UPI Payment | आता युपीआय पेमेंटला मोजावे लागणार शुल्क, १ एप्रिलपासून बदलणार नियम

UPI Payment Charges: UPI पेमेंट करणाऱ्यांना मोठा धक्का! 1 एप्रिलपासून अशा व्यवहारांवर PPI चार्जेस भरावे लागतील, जाणून घ्या

UPI Payment | आता युपीआय पेमेंटला मोजावे लागणार शुल्क, १ एप्रिलपासून द्यावे लागणार इतके पैसे
UPI Payment Rules Changing from 1st April  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • UPI पेमेंटचे नियम 1 एप्रिलपासून बदणार
  • युपीआय पेमेंटला मोजावे लागणार शुल्क
  • UPI पेमेंटवर 1.1% इंटरचेंज फी आकारेल

UPI Payment Charges From 1st April : बदलत्या काळानुसार, युनिफाइड पेमेंट इंटरफेस म्हणजेच UPI सामान्य लोकांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. सध्या बहुतेक जण लहान आणि मोठ्या खरेदीसाठी कॅश देण्याएेवजी UPI द्वारे पेमेंट करण्यास प्राधान्य देतात. पण, नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI)ने 24 मार्च 2023 रोजी जारी केलेल्या परिपत्रकात म्हटले आहे की, UPI वरून व्यापारी व्यवहारांवर प्रीपेड पेमेंट प्रीपेड इन्स्ट्रुमेंट (PPI) शुल्क लागू केले जाईल. या अधिसूचनेनुसार, जर एखाद्या व्यक्तीने मोबाईल वॉलेटसारख्या प्रीपेड पेमेंट प्रीपेड इन्स्ट्रुमेंटद्वारे व्यापाऱ्यांना 2,000 रुपयांपेक्षा जास्त पैसे हस्तांतरित केले तर त्याला इंटरचेंज फी भरावी लागेल. विशेष म्हणजे कार्ड आणि वॉलेट PPI अंतर्गत येतात. (UPI Payment Rules Changing from 1st April)

अधिक वाचा : पीएफ वर एकेकाळी मिळत होते 12% व्याज, आता परत होणार घट ! 40 वर्षापूर्वीच्या निचांकी पातळीवर घसरला दर  


इंटरचेंज फी किती असेल

इकॉनॉमिक टाईम्समध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, एनपीसीआयच्या परिपत्रकात 2,000 रुपयांपेक्षा जास्त व्यवहारांवरच हे इंटरचेंज शुल्क आकारले जाईल. हे शुल्क साधारणपणे 2,000 रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या 1.1 टक्के असेल. विशेष म्हणजे, NPCI ने वेगवेगळ्या प्रदेशांसाठी वेगवेगळे इंटरचेंज शुल्क निश्चित केले आहे. कृषी आणि दूरसंचार क्षेत्रात सर्वात कमी इंटरचेंज फी आकारली जाईल. हे शुल्क केवळ व्यापारी व्यवहारांसाठी पेमेंट करणाऱ्या वापरकर्त्यांनाच द्यावे लागेल.

अधिक वाचा : Aadhaar Pan Link Status: तुमचा पॅन कार्ड आधारसोबत लिंक आहे की नाही, हे सेकंदात करू शकता चेक

कोणाकडून इंटरचेंज फीस आकारली जाणार 

नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन (NPCI) च्या परिपत्रकानुसार, बँक खाती आणि PPI वॉलेटमधील पीअर-टू-पीअर (P2P) आणि पीअर-टू-पीअर-मर्चंट (P2PM) व्यवहारांवर कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. 1 एप्रिलपासून हा नवीन नियम लागू केल्यानंतर, NPCI 30 सप्टेंबर 2023 पूर्वी त्याचे पुनरावलोकन करेल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी