Kinder Surprise | 'किंडर सरप्राइज'चे चॉकलेट खाल्ल्याने आजार होण्याचे निरीक्षण...तक्रारीनंतर कंपनीने घेतला हा मोठा निर्णय

UK Food Safety Agency : किंडर सरप्राइज (Kinder Surprise) ही चॉकलेट किंवा उत्पादने जगभरातील मुलांमध्ये खूप लोकप्रिय आहेत. ही उत्पादने बनवणाऱ्या फेरेरो (Ferrero) या कंपनीने आपले एखादे उत्पादन आरोग्यासाठी सुरक्षित न वाटल्याने ते बाजारातून काढून घेण्याचा निर्णय घेतला आहे. खरं तर, इंग्लंडच्या (UK) फूड सेफ्टी एजन्सीने (FSA) ग्राहकांना विशिष्ट किंडर ब्रँड उत्पादने वापरणे टाळण्याचा सल्ला दिला आहे.

Salmonella disease spreading after eating Kinder Surprise products
किंडर सरप्राइज खाल्ल्याने पसरतोय रोग, इंग्लंडच्या यंत्रणेला दिला इशारा  |  फोटो सौजन्य: YouTube
थोडं पण कामाचं
  • इंग्लंडच्या अन्न सुरक्षा एजन्सी एफएसएने दिली वॉर्निंग
  • फेरेरो कंपनीने काय म्हटले आहे
  • आपण उत्पादन खरेदी केले असल्यास काय करावे

Kinder Surprise Update : लंडन : लहान मुलांना चॉकलेट (Chocolates) खूप आवडतात. त्यातही काही ब्रॅंड्स तर खूपच लोकप्रिय असतात. किंडर सरप्राइज (Kinder Surprise) ही चॉकलेट किंवा उत्पादने जगभरातील मुलांमध्ये खूप लोकप्रिय आहेत. मात्र आता या संदर्भात धक्कादायक माहिती समोर आली आहे. प्रसार माध्यमांमधून समोर आलेल्या माहितीनुसार ही उत्पादने बनवणाऱ्या फेरेरो (Ferrero) या कंपनीने आपले एखादे उत्पादन आरोग्यासाठी सुरक्षित न वाटल्याने ते बाजारातून काढून घेण्याचा निर्णय घेतला आहे. युरोपात किंडर सरप्राइजच्या उत्पादनांसंदर्भात काही प्रश्न उपस्थित झाले आहेत. खरं तर, इंग्लंडच्या (UK) फूड सेफ्टी एजन्सीने (FSA) ग्राहकांना विशिष्ट किंडर ब्रँड उत्पादने वापरणे टाळण्याचा सल्ला दिला आहे. युरोपातील अन्न सुरक्षा यंत्रणेला किंडर जॉयची खाद्य उत्पादने आणि साल्मोनेला या जीवाणूच्या संसर्गाचा प्रसार यांच्यातील संबंध असल्याचा संशय आहे. (UK food safety agency warns about disease spreading after eating Kinder Surprise products)

अधिक वाचा : Elon Musk update | सोशल मीडियासाठी महत्त्वाची बातमी...इलॉन मस्कची ट्विटरच्या संचालक मंडळावर नियुक्ती

इंग्लंडच्या अन्न सुरक्षा यंत्रणेची वॉर्निंग

प्रसार माध्यमांमधून आलेल्या वृत्तानुसार UKHSA आणि युरोपमधील इतर काही आरोग्य एजन्सींनी केलेल्या तपासणीत कंपनीची उत्पादने आणि यूकेमध्ये पसरणारे साल्मोनेला संसर्ग यांच्यातील संबंध आढळला आहे. या संदर्भात, फेरेरो कंपनीने खबरदारी म्हणून आपले उत्पादन मागे घेतले आणि तपास सुरू केला. परत मागवलेले उत्पादन त्याच कारखान्यात तयार केले जाते आणि बाकीच्या किंडर उत्पादनांवर सध्या याचा परिणाम झालेला नाही.

अधिक वाचा : Gold Price Today | जबरदस्त संधी ! करा स्वस्तात सोने खरेदी...आज घसरणीने पुन्हा स्वस्त झाले सोने, पाहा ताजा भाव

फेरेरो कंपनीने काय म्हटले आहे?

किंडर सरप्राइज उत्पादन निर्माता फेरेरोने आपले उत्पादन मागे घेण्याची घोषणा केली आहे. सॅल्मोनेला जीवाणूचा संसर्ग होण्याच्या शक्यतेमुळे कंपनीने आपल्या उत्पादन किंडर सरप्राईजच्या काही बॅच परत मागवत असल्याचे म्हटले आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, 11 जुलै 2022 ते 7 ऑक्टोबर 2022 दरम्यान बेस्ट बिफोर डेट असलेले किंडर सरप्राईजचे 20 ग्रॅमचे पॅकेट फक्त मागे घेतले जात आहे. भारतात फेरेरो कंपनीचे किंडर जॉय विकले जाते मात्र याबाबत कंपनीने स्पष्टीकरण देताना म्हटले आहे की सध्या गुंणवत्तेबाबत निर्माण झालेला प्रश्न हा किंडर सरप्राइज या उत्पादनांबद्दल असून ते त्याचे उत्पादन बेल्जियममध्ये होेते. तर किंडर जॉय ज्याची विक्री भारतात केली जाते, त्याचे उत्पादन मात्र बारामती येथील फेरेरोच्या निर्मिती प्रकल्पात केली जाते आहे. त्याचबरोबर किंडर जॉयच्या गुणवत्तेसंदर्भात कोणताही प्रश्न किंवा आक्षेप निर्माण झालेला नाही. स्थानिक नियामकांच्या निकषानुसारच याचे उत्पादन केले जात आहे. किंडर सरप्राइज आणि किंडर जॉय ही फेरेरोचीच उत्पादने आहेत मात्र ती पूर्णपणे वेगळी उत्पादने आहेत.

आपण उत्पादन खरेदी केले असल्यास काय करावे?

युरोपात किंडर सरप्राईजबाबत कंपनीने सांगितले आहे की, जर तुम्ही उत्पादन घेतले असेल तर तुम्ही ते खाऊ नका. याबद्दल फेरेरो कंझ्युमर केअरलाइनशी संपर्क साधून तुम्ही तुमचे पैसे परत मिळवू शकता. किंडर जॉयची मुख्य कंपनी फेरेरोने सांगितले की, लोकांना माहिती देण्यासाठी किरकोळ स्टोअरमध्ये उत्पादनाविषयी नोटीस लावल्या जातील. उत्पादने का परत मागवली जात आहेत हे या नोटिसांमध्ये स्पष्ट केले जाईल. तुम्ही ही उत्पादने खरेदी केली असल्यास पुढे काय करावे हे देखील तुम्हाला सांगितले जाईल.

अधिक वाचा : Elon Musk Investment | इलॉन मस्कचा मास्टर स्ट्रोक, गुपचूप विकत घेतली या कंपनीची मोठी हिस्सेदारी, बातमी येताच शेअरमध्ये तुफान तेजी...

साल्मोनेला कसा रोखायचा?

तज्ज्ञांच्या मते साल्मोनेला जीवाणूचा संसर्ग कच्चे मांस, पाश्चर न केलेले दूध, अंडी, गोमांस किंवा त्यापासून बनवलेल्या वस्तूंमधून पसरतो. याशिवाय, साल्मोनेला दूषित पाणी किंवा अन्न खाल्ल्याने देखील तुम्हाला या जीवाणूचा संसर्ग होऊ शकतो. हे जीवाणू लहान मुले, वृद्ध आणि कमकुवत प्रतिकारशक्ती असलेल्या लोकांसाठी अधिक धोकादायक ठरू शकतात. त्याचा संसर्ग साधारणपणे ४ ते ७ दिवस टिकतो. लक्षणांबद्दल बोलायचे झाले तर त्यात पोटदुखी, मळमळ, उलट्या, जुलाब, ताप, थंडी वाजून येणे, डोकेदुखी, स्टूलमध्ये रक्त येणे यांचा समावेश होतो.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी