Traffic Fines : वाहतूक पोलिसांची मनमानी चालणार नाही; बळजबरीने चुकीचे चलन कापले तर करा हे काम

काम-धंदा
Updated Jan 14, 2022 | 13:12 IST | टाइम्स नाऊ मराठी

Traffic Challan Information | मोटारसायकल किंवा स्कूटर घेऊन रस्त्यावरून जात असेल तर वाहतुकीचे नियम नीट पाळणे गरजेचे आहे. जर वाहतूक नियमांचे पालन केले नाही तर वाहतूक पोलिस चलन कापून दंड आकारू शकतात. अशा परिस्थितीत आपल्याकडे दोन परिस्थिती असतात. पहिली म्हणजे वाहतूक पोलिस आणि आपण दोघे सहमत आहे की आपण वाहतूक नियमांचे उल्लंघन केले आहे आणि दुसरी परिस्थिती अशी आहे की पोलिस आणि आपले एकमत नसते.

Traffic fines The traffic police will not act arbitrarily if your wrong currency is forcibly deduct
वाहतूक पोलिसांनी बळजबरीने चुकीचे चलन कापले तर करा हे काम  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • कोणत्याही वाहतूक पोलिसाने चालकावर जबरदस्ती केली आणि त्याचे चुकीचे चलन कापले तर तो संबंधित विभागाच्या उच्चपदावरील अधिकाऱ्यांकडे तक्रार करू शकतो.
  • चुकीचे चलन कापल्यास चालक न्यायालयात आव्हान देऊ शकतो.
  • तक्रारीच्या आधारे वाहन चालकावर जबरदस्ती करणाऱ्या पोलिसावरही कारवाई होऊ शकते.

Traffic Challan Information| नवी दिल्ली:  मोटारसायकल किंवा स्कूटर घेऊन रस्त्यावरून जात असाल तर वाहतुकीचे नियम नीट पाळणे गरजेचे आहे. जर वाहतूक नियमांचे पालन केले नाही तर वाहतूक पोलीस चलन कापून दंड आकारू शकतात. अशा परिस्थितीत आपल्याकडे दोन परिस्थिती असतात. पहिली म्हणजे वाहतूक पोलीस आणि आपण दोघे सहमत आहे की आपण वाहतूक नियमांचे उल्लंघन केले आहे आणि दुसरी परिस्थिती अशी आहे की पोलीस आणि आपले एकमत नसते. बऱ्याचदा वाहतूक करणाऱ्या व्यक्तीचे म्हणणे असते की त्याने नियमांचे उल्लंघन केले नाही मात्र पोलीस बळजबरी करून दंड आकारतात. त्यामुळे वाहतूक पोलिसांबाबत अनेक तक्रारी समोर आल्याचे पाहायला मिळते. कित्येक वेळा रस्त्यावरच वाहतूक पोलीस आणि वाहन चालकांमध्ये वाद होतात. (Traffic fines The traffic police will not act arbitrarily if your wrong currency is forcibly deduct).  

वरिष्ठ अधिकाऱ्याकडे तक्रार करा

जर रस्त्यावरून वाहन चालवताना वाहतूक पोलिसांसोबत अशी परिस्थिती उद्भवली तर आता आपली सक्ती आहे असे समजणे सक्तीचे नाही. कारण आता चालकाकडे वरिष्ठांकडे तक्रार करण्याचा पर्याय उपलब्ध आहे. कोणत्याही वाहतूक पोलिसाने चालकावर जबरदस्ती केली आणि त्याचे चुकीचे चलन कापले तर तो  संबंधित विभागाच्या उच्चपदावरील अधिकाऱ्यांकडे तक्रार करू शकतो. जर कोणाला अधिकृतरित्या तक्रार करायची असेल तर ते ती लेखी स्वरूपात करू शकतात. याशिवाय माहिती देण्यासाठी संबधित अधिकाऱ्याला कॉल देखील करू शकतात. दरम्यान संबधित राज्यातील पोलिस विभागाच्या अधिकृत वेबसाइटवरून विभागातील अधिकाऱ्यांची संख्या मिळेल.

Also Read : बारावीच्या विद्यार्थी आणि पालकांसाठी मोठी बातमी !

वाहतूक पोलिस सेलशी संपर्क साधा

जर एखाद्या वाहतूक पोलिसाने चुकीचे चलन कापल्यास जवळच्या वाहतूक पोलिस कक्षात जाऊन संबंधित अधिकाऱ्याशी बोलणे आवश्यक आहे. त्यांना संपूर्ण गोष्ट समजावून सांगून केलेली कारवाई चुकीची आहे हे निदर्शनास आणून दिले पाहिजे. जर ते त्यांना मान्य असेल, तर तेथून ते चलन परत रद्द केले जाईल परंतु जर चालकाचे चलन योग्यरित्या कापले गेले आहे असे त्यांना वाटत असेल तर ते चलन रद्द केले जाणार नाही. लक्षणीय बाब म्हणजे तक्रारीच्या आधारे वाहन चालकावर जबरदस्ती करणाऱ्या पोलिसावरही कारवाई होऊ शकते.

यानंतर देखील संबधित वाहन चालक समाधानी नसेल तर त्याच्याकडे कोर्टात जाण्याचाही मार्ग आहे. तो चलनला न्यायालयात आव्हान देऊ शकतो, जिथे तो त्याचे म्हणणे मांडेल आणि तो त्या चलनला आव्हान का देत आहे ते न्यायालयाला सांगेल. त्याला न्यायालयात सांगावे लागेल की त्याच्याच्याकडून कोणतीही चूक झालेली नाही आणि पोलिसांनी गैरसमजामुळे किंवा इतर कोणत्याही कारणामुळे त्याचे चलन कापले आहे. जर न्यायालयाने हे मान्य केले, तर ते चलन रद्द करेल आणि त्याला त्याचा दंड भरण्याची गरज भासणार नाही.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी