एलॉन मस्कने रद्द केले ट्विटर डील, ट्विटर मस्क विरोधात कोर्टात जाण्याच्या तयारीत

Twitter vows legal fight after Elon Musk pulls out of $44 billion buyout deal : जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि टेस्ला या इलेक्ट्रिक कार कंपनीचा मालक एलॉन मस्क याने ट्विटर हा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म खरेदी करण्याची योजना रद्द केली.

Twitter vows legal fight after Elon Musk pulls out of $44 billion buyout deal
एलॉन मस्कने रद्द केले ट्विटर डील, ट्विटर मस्क विरोधात कोर्टात जाण्याच्या तयारीत  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • एलॉन मस्कने रद्द केले ट्विटर डील
  • व्यवहार आपल्या बाजूने रद्द करत असल्याचे एलॉन मस्क याने ट्विटरला पत्राद्वारे कळवले
  • ट्विटर मस्क विरोधात कोर्टात जाण्याच्या तयारीत

Twitter vows legal fight after Elon Musk pulls out of $44 billion buyout deal : जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि टेस्ला या इलेक्ट्रिक कार कंपनीचा मालक एलॉन मस्क याने ट्विटर हा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म खरेदी करण्याची योजना रद्द केली. व्यवहार आपल्या बाजूने रद्द करत असल्याचे एलॉन मस्क याने ट्विटरला पत्राद्वारे कळवले आहे. एलॉन मस्कच्या या निर्णयाविरोधात ट्विटर कोर्टात दाद मागण्याच्या तयारीत आहे. 

ट्विटर हा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ४४ अब्ज डॉलरला (44 Billio USD) खरेदी करण्याचा निर्णय एलॉन मस्कने घेतला होता. एक ट्वीट करून एलॉन मस्कने ट्विटर किती किंमतीत खरेदी करणार हे जाहीर केले होते. यानंतर व्यवहाराची पुढील प्रक्रिया सुरू झाली होती. यामुळे ट्विटरची मालकी मस्कच्या हाती जात असल्याचे चित्र निर्माण झाले होते. पण आता एलॉन मस्कने ट्विटर खरेदीची योजना रद्द केली आहे.

ट्विटरवर किती बनावट हँडल (Fake Twitter Handle) आणि किती स्पॅम करणारी हँडल (Spam Twitter Handle) आहेत याची ठोस माहिती मागितली होती. ही माहिती मिळत नसल्यामुळे ट्विटर खरेदी करण्याची योजना रद्द करत असल्याचे एलॉन मस्कने जाहीर केले आहे. पण मस्कच्या या घोषणेमुळे बाजारातील ट्विटरच्या विश्वासार्हतेवर परिणाम झाला आहे. शेअर बाजारातील ट्विटरची पत घसरली आहे. मस्कच्या कृतीमुळे झालेले नुकसान त्याने भरून द्यावे असे ट्विटरच्या व्यवस्थापनाचे म्हणणे आहे. 

आम्ही दररोज सुमारे १० लाख ट्विटर हँडल कायमची बंद करत आहोत. ही हँडल बनावट किंवा स्पॅम करणारी असल्यामुळे कारवाई करत आहोत, असे काही दिवसांपूर्वी ट्विटरच्या व्यवस्थापनाने जाहीर केले होते. पण ट्विटरवर नेमकी किती किती बनावट आणि किती स्पॅम करणारी हँडल आहेत याविषयी कंपनीकडून ठोस माहिती मिळत नसल्याची तक्रार एलॉन मस्क याच्याकडून सातत्याने सुरू होती. महिती मिळत नसल्याचे कारण देत एलॉन मस्कने ट्विटर खरेदीचा व्यवहार रद्द केल्याचे जाहीर केले आहे.

एलॉन मस्क आणि ट्विटर यांच्यात झालेल्या करारानुसार व्यवहाराची बोलणी सुरू झाल्यापासून ते व्यवहार पूर्ण होईपर्यंतच्या कालावधीत कधीही कोणालाही व्यवहार रद्द करण्याचे स्वातंत्र्य होते. पण व्यवहार एकतर्फी रद्द केल्यास संबंधिताला दुसऱ्या पक्षाला एक अब्ज डॉलरची (1 Billion USD) भरपाई द्यावी लागेल. या कराराची अंमलबजावणी व्हावी तसेच बाजारातील पत एलॉन मस्कमुळे कमी झाली असल्यामुळे त्याचीही भरपाई मस्कने द्यावी असे ट्विटरच्या व्यवस्थापनाचे म्हणणे आहे. तर कंपनीने माहिती देताना लपवाछपवी करून एक प्रकारे फसवणूक केल्यामुळे व्यवहार रद्द केला आहे, त्यामुळे भरपाई लागू होत नाही अशी एलॉन मस्कची भूमिका आहे.

एलॉन मस्क आणि ट्विटरचे व्यवस्थापन यांच्यातील वाद कोर्टात जाण्याची शक्यता आहे. अमेरिकेतील कायदेतज्ज्ञांच्या मते अशा स्वरुपाच्या वादांमध्ये काही काळानंतर न्यायाधीश खरेदीचा व्यवहार पूर्ण करा असाच आदेश देतात. या प्रकारात अनेकदा ज्या कंपनीची विक्री होणार असते त्यांच्या आधी ठरलेल्या विक्री मूल्यात मधल्या काळातील घडामोडींमुळे मोठी घसरण होण्याचा धोका असतो. ट्विटरच्या बाबतीत हाच प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे कायदेतज्ज्ञांनी सांगितले.

एप्रिल २०२२ मध्ये ट्विटरच्या एका शेअरची किंमत ५४.२० डॉलर होती जी आता ३४ ते ४० डॉलर दरम्यान फिरत आहे. ट्विटरविषयी उलटसुलट माहिती माध्यमांमध्ये आली तर तिचा खरेखोटेपणा नंतर तपासला जाईल पण आधी शेअर बाजारातील कंपनीच्या मूल्यावर वाईट परिणाम होईल अशी सध्याची परिस्थिती आहे. यामुळे ट्विटर आणि मस्क यांच्यातील वाद लवकर संपणे हेच ट्विटरच्या हिताचे असल्याचे मत अनेक कायदेतज्ज्ञ व्यक्त करत आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी