Petrol Price Today | पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जाहीर, पाहा तुमच्या शहरातील दर

Fuel price : पेट्रोल (Petrol Price)आणि डिझेलच्या दरात (Diesel Price) आज कोणताही बदल झालेला नाही. पेट्रोल आणि डिझेलचे दर (Petrol-Diesel price hike)त्यांच्या जुन्या स्तरावर राहतील. 6 एप्रिल 2022 रोजी तेलाच्या किंमतीत शेवटची वाढ करण्यात आली होती. त्यानंतर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 80-80 पैशांनी वाढ करण्यात आली. उत्तर प्रदेशसह पाच राज्यांच्या निवडणूक निकालानंतर 16 दिवसांत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 10 रुपयांनी वाढ झाली होती.

Petrol-Diesel Price
पेट्रोल आणि डिझेलचे दर 
थोडं पण कामाचं
  • 17 एप्रिलला पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल नाही
  • दिल्लीत पेट्रोल 105.41 रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे. त्याच वेळी, डिझेलचे नवा दर 96.67 रुपये
  • 22 मार्च 2022 पासून इंधनाच्या किंमती 14 वेळा वाढल्या

Petrol Diesel Price Today 17 April 2022 : नवी दिल्ली  : पेट्रोल (Petrol Price)आणि डिझेलच्या दरात (Diesel Price) आज कोणताही बदल झालेला नाही. पेट्रोल आणि डिझेलचे दर (Petrol-Diesel price hike)त्यांच्या जुन्या स्तरावर राहतील. 6 एप्रिल 2022 रोजी तेलाच्या किंमतीत शेवटची वाढ करण्यात आली होती. त्यानंतर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 80-80 पैशांनी वाढ करण्यात आली. उत्तर प्रदेशसह पाच राज्यांच्या निवडणूक निकालानंतर 16 दिवसांत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 10 रुपयांनी वाढ झाली होती. (Today no change in petrol & diesel prcie, check the rates in your city)

अधिक वाचा : LIC Plan | हा आहे एलआयसीचा सुपरहिट प्लॅन! ४ वर्षांसाठी प्रीमियम भरा आणि मिळवा बंपर फायदे...

नागरिकांवर इंधनाच्या दरांचा बोझा

पेट्रोलियम कंपन्या पेट्रोल (Petrol Price) आणि डिझेलचे दर (Diesel Price) जाहीर करत असतात. आज 17 एप्रिलला पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. आज सलग 10 व्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर ठेवण्यात आले आहेत. पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमतींपासून (Petrol-Diesel price hike) सर्वसामान्य नागरिक हैराण झाले आहेत.

अधिक वाचा : Aadhaar Card Update | आले नवे अद्ययावत आधार पीव्हीसी कार्ड, नवे आधार कसे मिळेल? सोपी ऑनलाइन पद्धत...

विविध शहरातील इंधनाचे दर

दिल्लीत पेट्रोल 105.41 रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे. त्याच वेळी, डिझेलचे नवा दर 96.67 रुपये आहेत. गुरुग्राम पेट्रोल 105.86 रुपये आणि दिल्लीत 97.10 रुपये प्रति लिटर डिझेल विकले जात आहे. चेन्नईमध्ये लोकांना पेट्रोलसाठी 110.85 रुपये आणि डिझेलसाठी 100.98 रुपये खर्च करावे लागतात. कोलकातामध्ये आज पेट्रोल 115.12 रुपये आणि डिझेल 99.83 रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे.

22 मार्च 2022 पासून इंधनाच्या किंमती 14 वेळा वाढल्या आहेत. निवडणुकांमुळे चार महिन्यांहून अधिक काळ देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणतीही वाढ झाली नव्हती.

अधिक वाचा : SBI Home Loan | गृहकर्जावर स्टेट बॅंक देते टॉपअप लोन, क्षणार्धात करा अर्ज, जाणून घ्या पात्रता आणि फायदे

तुमच्या शहराचे दर येथे तपासा

तुम्ही तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे दर रोज एसएमएसद्वारेही पाहू शकता. इंडियन ऑइल (IOC) ग्राहक RSP<डीलर कोड> ९२२४९९२२४९ वर पाठवू शकतात आणि HPCL (HPCL) ग्राहक ९२२२२०११२२ या क्रमांकावर HPPRICE <डीलर कोड> पाठवू शकतात. BPCL ग्राहक 9223112222 या क्रमांकावर RSP<डीलर कोड> पाठवू शकतात.

सर्वात स्वस्त-महाग पेट्रोल आणि डिझेल

18 दिवसांत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 10 रुपयांनी वाढ झाली आहे. देशातील सर्वात महाग पेट्रोल महाराष्ट्रातील परभणीमध्ये 123.46 रुपये प्रति लिटर आहे. तर आंध्र प्रदेशातील चित्तूरमध्ये डिझेल 107.61 रुपये प्रति लिटर आहे. त्याच वेळी पोर्ट ब्लेअरमध्ये सर्वात स्वस्त पेट्रोल 91.45 रुपये आणि डिझेल 85.83 रुपये प्रति लिटर आहे.

आधीच महागाईने त्रस्त झालेला सर्वसामान्य माणूस इंधन दरवाढीने चिंताग्रस्त झाला आहे. इंधनाच्या दरातील वाढीने दैनंदिन वापरातील वस्तूंच्या किंमतीमध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. त्याचादेखील फटका लोकांना बसतो आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी