Gold Price Today: सोन्याचे भाव वधारले, जाणून घ्या आजचे दर

काम-धंदा
Updated May 13, 2019 | 19:17 IST | टाइम्स नाऊ हिंदी

Gold Price: सोन्याच्या दरात पुन्हा एकदा बदल झालेला दिसतोय. सोन्याचे दर आज वधारले आहेत. तर दुसरीकडे चांदीच्या दरात घसरण झाली आहे. जाणून घ्या सराफा बाजारातील आजचे सोने-चांदी दर...

Gold Rate
सोने-चांदीचे आजचे दर   |  फोटो सौजन्य: Thinkstock

नवी दिल्ली: सोन्याच्या दरात सोमवारी वाढ झाल्याचं पहायला मिळालं. दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याचे दर वधारलेले आहेत. चांदीचे दर मात्र मागणी कमी असल्यामुळं घसरलेले दिसत आहेत. दागिने विक्रेत्यांच्या नव्यानं झालेल्या खरेदीमुळं दिल्लीतील सराफा बाजारात सोमवारी सोन्याच्या दरात ६५ रुपयांनी वाढ झाली आहे. यामुळे सोमवारचा (आजचा) सोन्याचा दर ३३,०१८ रुपये प्रति १० ग्रॅम इतका झाला आहे. अखिल भारतीय सराफा संघानुसार, औद्योगिक संस्था आणि नाणे निर्मित्यांनी उचल कमी केल्यामुळं चांदीचे दर १७५ रुपयांनी घसरले आहेत. त्यामुळे सोमवारी चांदीचा दर ३८,००० रुपये प्रति किलो इतका झाला.

बाजारातील सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जागतिक बाजारातील कमजोरीनंतरही स्थानिक दागिन्यांच्या व्यापाऱ्यांसोबत किरकोळ व्यावसायिकांच्या वाढलेल्या मागणीमुळे सोन्याचा भाव वधारला आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर न्यूयॉर्कमध्ये सोन्याच्या दरात अगदी किरकोळ अशा घट नंतर सोन्याचे दर १,२८३.९ डॉलर प्रति औंस राहिले, तर चांदीच्या दरातही घसरण झाली असून चांदीचे दर १४.७३ डॉलर प्रति औंस राहिले.

शनिवारी सोन्याच्या दरात ५३ रुपयांनी वाढ झाली होती. त्यामुळे शनिवारी सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ३२,९५३ रुपयांवर पोहोचला होता. दिल्लीतील सराफा बाजारात ९९.९ टक्के आणि ९९.५ टक्के शुद्ध सोन्याच्या दरात ६५-६५ रुपयांनी वाढ झाली. या वाढीनंतर सोन्याचे दर क्रमश: ३३,०१८ आणि ३२,८४८ प्रति १० ग्रॅम होते. तर आठ ग्रामच्या गिन्नीचे दर सुद्धा १०० रुपयांनी वाढले असून त्याचा भाव २६,५०० रुपये प्रति प्रति युनिट बंद झाले.

तर चांदीचा दर १७५ रुपयांच्या घसरणीनंतर ३८,००० रुपये प्रति किलो राहिला. तर साप्ताहिक वितरण चांदीची किंमत २६७ रुपयांच्या वाढीसोबत ३७,२९० रुपये प्रति किलो झाला. दुसरीकडे चांदीचे नाणे खरेदी आणि विक्री क्रमश: ७९,००० रुपये आणि ८०,००० रुपये प्रति शेकडा वर स्थिर राहिले. 

दरम्यान, सोने-चांदीच्या दरांमध्ये काही दिवसांपासून विशेष असा बदल झालेला दिसत नाहीये. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय्य तृतीयेच्या दिवशीही सोन्याचे दर कमी होते. त्यामुळं ग्राहकांनीही मोठ्या संख्येनं मुहूर्तावर सोनं-चांदी खरेदी केलं. त्यानंतर आता सोन्याचे दर वाढलेले दिसत आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी