Indian Railway Rules | ट्रेनमध्ये तिकिट तपासनीस केव्हाही तपासू शकत नाही तिकिट...पाहा नियम आणि तुमचे अधिकार

Ticket checking rules: भारतीय रेल्वेचे नेटवर्क हे जगातील चौथ्या क्रमांकाचे नेटवर्क आहे. तुम्ही रेल्वेने (Train) प्रवास करत असताना तुमचे अधिकार आणि रेल्वेचे नियम (Indian Railway Rules) याविषयी तुम्हाला माहित असले पाहिजे. रेल्वे प्रवासात तुमच्या इच्छेविरुद्ध तुम्हाला कोणीही डिस्टर्ब करू शकत नाही, विशेषत: तिकिट तपासनीस (TTE)कधीही तुमचे तिकिट तपासू शकत नाही. रात्री १० वाजेनंतर तिकिट तपासनीस म्हणजे ट

Indian Railway Rules
भारतीय रेल्वेचे नियम 
थोडं पण कामाचं
  • रेल्वे प्रवास करताना रेल्वेचे काही नियम तुम्हाला माहित असणे आवश्यक
  • टीटीईने तिकिट तपासण्यासंदर्भात काही नियम असतात
  • मिडल बर्थसंदर्भातदेखील काही खास नियम असतात

Indian Railway Rules for TTE | नवी दिल्ली : भारतात मोठ्या संख्येने प्रवासी रेल्वेने प्रवास (Railway Commuters) करतात. भारतीय रेल्वेचे नेटवर्क हे जगातील चौथ्या क्रमांकाचे नेटवर्क आहे. एरवी रेल्वेचा प्रवास आरामदायी असतो, मात्र रेल्वेने प्रवास करताना काही त्रासालाही सामोरे जावे लागते. तुम्ही रेल्वेने (Train) प्रवास करत असताना तुमचे अधिकार आणि रेल्वेचे नियम (Indian Railway Rules) याविषयी तुम्हाला माहित असले पाहिजे. (TTE can not check the ticket anytime, see the Indian Railway rules)

रेल्वे प्रवासात तुमच्या इच्छेविरुद्ध तुम्हाला कोणीही डिस्टर्ब करू शकत नाही, विशेषत: तिकिट तपासनीस (TTE)कधीही तुमचे तिकिट तपासू शकत नाही. रात्री १० वाजेनंतर तिकिट तपासनीस म्हणजे टीटीई तुम्हाला झोपेतून जागे करून तिकिट तपासू शकत नाही. हा रेल्वे बोर्डाचा नियम आहे. रेल्वेच्या नियमांविषयी विस्ताराने जाणून घेऊया.

रात्री १० वाजेनंतर टीटीई तपासू शकत नाही तिकिट

रेल्वे प्रवाशांच्या तिकिट तपासणीसाठी ट्रॅव्हल तिकिट एक्झामिनर म्हणजे टीटीई (TTE)असतो. अनेकवेळा टीटीई प्रवाशांना रात्री उशीरा झोपेतून उठवून तिकिट किंवा आयडी दाखवण्यास सांगतो. मात्र तुम्हाला हे माहित असले पाहिजे की रात्री १० वाजेनंतर टीटीई तुम्हाला डिस्टर्ब करू शकत नाही. टीटीईने सकाळी ६ ते रात्री १० दरम्यान तिकिट तपासणे आवश्यक असते. रात्री प्रवासी झोपल्यानंतर टीटीई कोणत्याही प्रवाशाला त्रास देऊ शकत नाही. हा रेल्वे बोर्डाचा नियम आहे.

रात्री १० वाजेनंतर प्रवास करण्यांवर लागू होत नाही नियम

अर्थात रेल्वे बोर्डाचा हा नियम जे प्रवासी रात्री १० वाजेनंतर प्रवास करत आहेत अशांवर लागू होत नाही. म्हणजेच जर तुम्ही प्रवाशाची सुरूवात रात्री १० वाजेनंतर केली आहे किंवा तुम्ही ट्रेनमध्ये रात्री १० वाजेनंतर बसला असाल तर टीटीई तुमचे तिकिट किंवा आयडी तपासू शकतात.

मधल्या बर्थवर रात्री १० वाजेनंतरच झोपता येते

रिझर्वेशनच्या डब्यात तीन बर्थ असतात. लोअर बर्थ, मिडल बर्थ, अप्पर बर्थ. मिडल बर्थवर झोपणारे प्रवासी रात्री वाजेनंतरच यावर झोपू शकतात. कारण मिडल बर्थ लावल्याने खाली बसलेल्या प्रवाशांना त्रास होतो. त्यामुळे रेल्वेच्या नियमानुसार मिडल बर्थवाले प्रवासी रात्री १० वाजेनंतरच आपला बर्थ लावू शकतात.

मिडल बर्थ रात्री १० ते सकाळी ६ दरम्यानच झोपता येते. काहीवेळा लोअर बर्थचे प्रवासी रात्री उशीरापर्यत जागे असतात. अशावेळी तुमचा मिडल बर्थ असल्यास तुम्ही रात्री १० नंतर तो बर्थ लावून झोपू शकता.

ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा रेल्वे प्रवाशांच्या संख्येत वाढ होणार हे नक्की. या प्रसंगी प्रवाशांच्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि त्यांना चांगल्या सुविधा देण्यासाठी IRCTC ने मध्य रेल्वेच्या सहकार्याने विशेष गाड्या चालवण्याची घोषणा केली आहे.

रेल्वेच्या अधिकृत निवेदनानुसार, ख्रिसमस आणि नवीन वर्षासाठी चालवल्या जाणार्‍या विशेष गाड्यांसाठी सीट बुकींग शनिवार, 20 नोव्हेंबरपासून सुरू झाले आहे. या विशेष गाड्यांमध्ये प्रवास करण्यासाठी प्रवासी तिकीट काउंटरवरून तिकीट खरेदी करू शकतात. याशिवाय तिकीट ऑनलाइनही बुक करता येणार आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी