IAS Success Story: दोनवेळा UPSC परीक्षा पास करूनही नाही बनला IAS, चौथ्यांदा मिळवलं मोठं यश

काम-धंदा
Updated Jun 25, 2019 | 15:06 IST | टाइम्स नाऊ डिजीटल

IAS Success Story: फरीदाबाद इथल्या सुमित भाटियाचं यश सर्व विद्यार्थ्यांसाठी आदर्श ठरलंय. जे विद्यार्थी यूपीएससी परीक्षा पास करत आयपीएस होण्याचं स्वप्न बघतात. त्यांना सुमितच्या यशाचं गमक उपयुक्त ठरेल. जाणून घ्या

Sumit Bhatiya
२ वेळा परीक्षा पास करूनही नव्हती मिळाली रँक, ४ मिळालं यश 

मुंबई: हरियाणाच्या फरीदाबाद येथे राहणाऱ्या सुमित भाटियानं २०१२ साली आयएएस होण्याचं स्वप्न बघितलं. चार वर्षांनंतर म्हणजेच २०१६ रोजी त्याचं हे स्वप्न पूर्ण झालं. चार वर्षे जिद्दीनं मेहनत करून त्यानं हे यश मिळवलं. इतके दिवस अभ्यासासाठी त्यानं स्वत:ला एका खोलीत कोंडून घेतलं होतं.

सुमितनं बीबीए केलंय. त्यामुळे त्याच्यासाठी यूपीएससीची तयारी करणं काही सोपी गोष्ट नव्हती. सुमितनं हळूहळू आपल्या मित्रांपासून दूर राहणं सुरू केलं आणि अभ्यासावर लक्ष केंद्रीत करण्यास सुरूवात केली. या काळात त्यानं कोणत्याही लग्नात किंवा पार्टीत हजेरी लावली नाही.

सुमितनं यूपीएससीचा पहिला अटेंप्ट २०१३ साली दिला. पहिल्या अटेंप्टमध्ये सुमितनं प्राथमिक परीक्षेत यश मिळवलं. मात्र तो मेन्स परीक्षा क्वालिफाय करू शकला नाही. पण नंतर २०१४ मध्ये त्याला पहिलं यश मिळालं. २०१४ साली सुमितला ५६१ वा रँक मिळाला. त्या रँकनुसार, सुमित इंडियन रेल्वे ट्रॅफिक सर्व्हिसला जॉईन झाला.

२०१५ मध्ये झाला IRS

यूपीएससी क्वालिफाय केल्यानंतरही सुमितनं आयएएस होण्याचं आपलं स्वप्न काही सोडलं नाही. २०१५ साली त्याने पुन्ही यूपीएससी परीक्षा दिली. २०१५ च्या परीक्षेतही त्याला यश मिळालं आणि २८० वा रँक मिळाला. आता सुमितला रँकनुसार, इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिस म्हणजेच IRS मिळाली, तिथं तो जॉईन झाला.

दोन वेळा यूपीएससी पास करूनही हवा तो रँक न मिळाल्यानं खचून न जाता सुमितनं आपला प्रयत्न सुरूच ठेवला. तिसऱ्यांदा अजून चांगली तयारी करून सुमितनं २०१६ साली पुन्हा यूपीएससीची परीक्षा दिली. यात मात्र सुमितला मनासारखं यश मिळालं आणि त्याला ५० वा रँक मिळाला. आता मात्र सुमितचं आयएएस होण्याचं स्वप्न पूर्ण झालंय.

अशी मिळाली IAS होण्यासाठीची प्रेरणा

सुमितनं एका मुलाखतीमध्ये सांगितलं की, त्याला सिव्हिल सर्व्हिस पास करण्याची प्रेरणा मित्राच्या वडिलांकडून मिळाली. सुमितच्या मित्राचे वडील आयआरएस होते. बीबीए केल्यानंतर सुमितनं कॉर्पोरेटमध्ये नोकरी केली. काही काळानंतर त्यानं आपल्या वडिलांची फर्म जॉईन केली. नंतर सुमित एमबीए करण्यासाठी फरीदाबादहून मुंबईत आला.

मुंबईत आल्यानंतर त्याची भेट मित्राच्या वडिलांसोबत झाली, जे इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिसमध्ये होते. मित्राच्या वडिलांचं कामकाज पाहून सुमितला यूपीएससी परीक्षा देण्याची प्रेरणा मिळाली. यानंतर त्यानं आपला फॅमिली बिझनेस सोडत संपूर्ण लक्ष अभ्यासावर केंद्रीत केलं.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
IAS Success Story: दोनवेळा UPSC परीक्षा पास करूनही नाही बनला IAS, चौथ्यांदा मिळवलं मोठं यश Description: IAS Success Story: फरीदाबाद इथल्या सुमित भाटियाचं यश सर्व विद्यार्थ्यांसाठी आदर्श ठरलंय. जे विद्यार्थी यूपीएससी परीक्षा पास करत आयपीएस होण्याचं स्वप्न बघतात. त्यांना सुमितच्या यशाचं गमक उपयुक्त ठरेल. जाणून घ्या
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola