Union Budget 2023 Live Streaming: अर्थसंकल्प कधी आणि कुठे पाहता येईल LIVE, जाणून घ्या सर्व माहिती...

Budget 2023 live streaming: देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारी 2023 रोजी आर्थिक वर्ष 2023-24 चा अर्थसंकल्प सादर करतील. या अर्थसंकल्पाचं लाईव्ह स्ट्रिमिंग कुठे पाहता येईल?

Union Budget 2023 Live Streaming when and where to watch check updates in marathi
Union Budget 2023 Live Streaming: अर्थसंकल्प कधी आणि कुठे पाहता येईल LIVE, जाणून घ्या सर्व माहिती... 

Union Budget 2023: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Union Finance Minister Nirmala Sitharaman) 1 फेब्रुवारी 2023 रोजी अर्थसंकल्प सादर करतील. आर्थिक वर्ष 2023-24 साठीचा हा अर्थसंकल्प (Budget 2023) सामान्यांना दिलासा देणारा असेल की झटका देणारा असेल? यावरुन अनेक अंदाज वर्तवण्यात येत आहे. अर्थसंकल्प सकाळी 11 वाजता सादर करण्यात येणार आहे. या अर्थसंकल्पाकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. मात्र, अर्थसंकल्प सादर होत असताना आपण घरी टीव्ही पाहत नसणार त्यामुळे अर्थसंकल्पाची सविस्तर माहिती, अपडेट्स कुठे मिळणार असा प्रश्न अनेकांना पडला असेल. तुम्हालाही असाच प्रश्न पडला असेल तर काळजी करू नका. तुम्ही आपल्या मोबाइल, कम्प्युटर, लॅपटॉपवर अर्थसंकल्पाचं थेट प्रक्षेपण पाहू शकता.

When and Where to watch budget 2023 live : कसे आणि कुठे पाहता येईल अर्थसंकल्पाचं लाईव्ह

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन सकाळी 11 वाजता यूनियन बजेट 2023 सादर करण्यास सुरुवात करतील. तुम्ही कोणत्या माध्यमातून बजेटचं लाईव्ह स्ट्रिमिंग पाहू शकता त्यावर एक नजर टाकुयात...

टाइम्स नाऊ मराठीवर Budget 2023 LIVE updates

तुम्हाला यूनियन बजेट 2023 चं थेट लाईव्ह स्ट्रिमिंग पहायचं असेल तर कुठेही जाण्याची गरज नाही. तुम्ही आपल्या टीव्ही समोर बसलेले नसले तरी फोनवर लाईव्ह नक्कीच पाहू शकता. टाइम्स नाऊ मराठीच्या वेबसाईट https://www.timesnowmarathi.com/ वर तुम्ही बजेटच्या संदर्भातील सर्व अपडेट्स मराठीत पाहू शकता.

हे पण वाचा : बकरीचे दूध प्या आणि लैंगिक क्षमता वाढवा

Budget 2023 LIVE streaming

भारत सरकारच्या https://www.indiabudget.gov.in/ या अधिकृत वेबसाईटवर तुम्ही बजेटचं भाषण लाईव्ह पाहू शकता. बजेट सत्राचं थेट प्रसारण संसद टीव्हीवर सुद्धा लाईव्ह पाहू शकता.

Budget 2023 LIVE streaming on Youtube

बजेट 2023 सादरीकरण सकाळी 11 वाजता सुरू होईल. याचं थेट प्रक्षेपण तुम्ही youtube वर सुद्धा पाहू शकता. त्यासाठी https://www.youtube.com/embed/5EDEtqLIs9I या अधिकृत लिंकवर क्लिक करा.

हे पण वाचा : केशर पाणी पुरुषांना देतो खास बूस्टर, वाचा फायदे

Union budget 2023 on Mobile app

बजेटच्या संदर्भातील सर्व अपडेट्स पाहण्यासाठी तुम्ही मोबाइल अ‍ॅप सुद्धा डाऊनलोड करु शकता. त्यासाठी https://www.indiabudget.gov.in/downloadapp.php या लिंकवर क्लिक करा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी