आता वाहनांना FASTag चीही गरज नाही !, नितीन गडकरींनी सांगितली टोल वसुलीची नवीन योजना

Toll collection : 'एखादी व्यक्ती 10 किमीचा टोल रस्ता वापरतो, पण त्याला 75 किमीसाठी टोल भरावा लागतो, पण आता जेथून वाहन जितके अंतर कापले तेवढ्याच टोल भरावी लागणार आहे.

Toll collection will be done through satellite from moving vehicle, Fastag is also not needed, Nitin Gadkari told the plan
आता वाहनांना FASTag ची गरजच नाही !, नितीन गडकरींनी सांगितली टोल वसुलीची नवीन योजना  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • जीपीआरएसद्वारे वाहनांची ओळख पटवली जाईल
  • फास्टॅग लागू करूनही लोक रोखीने टोल भरत आहेत
  • ग्रीन एक्सप्रेस हायवे बनवण्याच्या कामाला वेग आला

Toll Tax via satellite : जेव्हा FASTag सादर करण्यात आला, तेव्हा भारतातील टोल वसुली प्रक्रियेतील एक क्रांतिकारी पाऊल म्हणून पाहिले गेले आणि देशभरात त्याची अंमलबजावणी करण्यात आली. मात्र आता त्यापुढे जाऊन वाहनाच्या नंबर प्लेटवरून उपग्रहावर आधारित टोलवसुलीची प्रक्रिया देशात सुरू करण्याची तयारी सुरू आहे. यामध्ये चालत्या वाहनांकडून सॅटेलाईटद्वारे टोल वसुली केली जाणार असून त्यासाठी फास्टॅगची गरज भासणार नाही. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी याबाबत माहिती दिली आहे. (Toll collection will be done through satellite from moving vehicle, Fastag is also not needed, Nitin Gadkari told the plan)

अधिक वाचा : दहा दिवसांत केंद्र सरकारला मिळणार १३५०० कोटी रुपये

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी बुधवारी राज्यसभेत प्रश्नोत्तराच्या तासात एका प्रश्नाला उत्तर देताना ही माहिती दिली. अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून टोलवसुलीत सुधारणा करण्यास पूर्ण वाव असल्याचे ते म्हणाले. यातून ना कोणी टोल चोरू शकतो ना कोणाला पळून जाता येणार आहे. आतापर्यंत टोल न भरल्यास शिक्षेची तरतूद नाही. एवढेच नाही तर हे नवे तंत्रज्ञान लागू करण्यासाठी संसदेत विधेयक आणण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे गडकरी म्हणाले. त्यानंतर सहा महिन्यांत ही प्रणाली देशात लागू करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. यामुळे ना टोल भरावा लागणार आहे ना कोणी टोल भरू शकणार आहे. यातून पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना शिक्षा होईल.

अधिक वाचा : ​FD Interest Rates : या 5 बँका एफडीवर देतायेत 7% पेक्षा जास्त व्याजदर...गुंतवणुकीची उत्तम संधी
ते म्हणाले की वाहन उत्पादकांना वाहनांमध्ये जीपीआरएस सुविधा देण्यास सांगितले आहे जेणेकरून टोल वसुली सुलभ होईल आणि लोकांनाही दिलासा मिळेल. सध्या एखादी व्यक्ती 10 किमीचा टोल रस्ता वापरते परंतु त्याला 75 किमीसाठी टोल भरावा लागतो परंतु जीपीआरएस आधारित टोल वसुली प्रक्रिया सुरू झाल्यावर जेवढा प्रवास करणार तेवढाच टोल द्यावा लागणार आहे. यामुळे ग्राहकांचीही बचत होणार आहे. देशातील वाहनांमध्ये टोलवसुली करण्यासाठी फास्टॅग बसवूनही वसुली पूर्ण होत नसल्याचेही गडकरी म्हणाले. सध्या त्यातून दररोज 120 कोटी रुपये वसूल केले जात आहेत. ९७ टक्के लोक हा फास्टॅग वापरत आहेत

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी