ट्विटरच्या भारतातील सर्व कर्मचाऱ्यांनी गमावली नोकरी

Twitter starts laying off employees in India : ट्विटर या लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्ममध्ये कर्मचारी कपात सुरू आहे. जगभर ट्विटरच्या ऑफिसांमधून कर्मचारी कपात होत आहे.

Twitter starts laying off employees in India
ट्विटरच्या भारतातील सर्व कर्मचाऱ्यांनी गमावली नोकरी  |  फोटो सौजन्य: ANI
थोडं पण कामाचं
  • ट्विटरच्या भारतातील सर्व कर्मचाऱ्यांनी गमावली नोकरी
  • टेस्ला कार कंपनीचे मालक अॅलन मस्क यांनी 44 अब्ज डॉलर मोजून ट्विटर कंपनी खरेदी केली
  • ट्विटरमध्ये कर्मचारी कपात सुरू

Twitter starts laying off employees in India : ट्विटर या लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्ममध्ये कर्मचारी कपात सुरू आहे. जगभर ट्विटरच्या ऑफिसांमधून कर्मचारी कपात होत आहे. ट्विटरच्या भारतातील ऑफिसमधून सर्व कर्मचाऱ्यांना कायमचे घरी पाठवण्यात आल्याचे वृत्त आहे.

टेस्ला कार कंपनीचे मालक अॅलन मस्क यांनी 44 अब्ज डॉलर मोजून ट्विटर कंपनी खरेदी केली. यानंतर ट्विटरमध्ये कर्मचारी कपात सुरू झाली. मस्क ट्विटरला नव्या स्वरुपात लाँच करण्याची तयारी करत आहेत. या तयारीचा भाग म्हणून ट्विटरच्या बहुसंख्य कर्मचाऱ्यांना घरी पाठवण्याचा निर्णय झाला आहे. मस्क ताज्या दमाच्या निवडक कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन नव्या स्वरुपात ट्विटर लाँच करण्याची तयारी करत आहेत. 

खाद्यतेलाच्या घाऊक दरात वाढ

Early Retirement Tips : वयाच्या 40 व्या वर्षी निवृत्त होऊन उर्वरित आयुष्याचा आनंद घ्यायचांय? मग वापरा ही सूत्रे

ट्विटर या बहुराष्ट्रीय कंपनीच्या ट्विटर इंडिया या उपकंपनीतून अभियांत्रिकी (इंजिनिअरिंग), विक्री (सेल्स), विपणन (मार्केटिंगया), संवाद (कम्युनिकेशन) या विभागांतून टप्प्याटप्प्याने कर्मचारी कपात सुरू झाली. शुक्रवारी सकाळी कर्मचारी कपातीची प्रक्रिया सुरू झाली. संध्याकाळ होईपर्यंत सर्व कर्मचाऱ्यांना घरी पाठवण्यात आल्याचे वृत्त आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपात करण्याचे कारण कंपनीकडून अधिकृतरित्या जाहीर करण्यात आलेले नाही.

ट्विटरचे जगभरात 7500 कर्मचारी आहेत. यापैकी 50 टक्क्यांपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना घरी पाठवण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे वृत्त आहे. या वृत्ताला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. पण ट्विटरमध्ये कर्मचारी कपातीच्या प्रक्रियेला वेग आला आहे.

याआधी अॅलन मस्क यांनी ट्विटर ताब्यात घेतल्यानंतर सीईओ पराग अग्रवाल यांच्यासह व्यवस्थापन मंडळातील (मॅनेजमेंट बोर्ड) अनेक उच्चपदस्थांना कायमचे घरी पाठवण्यात आले. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी