Gold Investment | या अक्षय तृतियेला काय कराल? सोन्यातील गुंतवणकीचे किती आहेत पर्याय? जास्त लाभ मिळवण्यासाठी अशी करा गुंतवणूक...

Gold : अक्षय तृतीयेच्या दिवशी सोने खरेदीची परंपरा आपल्याकडे आहे. मागील वर्षी कोरोनाचा फटका सराफा बाजाराला बसला होता. सोन्यातील गुंतवणूक ही अत्यंत सुरक्षित गुंतवणूक समजली जाते. मागील काही वर्षात सोन्यातील गुंतवणुकीने दणदणीत परतावा दिला आहे. त्यामुळे आपल्या गुंतवणुकीच्या पोर्टफोलिओत एक हिस्सा नेहमी सोन्यातील गुंतवणुकीसाठी राखून ठेवला पाहिजे. सोन्यातील गुंतवणूक आणि त्यातील गुंतवणुकीचे प्रकार जाणून घेऊया.

How to invest in Gold
सोन्यामध्ये गुंतवणूक कशी कराल 
थोडं पण कामाचं
  • अक्षय तृतीयेच्या दिवशी सोने खरेदीची परंपरा
  • सोन्यातील गुंतवणूक ही अत्यंत सुरक्षित गुंतवणूक समजली जाते
  • अक्षय तृतीयेच्या निमित्तीने सोन्यातील गुंतवणूक आणि त्यातील गुंतवणुकीचे प्रकार जाणून घेऊया

Gold Ivestment on Akshay Tritiya : मुंबई : अक्षय तृतीयेच्या दिवशी सोने खरेदीची परंपरा आपल्याकडे आहे. मागील वर्षी कोरोनाचा फटका  सराफा बाजाराला बसला होता.  सोन्यातील गुंतवणूक ही अत्यंत सुरक्षित गुंतवणूक समजली जाते. मागील काही वर्षात सोन्यातील गुंतवणुकीने दणदणीत परतावा दिला आहे. त्यामुळे आपल्या गुंतवणुकीच्या पोर्टफोलिओत एक हिस्सा नेहमी सोन्यातील गुंतवणुकीसाठी राखून ठेवला पाहिजे. त्यातच मागील काही दिवसात सोन्याच्या भावात झालेल्या घसरणीमुळे सोने खरेदीची किंवा सोन्यात गुंतवणुकीची चांगली संधी आहे. अक्षय तृतीयेच्या निमित्तीने सोन्यातील गुंतवणूक आणि त्यातील गुंतवणुकीचे प्रकार जाणून घेऊया. सोन्यात सर्वसाधारणपणे पाच प्रकारे गुंतवणूक करता येते. (Types of Gold Investments, How to invest in Gold)

मागील काही आठवड्यात सोन्याच्या भावात (Gold) घसरण झाली असली तरी एकूणच वर्षभरात सोन्याच्या भावात (Gold rate) प्रचंड वाढ झाली होती. अर्थात सध्या शेअर बाजारातील तेजीमुळे इतर गुंतवणूक प्रकारांकडे थोडे कमीच लक्ष जाते आहे. मात्र सोने ही अतिशय सुरक्षित गुंतवणूक (Gold Investment) समजली जाते. 

अधिक वाचा : Changes from 1st May | 1 मे पासून महागड्या सिलिंडरपासून बँकांच्या सुट्ट्यांमधील बदल; जाणून घ्या महिना कसा सुरू होईल

सोन्यातील गुंतवणकीचे प्रकार-

  1. - प्रत्यक्ष सोने खरेदी (Actual Gold Purchasing)
  2. - ई-गोल्ड (e-Gold)
  3. - गोल्ड ईटीएफ (Gold ETF)
  4. - सोव्हेरन गोल्ड बॉंड (Soverign Gold Bond)
  5. - गोल्ड फंड (Gold Fund)

सोन्यातील गुंतवणुकीच्या या सर्व पर्यायांविषयी आणि त्यातील फायद्या-तोट्याविषयी जाणून घेऊया म्हणजे या अक्षय तृतीयेला तुम्हाला सोन्यातील गुंतवणुकीचा खरा फायदा घेता येईल.

1. प्रत्यक्ष सोन्याची खरेदी (Actual Gold Purchasing)

नेहमी आपण जसे प्रत्यक्ष सराफा बाजारात जाऊन दागिने किंवा नाणी किंवा बिस्किट रुपात सोन्याची खरेदी करतो त्यालाच प्रत्यक्ष खरेदी म्हणतात. प्रत्यक्ष सोन्याची खरेदी  करणे हा आपल्या देशातील सर्वात लोकप्रिय पर्याय आहे. आपल्या देशात पारंपारिकपणे याच पद्धतीने सोन्यातील गुंतवणूक केली जाते. या पद्धतीने गुंतवणूक केल्यास सोने आपल्याजवळ बाळगावे लागते किंवा बॅंकेच्या लॉकरमध्ये ठेवावे लागते. अर्थात गरज पडल्यास सराफा बाजारात जाऊन लगेचच सोने विकून पैसा गाठीशी बांधता येतो. 

अधिक वाचा : Bank holidays in May 2022 | मे महिन्यात बँका 11 दिवस बंद राहणार...पाहा संपूर्ण यादी

2.  ई-गोल्ड (e-Gold)

ही सोन्यातील इलेक्ट्रॉनिक गुंतवणूक असते. म्हणजेच हे सोने इलेक्ट्रॉनिक माध्यमातून विकत घेतले जाते. यातील गुंतवणूक हीदेखील पेपरलेस असते. अनेक युपीआय अॅपदेखील ही सुविधा पुरवतात. नॅशनल स्पॉट एक्सचेंजच्या डिलरमार्फतही ही गुंतवणूक करता येते. प्रत्यक्ष सोने सांभाळण्याची जबाबदारी या प्रकारामुळे टाळता येते. 

3. गोल्ड ईटीएफ (Gold ETF)

गोल्ड एक्सचेंज ट्रेडेड फंड म्हणजेच गोल्ड ईटीएफ . गोल्ड ईटीएफमध्ये डीमॅट खात्याद्वारे गुंतवणूक करू शकतो. गोल्ड ईटीएफमध्ये प्रत्यक्ष सोने विकत मिळण्याऐवजी सोने युनिटरुपाने मिळते. म्हणजेच  जितके ग्रॅम सोने विकत घेऊ तितके युनिट आपल्या खात्यात जमा होतात. किमान एक ग्रॅम सोन्यात गुंतवणूक करावी लागते. शेअरप्रमाणेच गोल्ड ईटीएफच्या किंमतीतही चढउतार होत असतात. शेअरप्रमाणेच आपण केव्हाही हे युनिट विकून त्यातून नफा कमावू शकतो. 

अधिक वाचा : Warren Buffett | वॉरन बफेच्या अफाट संपत्तीमागील रहस्य...जाणून घ्या श्रीमंत होण्यासाठी कसे वापरायचे हे सूत्र

4. सोव्हेरन गोल्ड बॉंड (Soverign Gold Bond)

हा सर्वाधिक लाभदायक प्रकार आहे. सोन्यातील गुंतवणुकीचा हा सर्वात खास पर्याय आहे. हे बॉंड केंद्र सरकार किंवा रिझर्व्ह बॅंकच बाजारात आणत असल्यामुळे अतिशय सुरक्षित समजले जातात. यात किमान एक ग्रॅम सोन्याच्या मूल्याएवढी गुंतवणूक करावी लागते. या पद्धतीने जितकी गुंतवणूक करू तितके ग्रॅम सोने किंवा युनिट आपल्या खात्यात जमा होतात. साधारणपणे आठ वर्षांच्या कालावधीसाठी हे बॉंड असतात. तर यातील गुंतवणुकीसाठीचा लॉकइन कालावधी पाच वर्षांचा असतो. याशिवाय दरवर्षी तुमच्या गुंतवणूकीवर २.५ टक्के इतके अतिरिक्त व्याज तुम्हाला दिले जाते.  म्हणजेच पाच वर्षांनी तुम्ही तुमची गुंतवणूक काढून घेऊ शकता. तुमचा गुंतवणूक कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्यावेळच्या बाजारभावाप्रमाणे तुम्ही जितके ग्रॅम सोने घेतले असेल तितकी रक्कम तुम्हाला मिळते. 

5. गोल्ड फंड (Gold Fund)

गोल्ड फंड हा प्रकार म्युच्युअल फंडांसारखाच असतो. गोल्ड फंडाद्वारे सोन्यात गुंतवणूक केली जाते. या फंडामध्ये आपण एसआयपीच्या माध्यमातूनदेखील गुंतवणूक करू शकतो. आपण जितकी गुंतवणूक करू तितके युनिट आपल्याला मिळतात.  यात गुंतवणूक करण्यासाठी तुम्हाला डीमॅट खात्याची आवश्यकता नसते. शिवाय किमान गुंतवणूक ही एक ग्रॅम सोन्यापेक्षाही कमी असू शकते. म्हणजेच अगदी ५०० रुपये प्रति माहची एसआयपीदेखील तुम्ही करू शकता. 

सोन्यातील गुंतवणुकीचे हे प्रकार बाजारात उपलब्ध आहेत. यातील एखादा प्रकार निवडताना तुमची गरज, गुंतवणूक कालावधी, तुमची सुविधा लक्षात घेऊन गुंतवणूक करणे फायद्याचे ठरेल.


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी