ATM Safety Tips : एटीएम वापरणाऱ्यांनी या टिप्स लक्षात ठेवाव्यात, नाहीतर होईल फसवणूक...

ATM Fraud : आजच्या युगात एटीएम कार्ड जवळपास प्रत्येक बँक खातेधारकाकडे असते. प्रत्येक बॅंक आता एटीएमची सुविधा देते. एटीएम अर्थात डेबिट कार्डमधून पैसे काढणे ही अतिशय सोपी प्रक्रिया झाली आहे. एटीएममुळे (ATM) बँकेत पैसे काढण्यासाठी लांबलचक रांगा टाळता येतात. तसेच, कोणत्याही प्रकारची स्लिप भरण्याची गरज नाही. तर एटीएममधूनही ऑनलाइन व्यवहार करता येणार आहेत. मात्र, काही वेळा छोट्याशा निष्काळजीपणामुळेही लोक एटीएम फसवणुकीचे (ATM Fraud) बळी ठरतात.

ATM Safety Tips
एटीएम सुरक्षा टिप्स 
थोडं पण कामाचं
 • एटीएमचा वापर हा सर्वत्रच होतो
 • एटीएम सुरक्षा टिप्स लक्षात ठेवा
 • एटीएम फसवणुकीचे बळी होण्याचे टाळा

ATM Transaction Safety : नवी दिल्ली : आजच्या युगात एटीएम कार्ड जवळपास प्रत्येक बँक खातेधारकाकडे असते. प्रत्येक बॅंक आता एटीएमची सुविधा देते. एटीएम अर्थात डेबिट कार्डमधून पैसे काढणे ही अतिशय सोपी प्रक्रिया झाली आहे. एटीएममुळे (ATM) बँकेत पैसे काढण्यासाठी लांबलचक रांगा टाळता येतात. तसेच, कोणत्याही प्रकारची स्लिप भरण्याची गरज नाही. तर एटीएममधूनही ऑनलाइन व्यवहार करता येणार आहेत. मात्र, काही वेळा छोट्याशा निष्काळजीपणामुळेही लोक एटीएम फसवणुकीचे (ATM Fraud) बळी ठरतात. अशा परिस्थितीत हे टाळण्यासाठी काही खबरदारी घेणे आवश्यक आहे. एटीएमवर तुमची फसवणूक होऊ नये यासाठीच्या काही टिप्स जाणून घ्या. (To avoid ATM fraud use these safety tips)

अधिक वाचा : ITR Filing: प्राप्तिकर विवरणपत्राची शेवटची तारीख, नेमका किती कर भरावा आणि कर नियोजन कसे करावे, जाणून घ्या

सर्वच बॅंका आता बॅंकिंग व्यवहार आणि एटीएम व्यवहार यांच्या सुरक्षेला महत्त्व देत आहेत. त्यामुळेच अनेक सुविधा सुरू करण्यात आल्या आहेत आणि ग्राहकांनादेखील जागरूक केले जाते आहे. एटीएम वापरणाऱ्यांनी काही खबरदारी घेणे आवश्यक आहे. त्यामुळे एटीएममधून होणारी फसवणूक टाळता येईल. एटीएम सेफ्टीमध्ये वापरल्या जाणार्‍या पद्धतींबद्दल जाणून घेऊया.

अधिक वाचा : ITR filing : तुमच्याकडे फॉर्म 16 नाही? नो टेन्शन! तरीही तुम्ही प्राप्तिकर विवरणपत्र भरू शकता, पाहा कसे

एटीएम वापरताना ही खबरदारी घ्या -(ATM Safety Tips)

 1. - तुमचा पिन लक्षात ठेवा. तो कुठेही लिहू नका आणि कार्डवर कधीही लिहू नका.
 2. - तुमचे कार्ड तुमच्या वैयक्तिक वापरासाठी आहे. तुमचा पिन किंवा कार्ड कोणाशीही शेअर करू नका, अगदी तुमचे मित्र किंवा कुटुंबीय यांनादेखील नाही.
 3. -एटीएममधून पैसे काढताना, मशीनजवळ उभे राहा आणि पिन टाकताच कीपॅड आपल्या हाताने झाकून टाका, जेणेकरून तुमच्या मागे उभी असलेली व्यक्ती तुमचा पिन पाहू शकणार नाही.
 4. - एटीएम कार्ड वापरण्यासाठी किंवा रोख रक्कम हाताळण्यासाठी अनोळखी व्यक्तीची मदत घेऊ नका.
 5. -एटीएममधून बाहेर पडण्यापूर्वी कृपया 'रद्द करा' बटण दाबा. तुमचे कार्ड आणि ट्रान्झॅक्शन स्लिप सोबत घेण्याचे लक्षात ठेवा.
 6. -तुम्ही ट्रान्झॅक्शन स्लिप घेतल्यास, वापरल्यानंतर लगेच फाडून टाका.
 7. -तुमचे एटीएम कार्ड हरवले किंवा चोरीला गेल्यास ताबडतोब तुमचे कार्ड जारी करणाऱ्या बँकेला कळवा.
 8. -तुम्ही तुमच्या एटीएममध्ये चेक किंवा कार्ड जमा करता तेव्हा काही दिवसांनी तुमच्या खात्यातील क्रेडिट एंट्री तपासा. तुम्हाला काही फरक दिसल्यास, तुमच्या बँकेला कळवा.
 9. -जर तुमचे कार्ड एटीएममध्ये अडकले असेल किंवा सर्व नोंदी करूनही पैसे दिले जात नसतील, तर लगेच तुमच्या बँकेला कॉल करा.

अधिक वाचा : पैशांप्रामाणे ATM मधून निघणार गहू-तांदूळ; रेशन मिळवण्याची धावपळ होणार बंद, जाणून घ्या कशी मिळेल सुविधा

कोरोना महामारीच्या संकटानंतर अनेक बॅंकांनी एटीएमधील सुविधांमध्ये वाढ केली आहे. काही बॅंकांनी ही घरबसल्या पैसे जमा करण्याची आणि बॅंकेतील आपल्या खात्यातून पैसे काढण्याची सुविधा सुरू केली आहे. याबरोबरच  ग्राहकांना पे ऑर्डर्स, नवीन चेकबुक, नवीन चेकबुक रिक्वेझिशन स्लीप याच्याशी निगडीत सुविधाही दिली जाते आहे. ग्राहकांना फसवणुकीपासून वाचवण्यासाठी तर एसबीआयने ओटीपी सुविधा सुरू केली आहे. एसबीआयच्या एटीएममधील व्यवहार हे ओटीपीवर आधारित आहेत. फसवणूक करणाऱ्यांच्या विरोधातील हे एक प्रकारचे लसीकरणच आहे. एसबीआयच्या नव्या नियमानुसार आता ग्राहक ओटीपीविना कॅश काढू शकणार नाहीत. कॅश काढताना ग्राहकांना त्यांच्या मोबाइल फोनवर एक ओटीपी मिळेल आणि तो टाकल्यानंतरच एटीएममधून कॅश काढता येणार आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी