PAN Card updation | पॅन कार्डवरील तुमचे आडनाव बदला घरबसल्या, ही आहे ऑनलाइन प्रक्रिया

PAN-Aadhar : पॅन कार्ड किंवा परमनंट अकाउंट नंबर (PAN) हे सर्व प्रकारच्या आर्थिक व्यवहारांसाठी सर्वात महत्त्वाचे दस्तावेज आहे. हे १० अंकी अल्फान्यूमेरिक पॅन क्रमांकासह येते. त्याशिवाय आर्थिक व्यवहार होऊ शकत नाही. पॅन कार्ड एखाद्या व्यक्तीच्या किंवा कंपन्यांच्या प्राप्तिकराचे मूल्यांकन करण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व आर्थिक व्यवहारांचा मागोवा ठेवण्यासाठी प्राप्तिकर विभागास (Income Tax department) मदत करते. त्यामुळे करचुकवेगिरीची शक्यता कमी होण्यास मदत होते.

PAN card updation online
ऑनलाइन घरबसल्या बदला पॅन कार्डवरील माहिती 
थोडं पण कामाचं
  • पॅन कार्ड हे अतिशय महत्त्वाचे दस्तावेज, इन्कम टॅक्ससंदर्भात अत्यंत महत्त्वाचे
  • पॅन कार्डधारक लग्नानंतर पॅन कार्डवरील आडनाव आणि पत्ता देखील बदलू शकतात
  • पॅन कार्डमधील पत्ता किंवा आडनाव बदलण्यासाठी कार्डधारकांना ११० रुपये शुल्क द्यावे लागते

PAN card updation online : नवी दिल्ली : पॅन कार्ड किंवा परमनंट अकाउंट नंबर (PAN) हे सर्व प्रकारच्या आर्थिक व्यवहारांसाठी सर्वात महत्त्वाचे दस्तावेज आहे. हे १० अंकी अल्फान्यूमेरिक पॅन क्रमांकासह येते. त्याशिवाय आर्थिक व्यवहार होऊ शकत नाही. पॅन कार्ड एखाद्या व्यक्तीच्या किंवा कंपन्यांच्या प्राप्तिकराचे मूल्यांकन करण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व आर्थिक व्यवहारांचा मागोवा ठेवण्यासाठी प्राप्तिकर विभागास (Income Tax department) मदत करते. त्यामुळे करचुकवेगिरीची शक्यता कमी होण्यास मदत होते. पॅन कार्डमधील पत्ता किंवा आडनाव बदलण्यासाठी (Updation of PAN card)कार्डधारकांना ११० रुपये शुल्क द्यावे लागेल. (Update your PAN card online easily, check the details)

घरबसल्या सहजपणे बदला पॅनवरील माहिती

याशिवाय अनेक प्रकरणांमध्ये पॅनकार्डचा वापर ओळखपत्र म्हणूनही केला जातो. पॅन कार्डधारक लग्नानंतर पॅन कार्डवरील आडनाव आणि पत्ता देखील बदलू शकतात. बँक किंवा इतर कोणतेही आर्थिक व्यवहार, तुमचा पॅन क्रमांक देणे अनिवार्य आहे. तथापि, काही वेळा तुमच्या पॅन कार्डमध्ये आडनाव बदलण्यासारखे बदल करावे लागतात. येथे आम्ही तुम्हाला घरबसल्या पॅन कार्डमधील आडनाव बदलण्याची संपूर्ण प्रक्रिया देत आहोत.

पॅन कार्डमध्ये आडनाव बदलण्याची प्रक्रिया-

  1. >> सर्वप्रथम नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड https://nsdl.co.in/ च्या वेबसाइटवर जा.
  2. >> 'करेक्शन इन एक्सिस्टिंग पॅन' हा पर्याय निवडा.
  3. >> Category Type पर्याय निवडा.
  4. >> कागदपत्रे योग्य नाव आणि अचूक स्पेलिंगसह जोडा.
  5. >> पत्ता किंवा आडनाव बदलण्यासाठी कार्डधारकांना ११० रुपये शुल्क द्यावे लागेल.
  6. >> NSDL पत्त्यावर सबमिट पर्यायावर क्लिक करा / इन्कम टॅक्स पॅन सर्व्हिसेस UNIT (NSDL e-Governance Infrastructure Limited द्वारे व्यवस्थापित) वर अर्ज पाठवा.
  7. >> अपडेट केलेले पॅन कार्ड अर्ज केल्याच्या तारखेपासून ४५ दिवसांच्या आत नोंदणीकृत पत्त्यावर पाठवले जाईल.

३१ मार्चपर्यंत शेवटची संधी

आधार कार्डसोबत पॅन कार्ड लिंक करण्याची शेवटची तारीख ३१ मार्च २०२२ आहे. ३१ मार्चच्या अंतिम मुदतीपर्यंत असे झाल्यास पॅन कार्ड अवैध किंवा बेकायदेशीर होणार नाही. जे पॅन कार्ड आणि आधार लिंक करणार नाहीत त्यांना 1000 रुपये दंड भरावा लागू शकतो. यासाठी आयकर कायद्यात नवीन कलम 234H जोडण्यात आले आहे. पुढे, प्राप्तिकर कायदा १९६१ च्या कलम 272N अन्वये, जर त्या व्यक्तीने अवैध पॅन कार्ड दाखवले तर, मूल्यांकन अधिकारी अशा व्यक्तीला १०,००० रुपये दंड भरण्याचे आदेश देऊ शकतात.

पॅन-आधार लिंक न झाल्यास येतील अडचणी

पॅन-आधार लिंक न केल्यामुळे अनेक प्रकारच्या आर्थिक समस्या येऊ शकतात, ज्याचा सामना पॅनकार्डधारकाला करावा लागू शकतो. जर ही दोन कागदपत्रे जोडली गेली नाहीत तर पॅन अवैध होईल आणि त्याच्याशी संबंधित सर्व कामे थांबतील. यामुळे, म्युच्युअल फंड शेअर्समध्ये करता येणार नाहीत, ते कोणतेही नवीन बँक खाते उघडू शकणार नाहीत किंवा जुन्याचे केवायसी करू शकणार नाहीत. या प्रकारच्या कामासाठी वैध पॅन कार्ड आवश्यक आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी