Twitter कर्मचाऱ्यांचे वाईट दिवस, 3700 कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर टांगती तलवार

Twitter News: मायक्रोब्लॉगिंग साईट ट्विटरचे मालक बनलेले अ‍ॅलन मस्क हे दररोज नवनवीन आदेश देताना दिसून येत आहेत. 

twitter employees may lose jobs as elon musk plans job cuts read details in marathi
Twitter कर्मचाऱ्यांचे वाईट दिवस, 3700 कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर टांगती तलवार  |  फोटो सौजन्य: BCCL

Twitter News: जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि ट्विटरचे मालक असलेले अ‍ॅलन मस्क हे गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहेत. ट्विटरचे मालकी हक्क खरेदी केल्यावर अ‍ॅलन मस्क यांनी आता कंपनीतून कर्मचाऱ्यांची कपात करण्याचा निर्णय घेतला असल्याचं बोललं जात आहे. काही दिवसांपूर्वीच अ‍ॅलन मस्क यांनी ट्विटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी पराग अग्रवाल, सीएफओ नेड सेगल आणि इतर अधिकाऱ्यांना घरचा रस्ता दाखवला. आता नव्याने आलेल्या रिपोर्ट्सनुसार, टेस्ला आणि स्पेसएक्सचे सीईओ यांनी ट्विटरमधील जवळपास अर्ध्या कर्मचाऱ्यांची कपात करण्याची योजना बनवत आहेत. (Twitter employees may lose jobs as Elon musk plans job cuts read details in marathi)

3700 कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार

सध्याच्या काळात ट्विटरचे एकूण 7400 कर्मचारी आहेत. यापैकी 3700 कर्मचाऱ्यांना काढण्याचा प्लान अ‍ॅलन मस्क यांचा आहे. ब्लूमर्गच्या एका रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे की, खर्च कमी करण्यासाठी ही कर्मचारी कपात केली जात आहे. जर कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन कमी करण्यात आले तर त्यांना 60 दिवसांचा पगार दिला जाईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. कर्मचारी कपात करण्याच्यासोबतच वर्क फ्रॉम होम रद्द करण्याचा विचार केला जात आहे.

हे पण वाचा : या वर्षातील शेवटचं चंद्रग्रहण, सुतक काळ कधी? वाचा

कर्मचाऱ्यांची लिस्ट

गेल्या आठवड्यात अनेक माजी कर्मचाऱ्यांनी ट्विटरवर पोस्ट केले होते की, अ‍ॅलन मस्क यांनी ट्विटरचे मालकी हक्क घेतल्यानंतर आम्हाला कामावरुन काढून टाकण्यात आले. रिपोर्ट्समध्ये असेही समोर आले की, मॅनेजर्स आणि त्यांच्या टीममधील कर्मचाऱ्यांची लिस्ट बनवण्यास सांगण्यात आले आहे. ही लिस्ट बनल्यावर काही कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी केलं जाण्याची शक्यता आहे. ट्विटरवरील ब्लू टिकसाठी मासिक भाडे घेण्याच्या संदर्भातील वृत्तानंतर आता कर्मचाऱ्यांना कंपनीतून कमी करण्यात येणार असल्याचं वृत्त समोर आलं आहे.

हे पण वाचा : चंद्रग्रहणाच्या दिवशी अशुभ योग, या राशीच्या व्यक्तींनी व्हा सावध

आठवड्याला 7 दिवस काम

अ‍ॅलन मस्क यांच्या आणखी एका फर्मानमुळे कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. काही रिपोर्ट्समध्ये सीएनबीसी सूत्रांच्या हवाल्याने सांगितले की, ट्विटरमधील काही इंजिनिअर्सला एका दिवसाला 12 तासांची शिफ्ट आणि आठवड्यातून सात दिवस काम करण्यास सांगितलं जाण्याची शक्यता आहे. अ‍ॅलन मस्क यांचं ध्येय पूर्ण करण्यासाठी कर्मचाऱ्यांना अधिक काम करण्यास सांगितले असल्याचं बोललं जात आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी