Jack Dorsey Resignation | ट्विटरचे संस्थापक जॅक डॉर्सीची कारकीर्द संपली, पराग अग्रवालपूर्वी इतके वर्ष होते CEO

Jack Dorsey Resignation | जॅक डॉर्सी यांनी स्वत:च ट्विट करत आपल्या राजीनाम्याची माहिती दिली आहे. जॅक डॉर्सींच्या राजीनाम्यानंतर पराग अग्रवाल हे आता ट्विटरच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदाची जबाबदारी सांभाळणार आहेत. जॅक डॉर्सी यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की सर्वाना ही बाब माहित आहे की नाही हे मला माहित नाही मात्र मी ट्विटरमधून राजीनामा दिला आहे.

Jack Dorsey Resignation
ट्विटरचे सीईओ जॅक डॉर्सी यांचा राजीनामा 
थोडं पण कामाचं
  • ट्विटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी जॅक डॉर्सी यांनी राजीनामा दिला
  • जॅकनंतर पराग अग्रवाल यांच्याकडे मुख्य कार्यकारी अधिकारीपदाची सूत्रे
  • जॅक डॉर्सी यांनी ट्विट करत दिली राजीनाम्याची माहिती आणि कारणे

Jack Dorsey Resignation | नवी दिल्ली : ट्विटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी जॅक डॉर्सी (Jack Dorsey) यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. जॅक डॉर्सी यांनी स्वत:च ट्विट करत आपल्या राजीनाम्याची माहिती दिली आहे. जॅक डॉर्सींच्या राजीनाम्यानंतर पराग अग्रवाल (Parag Agrawal) हे आता ट्विटरच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदाची जबाबदारी (New CEO Of Twitter) सांभाळणार आहेत. जॅक डॉर्सी यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की सर्वाना ही बाब माहित आहे की नाही हे मला माहित नाही मात्र मी ट्विटरमधून राजीनामा दिला आहे. (Twiteer CEO Jack Dorsey resigned & post it on twitter)

जॅक डॉर्सी यांनी केले ट्विट

आपल्या ट्विटबरोबरच जॅक डॉर्सी यांनी एक पत्रदेखील पोस्ट केले आहे. आपल्या टीमसाठी जॅक डॉर्सी यांनी हे पत्र लिहिले असून त्यात राजीनाम्याची माहिती दिली आहे. त्याचबरोबर राजीनामा देण्यामागची भूमिका आणि पुढील काही मुद्देदेखील स्पष्ट केले आहेत. त्यांनी म्हटले आहे की त्यांनी कंपनीच्या सह-संस्थापकाच्या जबाबदारीपासून सीईओ, अध्यक्ष, अंतरिम सीईओ आणि सीईओ यासारख्या अनेक जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्विटरबरोबर ते १६ वर्षे कार्यरत होते. १६ वर्षे विविध जबाबदाऱ्या सांभाळल्यानंतर आपण राजीनामा देत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी हे देखील स्पष्ट केले की आपल्यानंतर पराग अग्रवाल ट्विटरच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदाची जबाबदारी सांभाळणार आहेत.

पराग अग्रवालने दिले धन्यवाद

जॅक डॉर्सी यांनी राजीनामा दिल्यानंतर पराग अग्रवाल यांनीदेखील एक ट्विट केले आहे. त्यात पराग यांनी म्हटले आहे की जॅक आणि आमच्या संपूर्ण टीमला धन्यवाद. भविष्याविषयी आपण खूप उत्साही आहोत. माझ्यावर विश्वास दाखवल्याबद्दल सर्वांना धन्यवाद.

जॅक डॉर्सी यांनी का दिला राजीनामा ?

जॅक डॉर्सी यांनीच ट्विटरची स्थापना केली होती. १५ मार्च २००६ला त्यांनी ट्विटरची स्थापना केली होती आणि त्यानंतर २००८ पर्यत ते कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी होते. २००८ मध्ये त्यांना या जबाबदारीतून बाजूला सारण्यात आले आणि डिक कोस्टोलो ट्विटरचे सीईओ बनले होते. त्यानंतर २०१५ मध्ये जेव्हा कोस्टोलो यांनी राजीनामा दिला तेव्हा जॅक डॉर्सी पुन्हा कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी झाले होते.

ट्विटर हे जगातील अत्यंत लोकप्रिय आणि प्रतिष्ठित सोशल मीडिया आहे. फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉट्सअप आणि इतर लोकप्रिय सोशल मीडिया व्यासपीठांइतकेच ट्विटर लोकप्रिय आहे. इतकेच नव्हे जगातील सर्वात महत्त्वपूर्ण व्यक्ती, सेलिब्रिटी आपली मते, भूमिका सर्वांसमोर ट्विटरच्याच माध्यमातून व्यक्त करत असतात. जॅक डॉर्सी यांचा राजीनामा काहीसा अपेक्षितच होता. मागील काही कालावधीपासून त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत होती. जॅक डॉर्सी यांच्या सीईओपदाच्या राजीनाम्यानंतर ब्रेट टेलर हे ट्विटरच्या संचालक मंडळाचे अध्यक्षपद भूषवणार आहेत. जॅक डॉर्सी यांच्या राजीनाम्यानंतर ट्विटरच्या संचालक मंडळात आणि व्यवस्थापनात काही फेरबदल होण्याची शक्यता आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी