PM Kisan: पीएम किसान योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बाब, लगेच करा हे काम, नाहीतर खात्यात येणार नाहीत पैसे

eKYC for PM Kisan : सरकार शेतकऱ्यांच्या (Farmers) हितासाठी अनेक योजना राबवत आहे. यापैकी एक पीएम किसान योजना (PM Kisan Yojana) देखील आहे. पीएम किसान योजना केंद्र सरकारद्वारे राबवण्यात येते आहे. पीएम किसान ही केंद्र सरकारची 100% निधी असलेली योजना आहे. या योजनेनुसार शेतकऱ्यांना दिली जाणारी मदतीची रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात वर्ग केली जाते. त्याचा शेतकऱ्यांना खूप फायदा होतो.

PM Kisan Samman Nidhi Yojana
पीएम किसान सम्मान निधी योजना 
थोडं पण कामाचं
  • पीएम किसान योजना केंद्र सरकारद्वारे राबवण्यात येते आहे.
  • शेतकऱ्यांना दिली जाणारी मदतीची रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात वर्ग केली जाते
  • पीएम किसान योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांना लवकरात लवकर ईकेवायसी पूर्ण करावेच लागेल

PM Kisan eKYC : नवी दिल्ली : सरकार शेतकऱ्यांच्या (Farmers) हितासाठी अनेक योजना राबवत आहे. यापैकी एक पीएम किसान योजना (PM Kisan Yojana) देखील आहे. पीएम किसान योजना केंद्र सरकारद्वारे राबवण्यात येते आहे. पीएम किसान ही केंद्र सरकारची 100% निधी असलेली योजना आहे. या योजनेनुसार शेतकऱ्यांना दिली जाणारी मदतीची रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात वर्ग केली जाते. त्याचा शेतकऱ्यांना खूप फायदा होतो. आता पीएम किसान योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांना लवकरात लवकर एक काम पूर्ण करावे लागेल, नाहीतर ते पीएम किसान योजनेचा लाभ मिळण्यापासून वंचित राहू शकतात. पीएम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 12वा हफ्ता लवकरच दिला जाणार आहे.(To get benefit of PM Kian Yojana, Farmers must complete eKYC process)

अधिक वाचा : ITR Filing: कमी पगार असूनही टीडीएस कापला गेला आहे, नो टेन्शन! असा मिळेल रिफंड

हे काम लगेच करा

खरं तर, पीएम किसानच्या लाभार्थ्यांसाठी, केंद्र सरकारने  eKYC पूर्ण करण्याची अंतिम मुदत 31 मे 2022 पासून 31 जुलै 2022 पर्यंत वाढवली आहे. पीएम किसान योजनेसाठी ईकेवायसी बंधनकारक आहे. अशा परिस्थितीत, पीएम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी 31 जुलै 2022 पर्यंत eKYC करून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. अन्यथा पीएम किसान योजनेत मिळणारा लाभ तुम्हाला मिळणार नाही.

अधिक वाचा : Gold-Silver Rate Today,04 July 2022: सोने कडाडले, चांदीदेखील चमकली, पाहा ताजा भाव

हा लाभ मिळवा

यापूर्वी 31 मे 2022 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 10 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM Kisan)अंतर्गत आर्थिक लाभांचा 11 वा हप्ता वितरित केला होता. पीएम-किसान योजनेअंतर्गत, प्रत्येक जमीनधारक शेतकरी कुटुंबाला दर चार महिन्यांच्या अंतराने तीन समान हप्त्यांमध्ये 2 हजार रुपये दिले जातात. त्याचबरोबर शेतकऱ्यांना वर्षभरात एकूण 6 हजार रुपयांचा लाभ मिळतो.

अधिक वाचा : Bank FD: पीएनबी, एचडीएफसी, एसबीआय या बॅंकांमध्ये कोणती बॅंक एफडीवर सर्वाधिक व्याज देतेय ते जाणून घ्या

याप्रमाणे eKYC पूर्ण करा

  1. पीएम किसान https://pmkisan.gov.in/ च्या अधिकृत वेबपेजला भेट द्या.
  2. पेजच्या उजव्या बाजूला उपलब्ध असलेल्या eKYC पर्यायावर क्लिक करा.
  3. आधार कार्ड क्रमांक, कॅप्चा कोड प्रविष्ट करा आणि शोध वर क्लिक करा.
  4. आधार कार्डशी लिंक केलेला मोबाईल नंबर टाका.
  5. 'Get OTP' वर क्लिक करा आणि OTP टाका.
  6. - सर्व तपशील जुळल्यास eKYC पूर्ण केले जाईल, नाहीतर ते बेकायदेशीर किंवा चुकीचे ठरवले जाईल. अशा परिस्थितीत तुम्हाला स्थानिक आधार सेवा केंद्राशी संपर्क साधावा लागेल.

 केंद्रातील मोदी सरकारने या योजनेसाठी ई-केवायसी आणि रेशन कार्ड बंधनकारक केले आहे. ई-केवायसी करवून घेण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2022 आहे. त्यामुळे जर तुम्ही अद्याप ई-केवायसी केले नसेल तर ताबडतोब करा, नाहीतर तुमचा 12 वा (PM Kisan 12th Installment) हप्ता अडकू शकतो. या योजनेमध्ये नोंदणीसाठी रेशन कार्ड बंधनकारक करण्यात आले आहे. आता शेतकऱ्यांना नोंदणी करताना टाकलेला रेशनकार्ड क्रमांक (Ration Card) अपलोड करावा लागेल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी