Gold Price Today | आज पुन्हा घसरले सोन्या-चांदीचे भाव, जाणून घ्या ताजा भाव

Gold rate : सोने आणि चांदीच्या भावात (Gold Silver Price) शुक्रवारी सलग दुसऱ्या दिवशीही घसरण झाली आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर शुक्रवारी सोने 180 रुपयांनी स्वस्त झाले. शुक्रवारी सकाळी घसरणीसह सोन्याचा भाव (Gold Price) 51,715 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​होता. त्याचवेळी, आज चांदीचीही चमक कमी झाली आहे. एमसीएक्सवर चांदी (Silver Price) प्रति किलो 101 रुपयांच्या घसरणीसह 66,664 रुपये प्रति किलोच्या भावावर व्यवहार करते आहे.

Gold Price Today
सोन्याचा ताजा भाव 
थोडं पण कामाचं
  • सोने आणि चांदीच्या भावात शुक्रवारी सलग दुसऱ्या दिवशीही घसरण झाली
  • मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर शुक्रवारी सोने 180 रुपयांनी स्वस्त
  • सोन्याचा भाव (Gold Price) 51,715 रुपये प्रति 10 ग्रॅमवर

Gold Price Today 8 April 2022 update : नवी दिल्ली : सोने आणि चांदीच्या भावात (Gold Silver Price) शुक्रवारी सलग दुसऱ्या दिवशीही घसरण झाली आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर शुक्रवारी सोने 180 रुपयांनी स्वस्त झाले. शुक्रवारी सकाळी घसरणीसह सोन्याचा भाव (Gold Price) 51,715 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​होता. त्याचवेळी, आज चांदीचीही चमक कमी झाली आहे. एमसीएक्सवर चांदी (Silver Price) प्रति किलो 101 रुपयांच्या घसरणीसह 66,664 रुपये प्रति किलोच्या भावावर व्यवहार करते आहे. काही दिवसांपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ झाली होती. मात्र अलीकडच्या काही दिवसांत सोने आणि चांदीच्या (Gold-Silver Price)भावात सातत्याने घसरण होताना दिसते आहे. (Today also Gold & Silver prices fall, check latest rate)

अधिक वाचा : RBI MPC | व्याजदरात बदल नाही...रिझर्व्ह बॅंकेकडून सलग 11व्यांदा रेपो दर 4 टक्केच

24 कॅरेट सोन्याचा भाव

त्याचवेळी आज सराफा बाजारात २४ कॅरेट सोन्याच्या किमतीत वाढ होताना दिसते आहे. 24 कॅरेट सोन्याचा भाव सकाळी 52,663 रुपये असल्याचे सांगितले जात आहे. अशाप्रकारे कालच्या तुलनेत आज त्यात 260 रुपयांनी वाढ झाली आहे. 22 कॅरेट सोन्याचा भावही आज 250 रुपयांनी वाढला आहे. आज 22 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमचा भाव 48,250 रुपये आहे.

मिस्ड कॉल देऊन शोधा सोन्याचे दर 

सोन्या-चांदीची किंमत तुम्ही घरबसल्या सहज जाणून घेऊ शकता. यासाठी तुम्हाला फक्त 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल द्यावा लागेल आणि तुमच्या फोनवर मेसेज येईल. येथे तुम्ही नवीनतम दर तपासू शकता.

अधिक वाचा : HDFC Bank Interest Rates Update | एचडीएफसी बँकेने मुदतठेवींच्या व्याजदरात केली वाढ...पाहा नवे व्याजदर

सोन्याची शुद्धता कशी तपासायची

सोन्याची शुद्धता तपासायची असेल, तर त्यासाठी सरकारने एक अॅप बनवले आहे. 'बीआयएस केअर अॅप'द्वारे ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. या अॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धता तपासू शकत नाही, तर त्यासंबंधी कोणतीही तक्रारही करू शकता.

अधिक वाचा : Lemon Price | लिंबू देता का हो कोणी लिंबू! 400 रुपये प्रति किलो झाल्याने लिंबू पाणी झाले श्रीमंतांचे पेय...सोने झाले स्वस्त, लिंबू महाग

अशी करता येते तक्रार

या अॅपमध्ये वस्तूंचा परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा असल्याचे आढळून आल्यास ग्राहक त्याबाबत तत्काळ तक्रार करू शकतात. या अॅपच्या (गोल्ड) माध्यमातून ग्राहकाला तक्रार नोंदविण्याबाबतही तत्काळ माहिती मिळणार आहे.

24 कॅरेट सोने 99.9 टक्के शुद्ध आणि 22 कॅरेट सुमारे 91 टक्के शुद्ध आहे. 22 कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या 9% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. 24 कॅरेट सोने पूर्ण शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर केला जातो.

सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी ISO द्वारे हॉल मार्क दिले जातात. 24 कॅरेटवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750. बहुतेक सोने 22 कॅरेटमध्ये विकले जाते, तर काही लोक 18 कॅरेट देखील वापरतात. कॅरेट 24 पेक्षा जास्त नसते आणि कॅरेट जितके जास्त असेल तितके अधिक शुद्ध सोने म्हटले जाते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी