PM Kisan Yojana च्या लाभार्थ्यांसाठी आजचा दिवस आहे महत्त्वाचा, आत्ताच करा eKYC, जाणून घ्या कसे कराल kyc

काम-धंदा
भरत जाधव
Updated Aug 31, 2022 | 08:52 IST

तुम्हीही पीएम किसान योजनेचे (PM Kisan Yojana) लाभार्थी (Beneficiary) असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. 11 व्या हप्त्यानंतर आता सरकारने (government) केवायसी अनिवार्य केले आहे. जर तुम्‍ही आत्तापर्यंत या योजनेंतर्गत EKYC केले नसेल, तर ते तात्काळ करा. तुम्‍ही केवायसी केले नाही तर तुम्हाला पुढील हप्ता मिळणार नाही. केवायसीची अंतिम मुदत वाढविण्यात येणार नाहीये.

Today is an important day for the beneficiaries of PM Kisan Yojana
PM Kisan Yojanaच्या लाभार्थ्यांसाठी आजचा दिवस आहे महत्त्वाचा  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी 6 हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते.
  • ईकेवायसी करण्याचा आज अखेरचा दिवस
  • पीएम किसान योजनेअंतर्गत लाभार्थ्यांच्या खात्यात सरकार 2 हजार रुपये पाठवत असते.

PM Kisan Latest Update:  तुम्हीही पीएम किसान योजनेचे (PM Kisan Yojana) लाभार्थी (Beneficiary) असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. 11 व्या हप्त्यानंतर आता सरकारने (government) केवायसी अनिवार्य केले आहे. जर तुम्‍ही आत्तापर्यंत या योजनेंतर्गत EKYC केले नसेल, तर ते तात्काळ करा. तुम्‍ही केवायसी केले नाही तर तुम्हाला पुढील हप्ता मिळणार नाही. केवायसीची अंतिम मुदत वाढविण्यात येणार नाहीये. (Today is an important day for PM Kisan Yojana beneficiaries, do eKYC now, know how to do kyc)

शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी यासाठी केंद्र सरकारने पीएम किसान सन्मान निधी योजना लागू केली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी 6 हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. साधरण चार महिन्यानंतर या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांच्या खात्यात सरकार 2 हजार रुपये पाठवत असते. योजना सुरू झाली होती तेव्हा फक्त योजनेत आपलं नाव नोंदणी करायची होती, त्यानंतर शेतकऱ्यांना निधी मिळत असायचा. परंतु गेल्या काही हप्त्यापासून ईकेवायसी करणं सरकारनं बंधनकारक केलं आहे. 

Read Also : IND vs HK: हाँगकाँगविरुद्ध सामन्यात पंतला संधी?

केंद्र सरकारची घोषणा 

केंद्र सरकारने या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी eKYC  अनिवार्य केली असून याची मुदत वाढवली होती. पीएम किसान पोर्टलवर (pmkisan.gov.in) ही माहिती देण्यात आली आहे. पीएम किसान वेबसाइटवरील फ्लॅशनुसार, 'सर्व PMKISAN लाभार्थ्यांसाठी eKYC अंतिम मुदत 31 ऑगस्ट 2022 आहे'. यापूर्वी त्याची अंतिम मुदत 31 जुलै 2022 होती. म्हणजेच पुन्हा एकदा त्याची अंतिम मुदत जवळ आली नसून तर ती आजच आहे. पुढील हप्ता हवा असेल हातातील काम सोडा आणि आजच केवायसी करा. 

e-KYC शिवाय नाही मिळणार पैसे 

e-KYC शिवाय तुमचा हप्ता अडकू शकतो. पीएम किसान पोर्टलवर असे सांगण्यात आले आहे की, आधार आधारित ओटीपी प्रमाणीकरणासाठी शेतकऱ्यांना किसान कॉर्नरमधील ई-केवायसी पर्यायावर क्लिक करावे लागेल. बायोमेट्रिक प्रमाणीकरणासाठी जवळच्या CSC केंद्राला भेट द्यावी लागेल. हे काम तुम्ही तुमच्या मोबाईल, कॉम्प्युटर किंवा लॅपटॉपवरून घरी बसूनही करू शकता. 

Read Also : पुण्यातील मानाच्या पाच गणपतींची कधी होणार प्राणप्रतिष्ठा

eKYC कशी करायची?

eKYC म्हणजेच Electronic Know your Client. या माध्यमातून इलेक्ट्रॉनिक पद्धतीनं तुमची ओळख पडताळून पाहिली जाते.
आता पीएम किसान योजनेसाठी eKYC करायची असेल, तर सगळ्यात आधी तुम्हाला pmkisan.gov.in असं सर्च करायचं आहे. त्यानंतर पीएम किसान सन्मान निधीची वेबसाईट तुमच्यासमोर ओपन होईल.

ही वेबसाईट उघडल्यावर सगळ्यात वरती तुम्हाला लाल अक्षरात एक सूचना दिसेल. - "eKYC is MANDATORY for PMKISAN Registered Farmers. OTP Based eKYC is available on PMKISAN Portal. You may also contact nearest CSC centres for Biometric authentication based eKYC. Deadline of eKYC for all the PMKISAN beneficiaries has been extended till 31st August 2022."

याचा अर्थ  पीएम किसान योजनेअंतर्गत नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांसाठी eKYC अनिवार्य आहे. ओटीपी बेस्ड ई-केवायसीची सुविधा पीएम किसानच्या पोर्टलवर उपलब्ध आहे. eKYC करण्यासाठीची मुदत 31 ऑगस्ट 2022 पर्यंत आहे.

eKYC करण्यासाठी 2 पर्याय 

एक म्हणजे जर तुमचा फोन नंबर आधार कार्डाशी लिंक असेल तर तुम्ही Aadhar based OTP authentication वापरून eKYC करू शकता. त्यासाठी फार्मर कॉर्नरमधील eKYC या पर्यायावर क्लिक करा. पण, जर तुम्हाला Biometric authentication करायचं असेल, तर जवळच्या सीएससी सेंटरला भेट द्यावी लागेल.

पहिला पर्याय -आधार कार्ड वापरून eKYC कसं करायचं 

  • यासाठी तुम्हाला Farmers Corner मधील eKYC या पर्यायावर क्लिक करायचं आहे.
  • त्यानंतर Aadhar Ekyc नावाचं एक नवीन पेज तुमच्यासमोर ओपन होईल.
  • येथे सुरुवातीला तुम्हाला तुमच्या आधार कार्डचा क्रमांक आणि पुढच्या रकान्यात दिसणारे आकडे आणि अक्षरं जशीच्या तशी टाकायची आहेत.
  • हे टाकून झालं की समोरच्या Search या पर्यायावर क्लिक करायचं आहे.
  • त्यानंतर एक नवीन पेज तुम्हाला दिसेल. येथे सुरुवातीला तुमचा आधार नंबर दिसेल. त्यापुढे तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे. येथे एक लक्षात ठेवायचं ते म्हणजे तुमचा मोबाईल नंबर हा आधार कार्डशी लिंक असणं गरजेचं आहे.
  • मोबाईल नंबर टाकला की पुढच्या Get OTP या पर्यायावर क्लिक करायचं.
  • त्यानंतर तुमच्या मोबाईलवर एक OTP म्हणजेच वन टाईम पासवर्ड पाठवला जाईल. ते तुम्हाला इथल्या OTP या रकान्यात टाकायचे आहेत.
  • मग पुढे असलेल्या Submit for Auth या रकान्यात क्लिक करायचं .
  • त्यानंतर EKYC is Sucessfully Submitted असा मेसेज तिथं येईल. याचा अर्थ तुमची EKYC ची प्रक्रिया पूर्ण झाली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी