कोरोना लॉकडाउन: ३ महिने EMI न भरणाऱ्यांना द्यावं लागेल अधिकचं व्याज

काम-धंदा
Updated Mar 30, 2020 | 15:41 IST | टाइम्स नाऊ हिंदी

जर आपण पुढील तीन महिने कर्जाचे ईएमआय भरू इच्छित नसाल तर ही बातमी खास आपल्यासाठी आहे. तीन महिन्यांनंतर आपल्याला काय-काय भरावं लागेल हे जाणून घ्या...

EMI
३ महिने EMI न भरण्याचं ठरवलेल्यांसाठी महत्त्वाची बातमी  |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

  • ३ महिने कर्जाचे हप्ते न भरायचं ठरवलं असेल तर पहिले त्यानंतर तुम्हाला किती रक्कम भरावी लागेल जाणून घ्या
  • आरबीआयनं कर्जाच्या हप्तांमध्ये तीन महिन्यांसाठी दिली सवलत
  • क्रेडिट कार्ड बिलावर काय होणार याचा परिणाम जाणून घ्या

नवी दिल्ली: कोरोना व्हायरसच्या प्रकोपामुळे देशभरात आर्थिक मंदीचं सावट असल्यामुळे भारतीय रिझर्व्ह बँकेनं कर्जदारांना पुढील तीन महिन्यांसाठी होन लोन किंवा ईएमआय न भरल्यास चालेल, अशी सवलत दिलीय. आरबीआयच्या या घोषणेनंतर जर आपण पुढील तीन महिने ईएमआय न भरण्याचा विचार करत असाल तर आपल्या तीन महिन्यांच्या ईएमआयवरील अधिकचं व्याज देण्यासाठी सज्ज राहा.

विश्लेषक आणि तज्ज्ञांचं म्हणणं आहे की, याचा फायदा घेणाऱ्या ग्राहकांचे तीन हप्ते तर वाढतीलच, सोबतच त्यांना या तीन महिन्यांच्या कालावधीचं अधिकचं व्याज पण भरावं लागेल, जे तीन महिन्यांच्या अखेरीस आपल्या ईएमआयशी जोडलं जाईल.

आरबीआयनं टर्म लोनचा हप्ता भरण्यासाठी तीन महिन्यांची सूट दिलीय. सर्व प्रकारच्या बँकांना सर्व प्रकराच्या टर्म लोनचं ईएमआय वसूल करण्यापासून थांबविण्यात आलंय. ग्राहक स्वत:हून कर्जाचा हप्ता भरू शकतात, बँक या तीन महिन्यात ग्राहकांवर कर्जाचा हप्ता भरण्यासाठी दबाव टाकणार नाही.

यामुळे आपलं ईएमआय वाढेल

उदाहरणार्थ: जर आपण १००० रुपये ईएमआय भरत असाल आणि बँकचे व्याज दर १० टक्के असेल तर आपल्याला तीन महिन्यांनंतर आपल्या या तिन्ही ईएमआयवर २५-२५ रुपये अधिक द्यावे लागतील. हे अधिकचं व्याज आपल्या भविष्यातील सर्व ईएमआयसोबतही जोडलं जावू शकतं.

आर्थिक क्षेत्रातील एका तज्ज्ञांनुसार, ग्राहकांना हे अधिकचं व्याज एकत्र भरावं लागेल किंवा अधिकच्या ईएमआयच्या रूपात ते भरता येऊ शकतं, हे सर्व बँक ठरवेल त्यांना व्याज कसं हवंय ते.

आपल्या क्रेडिट स्कोअरवर परिणाम होणार नाही

तर क्रेडिट कार्डचं बिल भरण्यासाठीही तीन महिन्यांची सूट लागू असेल. या अंतर्गत पुढील तीन महिन्यांपर्यंत अशा कुठल्याही व्यक्तीच्या खात्यातून ईएमआय कापलं जाणार नाही, ज्यांनी कर्ज घेतलेलं असेल. तसंच त्यामुळे आपल्या क्रेडिट स्कोअरवर सुद्धा कुठलाही परिणाम होणार नाहीय.

तीन महिन्यांपर्यंत कर्जाचे हप्ते आपण चुकवले तर याला डिफॉल्ट मानलं जाणार नाही. तीन महिन्यांनंतर आपलं ईएमआय पुन्हा सुरू होईल.

याचा अर्थ असा नाही की, रक्कम कधीही भरावी लागणार नाही. सवलत फक्त तीन महिन्यांसाठीच दिली गेलीय. यानंतर कर्ज फेडावंच लागले. हे पाऊल आरबीआयनं यासाठी उचललंय की, लॉकडाऊनमुळे ज्यांच्याजवळ खरंच नगदी रक्कमची कमतरता असते, तर त्यांना कर्ज फेडण्यासाठी काही वेळ मिळू शकतो.

SBI नं लगेच तीन महिन्यांच्या ईएमआयसाठी दिली मुभा

स्टेट बँकेनं यासोबतच किरकोळ आणि एकमुखी मोठ्या रकमेवरील व्याज दरांमध्ये ०.२० पासून १ टक्क्यांपर्यंतची कपात केलीय. लॉकडाऊनमुळे येणाऱ्या आर्थिक समस्येचा सामना करण्यासाठी लोकांच्या मदतीसाठी म्हणून एसबीआयनं तीन महिन्यांचं ईएमआय भरण्यासंदर्भात मुभा दिलीय.

स्टेट बँकेनं शुक्रवारी याची घोषणा केली होती की, सर्व टर्म लोनचे ईएमआय पुढील तीन महिन्यासाठी टाळण्यात आले आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी