Titan Share Price: टायटनच्या शेअरमध्ये मोठी घट, हे आहे कारण 

काम-धंदा
Updated Jul 09, 2019 | 16:46 IST | टाइम्स नाऊ मराठी

Titan: टायटनच्या शेअरच्या भावात आज मोठी घट दिसून आली. हे शेअर अनेक गुंतवणूकदारांची पसंती आहेत. जाणून घ्या किती झाली घट, जाणून घ्या या मागील कारण... 

titan
टायटनच्या शेअरच्या किंमतीत झाली घट  |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

  • टायटनच्या शेअर भावात मोठी घट
  • सोन्याच्या भावात तेजी आहे मोठे कारण 
  • टायटन ही टाटा ग्रुपची कंपनी 

नवी दिल्ली :  आज शेअर बाजारात टायटन कंपनीच्या शेअरमध्ये मोठी घट दिसून आली. टायटनचे शेअरमध्ये गेल्या सहा वर्षातील ही सर्वात मोठी घट आहे. टायटनच्या शेअरमध्ये आज १४ टक्के घट दिसून आली. सध्या या शेअरमध्ये १२ टक्के घट असून ११०४ वर ट्रेडिंग सुरू आहे. 

रिलायन्स सिक्युरिटीजने अनुमान लावला आहे की,  २०२०साठी टायटन कंपनीचे उत्पन्न ३.३ टक्क्यांनी घटवली आहे. रिपोर्टनुसार आर्थिक वर्ष २०२०मध्ये कंपनीचे वार्षिक उत्पन्न १५.८ टक्क्यांनी वाढून २२ हजार कोटी रुपये होणार आहे. तर आर्थिक वर्ष २०२१ मध्ये हे उत्पन्न वाढून २५ हजार कोटी रुपये होणार आहे.  

टायटनने एप्रिल ते जूनच्या तिमाहीत आपले उत्पन्न कमी होणार असल्याची अनुमान लावला आहे. कंपनीने स्टॉक एक्सचेंजला सांगितले की यंदाच्या आर्थिक वर्षात  एप्रिल ते जून या तिमाहीत त्यांचा खप कमी होणार असल्याचा अनुमान आहे. 

कंपनीने सांगितले की, जूनमध्ये सोन्याचे अधिक भावाने ज्वेलरी इंडस्ट्रीच्या वाढीवर परिणाम केला आहे.  कंपनीच्या ज्वेलरी सेगमेंटमध्ये वाढीचा अनुमान कमी आहे. सध्याच्या आर्थिक वर्षात टायटनच्या ज्वेलरी सेगमेंट १३ टक्के दराने वाढ झाली आहे. कंपनीने सांगितले की सोन्याच्या दरात वाढ झाल्यामुळे ग्राहकांची मागणी कमी झाली आहे. 

जूनमध्ये सोन्याचा दर ८ टक्के वाढ झाली. सोन्याचे भाव आंतरराष्ट्रीय स्तरावर जूनपासून मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. आता सरकारने सोने आणि चांदीवरील आयात शुल्क वाढून १० टक्क्यांवरून १२.५ टक्के केली आहे. यामुळे भारतात सोन्याचा भाव प्रती १० ग्रॅम १००० रुपयांनी वाढला आहे. याचा परिणाम  मोठ्या काळासाठी ज्वेलरी कंपन्यांवर पडणार आहे. टायटन टाटा ग्रूपची कंपनी आहे. याचा कारभार अनेक सेगमेंटमध्ये आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
Titan Share Price: टायटनच्या शेअरमध्ये मोठी घट, हे आहे कारण  Description: Titan: टायटनच्या शेअरच्या भावात आज मोठी घट दिसून आली. हे शेअर अनेक गुंतवणूकदारांची पसंती आहेत. जाणून घ्या किती झाली घट, जाणून घ्या या मागील कारण... 
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola