पीएमसीच्या साडेआठ लाख खातेदारांना मिळाले बँकेत अडकलेले पैसे

Unity Small Finance Bank pays Rs 3800 crore to 8.5 lakh PMC Bank depositors : पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेच्या (पीएमसी बँक) आठ लाख ४७ हजार ६०६ खातेदारांना त्यांचे बँकेत अडकलेले पैसे परत मिळाले.

Unity Small Finance Bank pays Rs 3800 crore to 8.5 lakh PMC Bank depositors
पीएमसीच्या साडेआठ लाख खातेदारांना मिळाले बँकेत अडकलेले पैसे  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • पीएमसीच्या साडेआठ लाख खातेदारांना मिळाले बँकेत अडकलेले पैसे
  • पीएमसीच्या खातेदारांना ३७९१.५५ कोटी रुपये मिळाले
  • आठ लाख ४७ हजार ६०६ खातेदारांना त्यांचे बँकेत अडकलेले पैसे परत मिळाले

Unity Small Finance Bank pays Rs 3800 crore to 8.5 lakh PMC Bank depositors : मुंबई : पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेच्या (पीएमसी बँक) आठ लाख ४७ हजार ६०६ खातेदारांना त्यांचे बँकेत अडकलेले पैसे परत मिळाले. पीएमसी बँक युनिटी स्मॉल फायनान्स बँकेत विलीन झाली. यानंतर युनिटी स्मॉल फायनान्स बँकेने पीएमसीच्या खातेदारांचे बँकेत अडकलेले ३७९१.५५ कोटी रुपये त्यांच्या विलिनीकरणानंतर तयार झालेल्या नव्या खात्यात थेट जमा केले. आता हे पैसे खातेदार त्यांच्या व्यवहारांसाठी वापरू शकतील. 

केंद्र सरकारने केलेल्या कायदेशीर तरतुदीनुसार खातेदाराला बँकेतील त्याच्या पाच लाखांपर्यंतच्या ठेवींसाठी डीआयसीजीसीकडून (Deposit Insurance and Credit Guarantee Corporation - DICGC) पूर्ण रकमेची हमी मिळते. बँक बुडल्यास खातेदाराला हमी अंतर्गत असलेल्या ठेवींचे पैसे परत मिळतात. या व्यवस्थेनुसार पीएमसीच्या खातेदारांना ३७९१.५५ कोटी रुपये मिळाले. ज्या खातेदारांच्या ठेवी पाच लाखांपेक्षा जास्त रकमेच्या आहेत अशांना हमी मर्यादेपर्यंतची रक्कम थेट खात्यात परत मिळाली आहे. 

पीएमसीकडे नऊ लाख जणांचे ७८३६.७७ कोटी रुपये आहेत. यापैकी कायदेशीर तरतुदीनुसार खातेदारांना ३७९१.५५ कोटी रुपये थेट खात्यात परत मिळाले आहेत. ज्यांचे बँकेत पाच लाख रुपयांपेक्षा जास्त पैसे अडकले आहेत अशांना त्यांच्या पाच लाखांवरील अडकलेल्या पैशांपैकी जास्तीत जास्त ५० हजार रुपये २०२२-२३ हे आर्थिक वर्ष संपण्याआधी मिळतील. यामुळे पीएमसीच्या अडचणीत सापडलेल्या खातेदारांना दिलासा मिळाला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी