Musk Vs Twitter : ट्विटर (Twitter) खरेदी करण्याच्या मुद्द्यावरून सध्या टेस्ला (Tesla) कंपनीचे मालक एलॉन मस्क (Elon Musk) आणि ट्विटर प्रशासन (Twitter administration) यांच्यात कायदेशीर लढाई (Legal Fight) सुरू आहे. त्याचा फटका ट्विटरला बसल्याचं चित्र आहे. गेल्या तिमाहीतील ट्विटरचा नफा घटला असून यामागच्या कारणांचं सध्या विश्लेषण केलं जात आहे. ट्विटरच्या युजर्समध्ये सातत्यानं वाढ होत असतानाही त्यांचा नफा मात्र घटल्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
फॅक्टसेटनं केलेल्या सर्वेक्षणानुसार सोशल मीडिया कंपनी ट्विटरला एप्रिल ते जून 2022 या आर्थिक तिमाहीत प्रति शेअर आठ टक्के नुकसान झालं आहे. एकूण गेल्या तिमाहीत ट्विटरला बसलेला फटका हा 27 कोटी डॉलरचा आहे. या आकडेवारीनं सर्वांचेच अंदाज चुकवले आहेत. ट्विटरला या कायदेशीर लढाईचा फटका बसेल, अशी शक्यता आंतरराष्ट्रीय वर्तुळात वर्तवण्यात येत होती, मात्र इतका मोठा फटका बसेल असं मात्र कुणालाही वाटलं नव्हतं. ‘वॉल स्ट्रीट’ने तर ट्विटर कंपनीच्या शेअरमध्ये 14 टक्के वाढ होईल, असा अंदाज वर्तवला होता. मात्र ट्विटरकडे येणाऱ्या जाहारातींचे प्रमाण घटल्याचा मोठा फटका कंपनीला बसण्याचं सांगितलं जात आहे. यामुळे कंपनीचा नफा 1 टक्क्यांनी घटला असून तो 1.18 कोटी डॉलरवर आला आहे.
अधिक वाचा - Arpita Mukharjee : कोण आहेत अर्पिता मुखर्जी? यांच्या घरी टाकलेल्या धाडीत ED ला मिळाले 20 कोटी
ट्विटरच्या युजर्समध्ये वाढ होण्याचा वेग अद्यापही कायम आहे. ट्विटर युजर्सची संख्या ही गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढली आहे. गेल्या वर्षी ट्विटर युजर्सची संख्या 16.6 टक्के वाढली होती. या वर्षी हीच वाढ 23.78 टक्के नोंदवली गेली आहे. एलॉन मस्क आणि ट्विटर यांच्यातील वाद आता न्यायालयात पोहोचला असून मंगळवारी डेलावेयर न्यायालयात त्याची पहिली सुनावणी पार पडली. हा खटला किती लवकर सुरु करणं गरजेचं आहे, या विषयावर दोन्ही बाजूंनी आपापले मुद्दे न्यायालयात मांडले.
अधिक वाचा - Murder for Mango : चिमुकलीनं आंबा मागितल्याचा आला राग, सख्ख्या काकाने असा घेतला जीव
आपण ट्विटर कंपनी 44 कोटी अमेरिकी डॉलरना विकत घेण्याची घोषणा एलॉन मस्क यांनी केली होती. मात्र त्यानंतर त्यांनी शब्द फिरवत हा प्लॅन रद्द केला होता. मात्र पहिल्यांदा ठरल्याप्रमाणे मस्क यांनी कंपनी खरेदी केलीच पाहिजे, अशी भूमिका ट्विटर प्रशासनानं घेतली आहे. या वादात कंपनीचं मोठं नुकसान होत असून लवकरात लवकर हा व्यवहार एलॉन मस्क यांच्या टेस्ला कंपनीकडून पूर्ण झाला पाहिजे, अशी अपेक्षाही ट्विटरने व्यक्त केली आहे.