5G Services Launch Date: 5G सेवा कधी सुरू होणार? खुद्द केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितली ही तारीख...

Telecom Sector : मागील काही दिवसांपासून सर्वजण 5G दूरसंचार सेवांबद्दल चर्चा करत आहेत. देशभरात नवी आधुनिक 5G दूरसंचार सेवा (5G telecom service) कधी सुरू होणार याबद्दल उत्सुकता आहे. आता 5G स्पेक्ट्रम लिलावाची प्रक्रियादेखील पूर्ण झाली असून दूरसंचार कंपन्यादेखील तयारीत आहेत. त्यामुळे देशात 5G मोबाइल सेवा सुरू होण्याची लोक आतुरतेने वाट पाहत आहेत. याच पार्श्वभूमीवर दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnav)यांनी मोठी माहिती दिली आहे. लवकरच ही सेवा देशातील सर्व शहरांमध्ये उपलब्ध होईल.

5G Services Launch
5G सेवा 
थोडं पण कामाचं
  • देशभरात नवी आधुनिक 5G दूरसंचार सेवा (5G telecom service) कधी सुरू होणार याबद्दल उत्सुकता आहे
  • दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnav) यांनी 5G मोबाइल सेवा सुरू होण्याबद्दलची तारीख दिली आहे
  • दूरसंचार कंपन्या या दिशेने काम करत असून इन्स्टॉलेशनचे काम सुरू आहे.

5G Services Launch Update : नवी दिल्ली : मागील काही दिवसांपासून सर्वजण 5G दूरसंचार सेवांबद्दल चर्चा करत आहेत. देशभरात नवी आधुनिक 5G दूरसंचार सेवा (5G telecom service) कधी सुरू होणार याबद्दल उत्सुकता आहे. आता 5G स्पेक्ट्रम लिलावाची प्रक्रियादेखील पूर्ण झाली असून दूरसंचार कंपन्यादेखील तयारीत आहेत. त्यामुळे देशात 5G मोबाइल सेवा सुरू होण्याची लोक आतुरतेने वाट पाहत आहेत. याच पार्श्वभूमीवर दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnav)यांनी मोठी माहिती दिली आहे. केंद्रीय मंत्र्यांनी सांगितले की, ऑक्टोबर 2022 च्या दुसऱ्या आठवड्यात देशात 5G मोबाइल सेवा सुरू होईल. खरंतर अश्विनी वैष्णव यांनी सांगितले आहे की 12 ऑक्टोबर 2022 पर्यंत देशात 5G मोबाइल सेवा सुरू केली जाईल. त्यानंतर ही सेवा देशातील सर्व लहान आणि मोठ्या शहरांमध्ये विस्तारित केली जाईल. त्यामुळे 5G सेवांबद्दलची प्रतिक्षा आता लवकरच संपणार आहे. (Union Minister Ashwini Vaishnav told date of 5G launch)

अधिक वाचा : Chandrapur Accident : मृत्यूचा Selfie! एका क्लिकच्या नादात तलावात बुडून दोघांचा मृत्यू

केंद्रीय मंत्र्यांनी 5G बद्दल दिली  माहिती 

दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की 5G सेवा ही सर्वसामान्यांना परवडणारी आहे याची आम्ही खातरजमा करू. म्हणजेच प्रत्येक स्तरावरील ग्राहकांसाठी ही सेवा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाईल. अश्विनी वैष्णव पुढे म्हणाले की, “आम्ही येत्या दोन ते तीन वर्षांत 5G सेवा देशाच्या कानाकोपऱ्यात उपलब्ध होण्याची अपेक्षा आम्हाला आहे. 5G मोबाईल सेवा लवकरात लवकर सुरू करण्याचा आमचा प्रयत्न आहे. दूरसंचार कंपन्या या दिशेने काम करत असून इन्स्टॉलेशनचे काम सुरू आहे. 12 ऑक्टोबरपर्यंत 5G सेवा सुरू होईल आणि त्यानंतर देशभरातील शहरे या सेवेशी जोडली जातील.

अधिक वाचा : Most expensive electric car : ही आहे 245 कोटींची भारतातील सर्वात महागडी इलेक्ट्रिक कार

स्पेक्ट्रमसंदर्भात सुसंवाद आवश्यक

केंद्रीय मंत्री पुढे म्हणाले की, '5G सेवांसाठी स्पेक्ट्रम हार्मोनायझेशन प्रक्रिया म्हणजे स्पेक्ट्रम सुसंवादाची प्रक्रिया महत्त्वाची आहे. या अंतर्गत, सर्व दूरसंचार सेवा कंपन्यांच्या संमतीने एका बँडमध्ये उपलब्ध असलेल्या रेडिओ लहरींचा समूह एका संलग्न ब्लॉकमध्ये आणला जातो. स्पेक्ट्रम हार्मोनायझेशनमुळे कंपन्यांची कार्यक्षमता वाढते कारण ते त्यांच्यासाठी उपलब्ध रेडिओ लहरींचा भाग एकाच बँडमध्ये एकत्र आणतात. हे काम कंपन्यांच्या संमतीने केले जाते.

अधिक वाचा : कोरोना, मंकीपॉक्स आणि एचआयव्ही हे तिन्ही आजार एकाचवेळी झाले, उपचार सुरू

सरकारला दीड लाख कोटी रुपयांचा महसूल 

देशातील दूरसंचार स्पेक्ट्रमचा आतापर्यंतचा सर्वात मोठा लिलाव या काही दिवसांपूर्वी पूर्ण झाला. 4.3 लाख कोटी रुपयांचे एकूण 72 GHz स्पेक्ट्रम विकून सरकारला 1.5 लाख कोटी रुपयांची विक्रमी बोली मिळाली. यामध्ये 51,236 मेगाहर्ट्झ म्हणजेच 71 टक्के स्पेक्ट्रम विकले गेले. तुमच्या माहितीसाठी लिलावाच्या पहिल्याच दिवशी सरकारला मोठा नफा झाला होता.

भारातत सध्या तीन कंपन्या 5G सेवा पुरवण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. त्यात jरिलायन्स जिओ, एअरटेल आणि व्होडाफोन आयडिया या त्या तीन कंपन्या आहे. यापैकी जिओ कंपनीकडून सर्वप्रथम ही सेवा पुरवायला सुरुवात होईल, अशी चिन्हे आहे. 5G स्पेक्ट्रमच्या खरेदीत रिलायन्स ही सर्वात मोठी कंपनी होती. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी