपयोग करु शकता. कारण, सोलर पॅनलच्या माध्यमातून तुम्ही सौर ऊर्जेचा वापर करु शकता आणि त्यामुळे वीज बिल कमी येण्यास मदत होईल. वीज वाचवण्याचा हा एक उत्तम मार्ग आहे.

ऊर्जा बचत करणारे उपकरण

तुम्ही घरातून बाहेर पडताना लाईट्स बंद करण्यास विसरता का? तर मग तुमच्यासाठी ऊर्जा बचत करणारे उपकरण फायदेशीर ठरू शकतात. या उपकरणांमध्ये डिजिटल प्रोग्रामेबल इलेक्ट्रॉनिक टायमर देण्यात आलेला असतो जो या उपकरणांना ऑन आणि ऑफ करण्यासाठीचं शेड्यूल्ड सेट करण्याची परवानगी देतो.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी