Twitter: मोठं-मोठे लेख अन् कंटेंटच्या माध्यामातून कमवता येणार पैसा, ट्विटरच्या नव्या मालकाची नवी घोषणा

काम-धंदा
भरत जाधव
Updated Nov 07, 2022 | 07:57 IST

युट्यूबपेक्षा जास्त पैसा आता ट्विटर देणार आहे. एका वापरकर्त्याने त्याला सांगितले की YouTube जाहिरात कमाईच्या 55 टक्के कंटेंट निर्मात्यांना देते असते. यावर उत्तर देताना मस्क म्हणाले की, ट्विटर त्यापेक्षा जास्त पैसा देईल. यामध्ये सर्व प्रकारच्या निर्मात्यांचा समावेश असेल. Twitter वर शोध घेण्याच्या पर्यायात देखील सुधारणा केली जाणार आहे. यामध्ये अनेक उणिवा आहेत, त्या दूर करण्यात येत असल्याचे मस्क यांनी सांगितले.

 Money can be earned on Twitter through content
कंटेंटच्या माध्यामातून Twitterवर कमवता येणार पैसा  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • Twitter वर शोध घेण्याच्या पर्यायात देखील सुधारणा केली जाणार आहे.
  • वापरकर्त्यांना नोटपॅडवर त्यांचे दीर्घ बोलणे लिहून त्यांचे स्क्रीन शॉट पोस्ट करण्याची आवश्यकता नसणार.
  • ट्विटरवर लवकरच मोठे लेख प्रकाशित करण्याचा पर्याय मिळेल.

नवी  दिल्ली : ट्विटरच्या (Twitter) नवीन मालकाच्या नव-नव्या घोषणांमुळे  गेल्या काही दिवसांपासून ट्विटरची मोठी ट्विव ट्विव चालू आहे. अमेरिका, ऑस्ट्रेलियासह अनेक देशांमध्ये $8 मध्ये ट्विटरचे ब्लू टिक (Blue Tick)सबस्क्रिप्शन  (Subscription)सुरू केली आहे. आता कंपनीचे नवीन मालक ऍलन मस्क (Elon musk )यांनी अनेक नवीन घोषणा केल्या आहेत. नवीन घोषणेनुसार, ट्विटरवर लवकरच मोठे लेख प्रकाशित करण्याचा पर्याय मिळेल. यासह वापरकर्त्यांना नोटपॅडवर त्यांचे दीर्घ बोलणे लिहून त्यांचे स्क्रीन शॉट पोस्ट करण्याची आवश्यकता नसणार आहे. तसेच, ट्विटरवर कंटेंट पोस्ट करणाऱ्या निर्मात्यांना पैसे कमविण्याची संधी मिळणार आहे.  (Twitter:  Money to be earned through articles and content, Twitter's new owner announced)

अधिक वाचा  : सावधान! दिवसा घोरणे तुम्हाला बनवू शकते आंधळे

युट्यूबपेक्षा जास्त पैसा आता ट्विटर देणार आहे. एका वापरकर्त्याने त्याला सांगितले की YouTube जाहिरात कमाईच्या 55 टक्के कंटेंट निर्मात्यांना देते असते. यावर उत्तर देताना मस्क म्हणाले की, ट्विटर त्यापेक्षा जास्त पैसा देईल. यामध्ये सर्व प्रकारच्या निर्मात्यांचा समावेश असेल. Twitter वर शोध घेण्याच्या पर्यायात देखील सुधारणा केली जाणार आहे. यामध्ये अनेक उणिवा आहेत, त्या दूर करण्यात येत असल्याचे मस्क यांनी सांगितले.

अधिक वाचा  : एक शापित चित्रपट, ज्याने स्क्रिप्ट वाचली त्याचा झाला मृत्यू

यूएन म्हणाले, मस्क यांनी मानवी हक्क विसरू नये

युनायटेड नेशन्सचे उच्चायुक्त वॉकर तुर्क यांनी मस्क यांना ट्विटरचे व्यवस्थापन करताना मानवी हक्क लक्षात घेतले पाहिजेत असे म्हटले आहे. कर्माचाऱ्यांना कामावरुन काढून टाकणं हे चांगलं नसल्याचं म्हटलं आहे.  ट्विटरच्या मानवाधिकार आणि नैतिक AI टीमला काढून टाकल्याबद्दल 
त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. 

व्हेरिफेकशनवरुन कंगनाची आगपाखड 

अभिनेत्री कंगना राणौत म्हणाली, पूर्वी व्हेरिफेकशनची पद्धत समजत नव्हती. माझं  व्हेरिफिकेशन होत होतं. परंतु माझ्या वडिलांना ब्ल्यू टिक देण्यासाठी दोन- तीन जोकर नकार देत असायचे. 

अधिक वाचा  : सूर्यकुमारची फलंदाजी आहे सुस्साट,केला 'हा' विक्रम

माजी मालक डॉर्सीने माफी मागितली, म्हणाले- या परिस्थितीला मी जबाबदार आहे 

50 टक्के कर्मचार्‍यांना काढून टाकण्यासह मस्कच्या अनेक हालचालींना अनेक वापरकर्ते विक्षिप्तपणा मानत आहेत. अशातच ट्विटरचे माजी मालक आणि सह-संस्थापक जॅक डोर्सी यांनी त्यांच्याबद्दल जाहीरपणे माफी मागितली आहे. 
आज तुम्ही ज्या परिस्थितीतून जात आहात त्यासाठी मी जबाबदार आहे, असे त्यांनी लिहिले आहे. मी ही कंपनी खूप वेगाने मोठी केली. याबद्दल मी माफी मागतो. आज ट्विटरवर काम करणारे आणि भूतकाळात काम करणारे लोक मजबूत आणि लवचिक आहेत. काळ कितीही कठीण असला तरी ते मार्ग काढतील.

फ्रेंच मंत्री व्हेरॉन यांना मस्कच्या महत्त्वाकांक्षेची चिंता 

फ्रेंच सरकारचे प्रवक्ते आणि मंत्री ऑलिव्हर व्हेरन यांनी सांगितले की ते ट्विटर खात्याच्या प्रमाणीकरणासाठी महिन्याला  $7.99  फी भरणार नाहीत. तसेच ते म्हणाले की, ट्विटरचे नवीन मालक  ऍलन मस्कच्या महत्त्वाकांक्षेबद्दल  चिंता आहे.  टट्विटरने शनिवारी अ‍ॅपल स्टोअरवर आपले अ‍ॅप अपडेट केले. आता त्यावरील निळ्या चेकमार्कसाठी शुल्क भरावे लागणार आहे. फी भरल्यावर तुम्ही सेलिब्रिटींप्रमाणे तुमच्या नावासमोर निळा चेकमार्क लावू शकता, असे ते म्हणाले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी