Property Tips | घर खरेदी करतांय? मग खरेदीपूर्वी तपासा ही 5 कागदपत्रे, होणार नाही फसवणूक

Real Estate : घर खरेदी (Nome) करणे हे प्रत्येकाचेच एक मोठे स्वप्न असते. तुमचेही असेच छानसे स्वप्न असेल. मात्र घर खरेदी करताना आपल्या कमाईचा खूप मोठा हिस्सा पणाला लागतो हे तुम्हाला नक्की पटेल. अशावेळी आपला घर किंवा प्रॉपर्टी खरेदीचा (Property) व्यवहार नीट झाला पाहिजे, कागदोपत्री कोणतीही अडचण येता कामा नये आणि मुख्य म्हणजे आपली कोणत्याही प्रकारची फसवणूक (Fraud) होता कामा नये ही प्रत्येकाचीच इच्छा असते. तुमचीदेखील हीच इच्छा नक्की असेल.

Important documents of a property
मालमत्ता किंवा घर विकत घेण्यापूर्वी तपासायची कागदपत्रे 
थोडं पण कामाचं
  • घर खरेदी करताना आपल्या कमाईचा खूप मोठा हिस्सा पणाला लागतो
  • घर खरेदी करताना अडचण येता कामा नये आणि मुख्य म्हणजे आपली कोणत्याही प्रकारची फसवणूक होता कामा नये ही प्रत्येकाचीच इच्छा
  • घर विकत घेताना काही गोष्टींची खबरदारी घेतलीत आणि त्यांची योग्य तपासणी केलीत तर तुमची फसवणूक होणार नाही

Tips for Home Buyers : नवी दिल्ली : घर खरेदी (Nome) करणे हे प्रत्येकाचेच एक मोठे स्वप्न असते. तुमचेही असेच छानसे स्वप्न असेल. मात्र घर खरेदी करताना आपल्या कमाईचा खूप मोठा हिस्सा पणाला लागतो हे तुम्हाला नक्की पटेल. अशावेळी आपला घर किंवा प्रॉपर्टी खरेदीचा (Property) व्यवहार नीट झाला पाहिजे, कागदोपत्री कोणतीही अडचण येता कामा नये आणि मुख्य म्हणजे आपली कोणत्याही प्रकारची फसवणूक (Fraud) होता कामा नये ही प्रत्येकाचीच इच्छा असते. तुमचीदेखील हीच इच्छा नक्की असेल. मात्र यासाठी तुम्ही जागरुक राहिले पाहिजे. घर विकत घेताना काही गोष्टींची खबरदारी (Tips for property buyers) घेतलीत आणि त्यांची योग्य तपासणी केलीत तर तुमची आयुष्यभराची कमाई खड्ड्यात जाणार नाही. जाणून घेऊया घर खरेदी करतानाच्या या 5 महत्त्वाच्या टिप्स. (Top 5 documents to be verified before you buy any property to avoid the fraud)

अधिक वाचा : Gold Price Today | सोने आणि चांदीची झळाळी वाढली, सुरू झाली तेजी, पाहा कुठपर्यत पोचला भाव

घर खरेदी करण्यापूर्वी तपासा ही 5 महत्त्वाची कागदपत्रे आणि व्हा निश्चिंत-

  1. - मालमत्ता विकत घेण्यापूर्वी, तुम्ही खरेदी करत असलेली जमीन किंवा घर कोणत्याही नियामक प्राधिकरणाच्या अखत्यारीत येते की नाही याची पूर्ण तपासणी करा. म्हणजेच मालमत्ता महापालिका, नगरपालिका यांसारख्या प्राधिकरणाच्या मर्यादेत येते की नाही हे तपासून घ्या. अनेकवेळा हद्दीतील किंवा हद्दीजवळच्या घर किंवा प्लॉटसंदर्भात काही गुंतागुंत असते. व्यवहार करताना ही बाब पाहिली जात नाही आणि नंतर डोक्याला हात लावायची वेळ येते.
  2. - तुम्हाला हे देखील जाणून घेणे आवश्यक आहे की तुम्ही तुमचे स्वप्नातील जे घर खरेदी करणार आहात त्यासाठी संबंधित प्राधिकरणाने सर्व मंजूरी दिली आहेत की नाही? याशिवाय बिल्डरकडे टायटल डीड, रिलीझ सर्टिफिकेट, मालमत्ता कराची पावती, अग्निशमन मंजूरी अशी प्रकल्पाची सर्व कागदपत्रे उपलब्ध आहेत ना, हेही पाहायचे आहे. ही सर्व महत्त्वाची कागदपत्रे आहेत जी तुम्ही तपासली पाहिजेत. याचबरोबर तुम्ही जमिनीच्या वापरासाठी पडताळणी आणि RERA प्रमाणपत्र देखील पाहणे महत्त्वाचे आहे.
  3. - आणखी एक महत्त्वाचे कागदपत्र म्हणजे बांधकाम मंजुरी प्रमाणपत्र. तुम्ही विकासकाकडून बांधकामाधीन मालमत्ता खरेदी करत असताना हा दस्तऐवज अनिवार्य आहे. तो बिल्डरचा फ्लॅट, जमीन किंवा घर असू शकतो. या प्रमाणपत्रामध्ये स्थानिक प्राधिकरणांकडून किंवा प्रशासनाकडून आवश्यक मान्यता, परवाने आणि परवानग्या मिळाल्यानंतरच बांधकाम सुरू केल्याचा पुरावा आहे.
  4. - जर तुम्ही मेट्रो कनेक्टिव्हिटी किंवा कोणत्याही मोठ्या प्रकल्पाजवळ गुंतवणूक केली तर भविष्यात तुमच्या मालमत्तेची किंमत वाढण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे तुम्हाला त्यातून चांगला परतावा मिळू शकतो. याशिवाय तुमच्या मालमत्तेजवळ घाण पसरवणारा उद्योग तर नाही ना हेही पाहावे. यासोबतच तुम्ही खरेदी करत असलेल्या प्रॉपर्टीमध्ये शाळा, हॉस्पिटल यासारख्या सुविधा आहेत की नाही हे देखील तपासा.
  5. - प्रकल्पाचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतरच स्थानिक अधिकाऱ्यांकडून हे प्रमाणपत्र दिले जाते. यावरून हे सिद्ध होते की बांधलेली मालमत्ता कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर नियमांचे उल्लंघन करत नाही. त्यात पाणी, सांडपाणी आणि वीज जोडण्यांशी संबंधित माहितीही आहे. त्यामुळे हे प्रमाणपत्र मिळालेले आहे की नाही याची खातरजमा करून घ्या.

अधिक वाचा : 7th Pay Commission | आनंदाची बातमी! ४७ लाख कर्मचारी आणि ६८ लाख पेन्शनधारकांसाठी ...पाहा कोणाला, किती मिळणार फायदा

एकदा का तुम्ही ही सर्व महत्त्वाची कागदपत्रे तपासलीत की स्वप्नातील घराची खरेदी तुम्ही निश्चिंतपणे करू शकता.

अधिक वाचा : 7th Pay Commission update | सरकारी कर्मचाऱ्यांना स्वस्तात बांधता येणार घर, सरकारचा मोठा निर्णय


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी