UGC NET 2021 Result, Answer Key: या दिवशी जाहीर होणार युजीसी नेट परीक्षेचा निकाल आणि आन्सर की, वाचा सविस्तर 

UGC NET 2021 Result युजीसी नेट एनटीए ऑनलाईन माध्यमातून निकल जाहीर होईल. मे २०२१ मध्ये होणार्‍या या परीक्षा पुढी ढकलण्यात आल्या होत्या. अखेर २४, २७ डिसेंबर २०२१ रोजी या परीक्षा पार पाडल्या.या परीक्षेचा निकाल जानेवारी महिन्यातच जाहीर होणार आहे.

Multibagger Stock
थोडं पण कामाचं
  • युजीसी नेट एनटीए ऑनलाईन माध्यमातून निकल जाहीर होईल
  • २४, २७ डिसेंबर २०२१ रोजी या परीक्षा पार पाडल्या.
  • या परीक्षेचा निकाल जानेवारी महिन्यातच जाहीर होणार आहे.

UGC NET 2021 Result, Answer Key : मुंबई : युजीसी नेट एनटीए ऑनलाईन माध्यमातून निकल जाहीर होईल. मे २०२१ मध्ये होणार्‍या या परीक्षा पुढी ढकलण्यात आल्या होत्या. अखेर २४, २७ डिसेंबर २०२१ रोजी या परीक्षा पार पाडल्या.या परीक्षेचा निकाल जानेवारी महिन्यातच जाहीर होणार आहे. उमेदवारांना आपला रोल नंबर, अर्ज क्रमांक आणि जन्मतारीख टाकून आपला निकाल पाहता येणार आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर सर्व उमेदवारांचे गुण ugcnet.nta.nic.in या वेबसाईटवर जाहीर होणार आहेत. 

युजीसी नेट आन्सर की २०२१

युजीसी नेट परीक्षेच्या निकालानंतर नेटच्या ५५ विषयांचे उत्तर जाहीर करण्यात येतील. युजीसी नेट की आन्सर्स याच महिन्यात जाहीर होईल. उमेदवारांना ओमआर शीट आणि उत्तरांना आव्हान देण्याचीही सुविधा असणार आहे. प्रत्येक प्रश्नाला आव्हान देण्यासाठी उमेदवारांना एक हजार रुपये जमा करावे लागणार आहे. जर प्रशासनाने हे आव्हान स्विकारले तर हे शुल्क उमेदवारला परत दिले जाईल. 

असा बघा युजीसी नेट २०२१ चा निकाल

  1. ugcnet.nta.nic.in  या वेबसाईटवर लॉग ऑन करा
  2. स्क्रीनवर रिझल्टचे पान सुरू होईल
  3. दिलेल्या रकान्यामध्ये रोल क्रमांक, अर्ज क्रमांक आणि जन्म तारीख टाका आणि सबमिट करा
  4. तुम्हाला तुमच निकाल पीडीएफ स्वरुपात दिसेल.
  5. ही पीडीएफ डाऊनलोड करा आणि पुढील प्रक्रियेसाठी त्याची प्रिंटआऊट काढा
     

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी