Petrol Price Today | जबरदस्त दिलासा! पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ नाही, सर्वात स्वस्त पेट्रोल 91.45 रुपये लिटर

Fuel Price : पेट्रोलियम कंपन्यांनी शनिवारी पेट्रोल (Petrol Price) आणि डिझेलचे नवीन दर (Diesel Price) जाहीर केले आहेत. आज 16 एप्रिलला पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. आज सलग 10 व्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर ठेवण्यात आले आहेत. पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमतींपासून (Petrol-Diesel price hike) सर्वसामान्य नागरिक हैराण झाले आहेत. यापूर्वी 6 एप्रिल रोजी इंधनाच्या दरात प्रतिलिटर 80 पैशांनी वाढ करण्यात आली होती.

Petrol-Diesel Price
पेट्रोल आणि डिझेलचे दर 
थोडं पण कामाचं
  • ट्रोलियम कंपन्यांनी शनिवारी पेट्रोल (Petrol Price) आणि डिझेलचे नवीन दर (Diesel Price) जाहीर केले
  • 16 एप्रिलला पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल नाही
  • पाहा देशाच्या विविध भागातील इंधनाचे दर

Petrol Diesel Price Today 16 April 2022 : नवी दिल्ली  :  पेट्रोलियम कंपन्यांनी शनिवारी पेट्रोल (Petrol Price) आणि डिझेलचे नवीन दर (Diesel Price) जाहीर केले आहेत. आज 16 एप्रिलला पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. आज सलग 10 व्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर ठेवण्यात आले आहेत. पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमतींपासून (Petrol-Diesel price hike) सर्वसामान्य नागरिक हैराण झाले आहेत. यापूर्वी 6 एप्रिल रोजी इंधनाच्या दरात प्रतिलिटर 80 पैशांनी वाढ करण्यात आली होती. आजही देशभरात जुने दर लागू आहेत. (Today no rise in petrol & diesel prices, relief to common man)

अधिक वाचा : Rakesh Jhunjhunwala | राकेश झुनझुनवाला यांनी अलीकडेच खरेदी केले या कंपनीचे ४४ लाख शेअर्स...तुमच्याकडे आहेत का?

दिल्लीत पेट्रोलचा दर १०५.४१ रुपये/लिटर 

दिल्लीत आज पेट्रोलचा दर 105.41 रुपये प्रति लिटर आणि डिझेलचा दर आज 96.67 रुपये प्रति लिटर आहे. मुंबईत पेट्रोल 120.51 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 104.77 रुपये दराने विकले जात आहे. कोलकात्यात एक लिटर पेट्रोल आणि डिझेलची किंमत अनुक्रमे 115.12 रुपये आणि 99.83 रुपये आहे. त्याचवेळी, चेन्नईमध्ये एक लिटर पेट्रोलची किंमत 110.85 रुपये आणि डिझेलची किंमत 100.94 रुपये आहे. श्रीगंगानगरमध्ये पेट्रोल 122.93 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 105.34 रुपये प्रति लिटर आहे. भोपाळमध्ये एक लिटर पेट्रोलची किंमत 118.14 रुपये आणि डिझेलची किंमत 101.16 रुपये आहे. पाटण्यात पेट्रोल-डिझेल अनुक्रमे 116.23 रुपये आणि 101.06 रुपये प्रति लिटर आहे.

अधिक वाचा : Property Tips | घर खरेदी करतांय? मग खरेदीपूर्वी तपासा ही 5 कागदपत्रे, होणार नाही फसवणूक

सर्वात स्वस्त-महाग पेट्रोल आणि डिझेल

18 दिवसांत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 10 रुपयांनी वाढ झाली आहे. देशातील सर्वात महाग पेट्रोल महाराष्ट्रातील परभणीमध्ये 123.46 रुपये प्रति लिटर आहे. तर आंध्र प्रदेशातील चित्तूरमध्ये डिझेल 107.61 रुपये प्रति लिटर आहे. त्याच वेळी पोर्ट ब्लेअरमध्ये सर्वात स्वस्त पेट्रोल 91.45 रुपये आणि डिझेल 85.83 रुपये प्रति लिटर आहे.

अधिक वाचा : Insurance buyers, ALERT | ऑनलाइन आरोग्यविमा विकत घेतांय? मग या वेबसाइटपासून राहा सावध...IRDAI ने दिला सावधगिरीचा इशारा

तुमच्या शहराचे दर येथे तपासा

तुम्ही तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे दर रोज एसएमएसद्वारेही पाहू शकता. इंडियन ऑइल (IOC) ग्राहक RSP<डीलर कोड> ९२२४९९२२४९ या क्रमांकावर पाठवू शकतात आणि HPCL (HPCL) ग्राहक ९२२२२०११२२ या क्रमांकावर HPPRICE <डीलर कोड> पाठवू शकतात. BPCL ग्राहक 9223112222 या क्रमांकावर RSP<डीलर कोड> पाठवू शकतात.


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी