Government Schemes For Girl In India: मुलींचे शिक्षण आणि सक्षमीकरण हा मुद्दा आपल्या समाजात अनेक दशकांपासून गाजत आहे. आजही देशात एका मोठ्या वर्गामध्ये मुलींबद्दल नकारात्मक विचारसरणी ठेवल्यामुळे त्या शिक्षणासारख्या मूलभूत अधिकारांपासून वंचित राहतात आणि मुलींकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिले जाते. मात्र, राज्य आणि केंद्र सरकार मुलींची सतत कमी होत चाललेली लोकसंख्या आणि त्यांचा सामाजिक दर्जा सुधारण्यासाठी वेळोवेळी वेगवेगळ्या योजना राबवत असते. या सर्व योजनांच्या माध्यमातून सरकार महिलांना लाभ देण्याचा प्रयत्न करते. ज्यामुळे मुलीच्या कुटुंबीयांना तिच्या शिक्षण आणि लग्नाबाबत आर्थिक संकटाचा सामना करावा लागू नये. (Top Five Government Schemes For Girls Education )
मुलींचे पालक त्यांच्या उत्पन्नातील ठराविक रक्कम या योजनांमध्ये गुंतवून त्यांचे भविष्य सुधारू शकतात. मात्र या योजनांची माहिती नसल्याने आजही लोक त्यापासून वंचित आहेत. यासाठीच आज आम्ही तुम्हाला अशा पाच योजनांबद्दल सांगणार आहोत ज्याद्वारे मुलगी जन्माला येताच तुम्ही तिचे भविष्य सुरक्षित करू शकता.
या योजनेंतर्गत सरकार मुलीच्या जन्मानंतर 500 रुपयांची मदत करते. यात सरकार दहावीपर्यंत मुलीच्या खात्यात ठराविक रक्कम जमा करते. बालिका समृद्धी योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणत्याही पोस्ट ऑफिस किंवा बँकेत खाते उघडता येते. या खात्यात गुंतवलेल्या रकमेवर सरकारकडून व्याजही दिले जाते. तुम्ही 18 वर्षांच्या वयानंतरच जमा केलेली रक्कम काढू शकता.
अधिक वाचा: PPF आणि सुकन्या समृद्धी गुंतवणूकदारांसाठी नवीन नियम, अन्यथा ३१ मार्चनंतर भरावा लागणार दंड
सुकन्या समृद्धी योजना मुलींना लाभ पोहचविण्यासाठी सुरु केलेली एक योजना आहे. ही केंद्र सरकारच्या 'बेटी बचाओ बेटी पढाओ' योजनेचा हा एक महत्त्वाचा भाग आहे. या योजनेअंतर्गत 10 वर्षांखालील मुलींचे पालक त्यांच्या मुलीसाठी खाते उघडू शकतात. हे खाते कोणत्याही भारतीय बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये उघडता येते. या योजने अंतर्गत वर्षाला किमान 250 आणि कमाल 1.5 लाख रुपये खात्यात जमा करावे लागतील. ही रक्कम मुलीचे वय 18 वर्षे होईपर्यंत किंवा तिचे लग्न होईपर्यंत ठेवता येते.
CBSE उडान योजना देशातील गरीब आणि मध्यम कुटुंबातील मुलींच्या स्वप्नांना पंख देण्यासाठी केंद्र सरकारद्वारे चालवली जाते. या योजनेंतर्गत अभियांत्रिकी आणि वैद्यकीय प्रवेशासाठी 12वी उत्तीर्ण विद्यार्थिनींना शासकीय मदत म्हणजेच शिष्यवृत्ती दिली जाते. यासोबतच महागडी पुस्तके आणि इतर सुविधा पुरविल्या जातात. ही योजना भारत सरकारच्या मानव संसाधन मंत्रालयाने सुरू केली होती. या योजनेअंतर्गत मुलींना ऑनलाईन आणि ऑफलाईन शिक्षणाची सुविधाही दिली जात आहे. यात मुलींना एक टॅबलेट दिला जातो ज्यामध्ये अभ्यासाचे साहित्य प्रीलोड केलेले असते.
अधिक वाचा: Finance Alert : 31 मार्चपर्यंत 'हे' काम न केल्यास बंद होणार तुमचे खाते, काय आहेत नियम?
मुख्यमंत्री लाडली योजना झारखंड राज्याने सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत मुलीच्या नावाने पोस्ट ऑफिसमध्ये बचत खाते उघडले जाते, ज्यामध्ये 5 वर्षांच्या कालावधीसाठी 6000 रुपये जमा केले जातात.
राज्यातील मुलींना सुशिक्षित, सक्षम आणि स्वावलंबी बनवण्यासाठी केंद्र सरकारने लाडली लक्ष्मी योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत मुलीच्या जन्मानंतर पाच वर्षांपर्यंत 6 हजार रुपये जमा करता येतात. त्यानंतर ही रक्कम वाढते. यासोबतच राज्य सरकारकडून अभ्यासासाठी वेळोवेळी शिष्यवृत्ती दिली जाते आणि 21 वर्षे पूर्ण झाल्यावर, राज्य सरकार 1 लाख रुपये अंतिम रक्कम अदा करते.