प्लास्टिक किंवा PVC स्मार्ट कार्ड वापरणाऱ्यांनो सावधान!

काम-धंदा
Updated Apr 30, 2019 | 08:09 IST | टाइम्स नाऊ डिजीटल

जर तुम्ही प्लास्टिक आधार कार्ड किंवा आधार स्मार्ट कार्ड वापरत असाल तर ही तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. UIDAI नं ट्विटरवरून लोकांना जागरूक केलंय. जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण...

Aadhaar Card (Representative Image)
आधार कार्ड विषयी महत्त्वाची बातमी (BCCL)  |  फोटो सौजन्य: BCCL

नवी दिल्ली: युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI)नं गेल्यावर्षी प्लास्टिक किंवा PVC आधार स्मार्टकार्ड हे QR कोडसारखे वापरले जावू शकत नाहीत, असं जाहीर केलं होतं. तरीही याचा सर्रास वापर होतांना दिसतोय. मात्र, आता आधार अथॉरिटी UIDAI नं ट्वीट करून इशारा दिला आहे की, प्लास्टिक आधार किंवा आधार स्मार्ट/PVC कार्ड वैध नाहीये. आधार कार्ड धारकाजवळ आलेलं आधार लेटर किंवा uidai.gov.in वरुन डाऊनलोड केलेलं आधार किंवा mAadhaar प्रोफाईल आधार सोबत जोडलेल्या कोणत्याही सेवेचा लाभ घेण्यासाठी पुरेसे आहेत.

प्लास्टिक आधार कार्डचे तोटे

फेब्रुवारी २०१८मध्ये UIDAI नं प्लास्टिक आधार कार्डच्या तोट्यांबाबत सांगतांना एक वक्तव्य केलं होतं. यात अथॉरिटीने सांगितलं की, प्लास्टिक आधार किंवा स्मार्ट आधार कार्डचा वापर करू नये. अशा कार्डमुळे तुमचे आधारची माहिती आणि गोपनियतेवर संकट येऊ शकतं. UIDAI चं म्हणणं आहे की, प्लास्टिक आधार कार्ड अनेक वेळा काम करत नाही. कारण प्लास्टिक आधार कार्डच्या अनऑथराईज्ड प्रिन्टिंगमुळे QR कोड डिस्फंक्शनल होऊन जातात. सोबतच आधारमध्ये असलेली तुमची वैय्यक्तिक माहिती तुमच्या परवानगी शिवाय शेअर केली जाण्याची भीती असते.

साध्या पेपरवर डाऊनलोड केलेलं आधार वॅलिड आहे

UIDAI नं आपल्या वक्तव्यात या बाबतीत ही जोर दिलाय की, ओरिजनल आधार कार्ड शिवाय एक साध्या पेपरवर डाऊनलोड केलेलं आधार कार्ड आणि mAadhaar पूर्णपणे वैध आहे. म्हणून तुम्ही स्मार्ट आधार कार्डच्या चक्करमध्ये पडण्याची गरज नाही. एव्हढंच नव्हे तर आपल्याला आधार कार्ड कलर प्रिन्ट करण्याचीही गरज नाहीये. शिवाय आधार कार्डला लॅमिनेशन किंवा प्लास्टिक आधार कार्डची ही अजिबात गरज नाही. जर आपलं आधार कार्ड हरवलं तर ते आपण https://eaadhaar.uidai.gov.in वरून मोफत डाऊनलोड करू शकतो.

प्लास्टिक आधारच्या नावानं उकळले जातात पैसे

प्लास्टिक आधार किंवा PVC च्या नावानं आधारची प्रिन्ट काढण्यासाठी लोकांकडून ५० रुपयांपासून तर ३०० रुपयांपर्यंतची रक्कम उकळली जात असल्याचंही UIDAI नं स्पष्ट केलं. कुठे कुठे तर यापेक्षाही जास्त रक्कम लोकांकडून उकळली जाते. तेव्हा सावध व्हा आणि असं कुठल्याही प्रकारचं आधार कार्ड बनवून घेऊ नका.
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी