5G Spectrum : मोठी बातमी! लवकरच तुमच्या दारी 5 जी सेवा...अखेर स्पेक्ट्रम लिलावाला केंद्राची मंजुरी!

5G services : अखेर टेलिकॉम कंपन्यांची प्रतिक्षा संपली आहे. पंतप्रधान मोदींच्या (PM Narendra Modi) अध्यक्षतेखाली आज म्हणजेच 14 जून रोजी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत 5G स्पेक्ट्रमबाबत (5 G Spectrum) मोठा निर्णय समोर आला आहे. कॅबिनेटने 5G स्पेक्ट्रमच्या लिलावाला (5G Auction) मंजुरी दिली आहे. इतकंच नाही तर पुढच्या आठवड्यात दूरसंचार विभाग (DOT) लिलावासाठी अर्ज मागवण्यास सुरुवात करेल.

5G Spectrum Auction
5जी स्पेक्ट्रमचा लिलाव 
थोडं पण कामाचं
  • 5 जी सेवांच्या स्पेक्ट्रम लिलावाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजूरी
  • पुढील महिन्यात 5जी स्पेक्ट्रमचा होणार लिलाव
  • लिलावात स्पेक्ट्रमची एकूण किंमत 5 लाख कोटी रुपये असणार

5G Spectrum Auction : नवी दिल्ली : अखेर टेलिकॉम कंपन्यांची प्रतिक्षा संपली आहे. पंतप्रधान मोदींच्या (PM Narendra Modi) अध्यक्षतेखाली  14 जून रोजी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत 5G स्पेक्ट्रमबाबत (5 G Spectrum) मोठा निर्णय समोर आला आहे. कॅबिनेटने 5G स्पेक्ट्रमच्या लिलावाला (5G Auction) मंजुरी दिली आहे. इतकंच नाही तर पुढच्या आठवड्यात दूरसंचार विभाग (DOT) लिलावासाठी अर्ज मागवण्यास सुरुवात करेल. लिलावात स्पेक्ट्रमची एकूण किंमत 5 लाख कोटी रुपये ठेवण्यात आली आहे. (Union Cabinet approves auction for 5G telecom services, check the details)

अधिक वाचा : IPL Media Rights: क्रिकेट आणि पैशांची खाण...बीसीसीआयच्या तिजोरीत 46,000 कोटींची भर...आयपीएल लिलाव सुरूच

5G स्पेक्ट्रमचा लिलाव होणार 

खरे तर दूरसंचार कंपन्या 5जी स्पेक्ट्रमचा लिलाव करण्याची मागणी बऱ्याच दिवसांपासून करत होत्या. सरकारकडून ही मंजुरी मिळाल्यानंतर पुढील महिन्यात 5G स्पेक्ट्रमचा लिलाव सुरू होणार असल्याचे सांगण्यात येते आहे. तुमच्या माहितीसाठी सरकारने 9 स्पेक्ट्रमचा लिलाव करण्याची योजना आखली आहे आणि हा लिलाव 20 वर्षांसाठी असेल. या अंतर्गत 600, 700, 800, 1,800, 2,100, 2,300 आणि 2,500 MHz बँडचा लिलाव होणार आहे.

हे लक्षात घेण्यासारखे आहे की लिलावासाठी स्पेक्ट्रमची एकूण किंमत 5 लाख कोटी रुपये ठेवण्यात आली आहे. सरकार लवकरच 5G सेवा सुरू करू इच्छिते आहे.

अधिक वाचा : Ads for online betting : ऑनलाइन सट्टेबाजीला प्रोत्साहन देणाऱ्या जाहिरातींच्या विरोधात केंद्र सरकारच्या सूचना जारी

ट्रायची 20 वर्षांच्या वैधतेवर सहमती

तुमच्या माहितीसाठी दूरसंचार विभागाने ( DoT) लिलावासाठी स्पेक्ट्रमच्या 20 वर्षांच्या वैधतेच्या कल्पनेशी सहमती दर्शवली आहे. कारण TRAI ने 20 वर्षांच्या आधारावर राखीव किंमतीची गणना केली आहे. एप्रिलच्या सुरुवातीला, 5G शी संबंधित शिफारशींमध्ये, भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (TRAI) म्हटले होते की संबंधित बँडच्या संदर्भात 30 वर्षांसाठी स्पेक्ट्रम वाटपाची राखीव किंमत 20 वर्षांसाठीच्या स्पेक्ट्रम वाटपाच्या राखीव किंमतीच्या 1.5 पट इतकी असली पाहिजे.  म्हणजेच दूरदर्शननेही यावर सहमती दर्शवली आहे.

अधिक वाचा : Gold-Silver Rate Today, 14 June 2022: सोन्याच्या भावात मोठी घसरण, मजबूत डॉलर आणि मंदीच्या भीतीने सराफा बाजारावर दबाव

स्वदेशी तंत्रज्ञानाने 5G झाले विकसित 

दूरसंचार राज्यमंत्री देवुसिंह चौहान यांनी या महिन्यात सांगितले होते, 'भारत सरकार या वर्षी ऑगस्टपर्यंत स्वदेशी तंत्रज्ञानाने विकसित 5G तंत्रज्ञान सुरू करू शकते.' खरं तर, त्यांनी ही टिप्पणी जिनिव्हा येथे आयटीयू या UN संस्थेने आयोजित केलेल्या वर्ल्ड समिट ऑफ इन्फॉर्मेशन सोसायटी (WSIS) 2022 मध्ये बोलताना केली. राज्यमंत्री म्हणाले, 'सरकार दूरसंचार तंत्रज्ञानाच्या विकासासाठी संशोधन आणि विकास निधी सुरू करते आहे. महत्त्वाचे म्हणजे, IT प्रमुख TCS आणि सरकारी मालकीची  CDoT ही दूरसंचार संशोधन संस्था स्वदेशी पद्धतीने 5G तंत्रज्ञान विकसित करण्यात गुंतलेली आहेत.

अलीकडेच केंद्र सरकराने 5जी सेवांची चाचणी पूर्ण झाल्याचे जाहीर केले होते. तेव्हापासून सर्वसामान्य नागरिक आणि टेलीकॉम कंपन्यांना 5जी स्पेक्ट्रमच्या लिलाव प्रक्रियेची प्रतिक्षा होती. या लिलाव प्रक्रियेनंतर देशात 5जी सेवांची सुरूवात होणार आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी