New Rules from 1st February: नवी दिल्ली : प्रत्येक महिन्याप्रमाणे फेब्रुवारी महिन्यातही (February Month) देशात अनेक बदल होणार आहेत. याचा थेट परिणाम तुमच्या जीवनावर होईल. त्यामुळे त्याबद्दल जाणून घेणे तुमच्यासाठी महत्त्वाचे आहे. 1 फेब्रुवारीपासून काही महत्त्वाचे बदल (Changed from 1st February) होणार आहे. त्यातच 1 फेब्रुवारीला केंद्रीय अर्थसंकल्प (Union Budget 2022) सादर होणार आहे. त्यामुळे अनेक बाबींमधील बदल लागू होऊ शकतात. तुम्ही यांवर लक्ष ठेवा कारण त्याचा परिणाम थेट तुमच्यावर खिशावर होऊ शकतो. 1 फेब्रुवारीपासून देशात होणारे 5 मोठे बदल पाहूया. (5 big changes that will happen from 1st February, check the details)
पुढील महिन्यापासून म्हणजे फेब्रुवारीपासून स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) पैसे ट्रान्सफर करण्याच्या नियमांमध्ये मोठे बदल करत आहे. देशातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक असलेली एसबीआय आपल्या बँक शाखांमध्ये केल्या जाणाऱ्या तात्काळ पेमेंट सेवेसाठी (IMPS) शुल्क वाढवत आहे. SBI च्या वेबसाइटनुसार, 1 फेब्रुवारी 2022 पासून IMPS व्यवहारांसाठी नवीन स्लॅब जोडण्यात आला आहे. आता IMPS द्वारे 2 लाख ते 5 लाख रुपयांपर्यंतचे पैसे ट्रान्सफर करण्यासाठी बँक GST सोबत 20 रुपये आकारेल.
बँक ऑफ बडोदा देखील ग्राहकांसाठी नियम बदलत आहे. १ फेब्रुवारीपासून चेक क्लिअरन्सशी संबंधित नियम बदलत आहेत. पुढील महिन्यापासून चेक पेमेंटसाठी कन्फर्मेशन अनिवार्य असेल. कोणतीही पुष्टी नसल्यास, धनादेश परत केला जाईल. याला पॉझिटिव्ह पे कन्फर्मेशन असे नाव देण्यात आले आहे. नवीन नियमानुसार, जर तुम्हाला चेक द्यायचा असेल, तर तुम्हाला चेकशी संबंधित काही महत्त्वाची माहिती बँकेला द्यावी लागेल. यामुळे जास्त किमतीचे चेक पास करणे कठीण होणार नाही.
स्टेट बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ बडोदा व्यतिरिक्त पंजाब नॅशनल बँक (पीएनबी) देखील पुढील महिन्यापासून नियम बदलत आहे, ज्याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर होणार आहे. या अंतर्गत, तुमच्या खात्यात पैसे नसल्यामुळे हप्ता किंवा गुंतवणूक अयशस्वी झाल्यास, तुम्हाला दंड भरावा लागेल. यासाठी 250 रुपये मोजावे लागणार आहेत. सध्या 100 रुपये दंड आहे.
पेट्रोलियम कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या दिवशी एलपीजीच्या किमतीत सुधारणा करतात. आता १ फेब्रुवारीपासून ग्राहकांना सिलिंडर स्वस्त होणार की महाग, हे पाहावे लागेल.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारी 2022 रोजी सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर करणार आहेत. यंदाच्या अर्थसंकल्पाकडून सर्वच क्षेत्रांना मोठ्या अपेक्षा आहेत. अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी सरकार मोठ्या घोषणा करू शकते. कोरोना विषाणूच्या महामारीच्या पार्श्वभूमीवर यंदाचा सर्वसाधारण अर्थसंकल्प अधिक महत्त्वाचा आहे.