Interest Rate Hike : व्याजदर वाढले! अमेरिकेतील व्याजदरात मोठी वाढ...भारतातील वाढणार?

Inflation : वाढणाऱ्या महागाईला आटोक्यात आणण्यासाठी अमेरिकन फेडने व्याजदर वाढ केली आहे. व्याजदरातील ही वाढ अपेक्षित होती. मागील काही कालावधीपासून अमेरिकन फेडरल रिझर्व्ह व्याजदरात सातत्याने वाढ करते आहे. मात्र तरीही महागाई (Inflation) कायम आहे. याआधी 21 सप्टेंबरला अमेरिकन फेडने इतकी वाढ व्याजदरात केली होती.

Interest rates
व्याजदरात वाढ 
थोडं पण कामाचं
  • अमेरिकन फेडने व्याजदर वाढवले
  • सलह चौथी व्याजदर वाढ
  • महागाई आटोक्यात येत नसल्याने चिंता

US Fed Latest : नवी दिल्ली :  अमेरिकेत पुन्हा एकदा व्याजदर वाढले आहेत. अमेरिकन फेडरल रिझर्व्हने (US Fed) व्याजदरात आणखी 75 बेसिस पॉइंटची वाढ (Interest rate hike) केली आहे. वाढणाऱ्या महागाईला आटोक्यात आणण्यासाठी अमेरिकन फेडने हे पाऊल उचलले आहे. व्याजदरातील ही वाढ अपेक्षित होती. मागील काही कालावधीपासून अमेरिकन फेडरल रिझर्व्ह व्याजदरात सातत्याने वाढ करते आहे. मात्र तरीही महागाई (Inflation) कायम आहे. याआधी 21 सप्टेंबरला अमेरिकन फेडने इतकी वाढ व्याजदरात केली होती. अमेरिकेतील अनेक घटकांच्या प्रभावामुळे मागील अनेक दशकातील सर्वाधिक महागाईचा सामना अमेरिकेला करावा लागतो आहे. सप्टेंबरअखेर आलेल्या आकडेवारीनुसार अमेरिकेतील महागाईदर 8.2 टक्क्यांवर आहे. (US fed hikes interest rates by 75 basis points)

अधिक वाचा : शिंदे गटाच्या आमदार आणि खासदारांना Y+ सुरक्षा, अमृता फडणवीसांनाही एस्कॉर्टची सुविधा

अमेरिकेतील महागाई

वाढलेल्या महागाईच्या पार्श्वभूमीवर सप्टेंबरमध्ये अमेरिकन फेडचे अध्यक्ष जेरोम पॉवेल यांनी म्हटले होते की महागाई पुन्हा 2 टक्क्यांवर आणण्यासाठी ते वचनबद्ध आहेत. अमेरिकन फेडरल रिझर्व्हच्या व्याजदर निश्चित करणाऱ्या समितीने म्हटले आहे की अलीकडील निर्देशकांनी खर्च आणि उत्पादनामध्ये माफक वाढ दर्शविली आहे. अलिकडच्या काही महिन्यांत नोकऱ्यांमध्ये वाढ झाली आहे आणि त्यामुळे बेरोजगारीचा दर कमी राहिला आहे. 

अधिक वाचा : Crop insurance 509 दिवसांपासून सुरु असलेल्या पिकविम्याच्या लढाईला अखेर यश, शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसेही होतायेत जमा

जागतिक दबाव

फेडच्या समितीने पुढे म्हटले आहे की युक्रेन-रशिया युद्धामुळे प्रचंड आर्थिक अडचणी येत आहेत. युद्ध आणि इतर घटनांमुळे महागाईवर आणि जागतिक अर्थव्यवस्थेवर मोठा प्रभाव पडतो आहे. समितीने म्हटले आहे की दीर्घकाळापर्यंत जास्तीत जास्त रोजगार आणि महागाई 2 टक्के दराने साध्य करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. आपले निश्चित उद्दिष्ट साध्य करण्यासाठी व्याजदरात वाढ करण्यात आल्याचे फेडचे म्हणणे आहे.

अमेरिकन फेडची आजची व्याजदरात वाढ ही सलग चौथी वाढ आहे. मात्र तरीही फेडला महागाईवर अपेक्षित असलेले नियंत्रण मिळालेले नाही. महागाई कमी झाल्याची कोणतीही चिन्हे नाहीत. त्यामुळे सर्वत्र अमेरिकेत मंदी येण्याची भीती व्यक्त केली जाते आहे. यासंदर्भात भाष्य करताना जागतिक बॅंकेने म्हटले होते की जगभरातील सर्वच मध्यवर्ती बॅंका व्याजदरात वाढ करत आहेत. महागाईला आटोक्यात ठेवण्याचे हे प्रयत्न आहेत. यामुळे पुढील वर्षी जगात मंदी येऊ शकते. त्याचबरोबर उदयोन्मुख बाजारपेठांमध्ये आणि विकसनशील अर्थव्यवस्थांमध्ये आर्थिक संकट येऊ शकते. 

अधिक वाचा : Nashik: शिवशाही पेटली, नाशिकध्ये पुन्हा बर्निंग बसचा थरार; 45 प्रवासी बचावले

रिझर्व्ह् बॅंकेची महत्त्वाची बैठक

रिझर्व्ह बॅंकेच्या पतधोरण समितीचीदेखील याच संदर्भात बैठक सुरू असून भारतातदेखील व्याजदर वाढीची अपेक्षा व्यक्त करण्यात येते आहे. आज आरबीआयच्या पतधोरण समितीची बैठक होते आहे. आजच्या या महत्त्वाच्या बैठकीला महागाईसंदर्भात लक्ष्य चुकण्याची कारणे सांगावी लागतील. CPI महागाई 2022 च्या पहिल्या 9 महिन्यांत सुमारे 6 टक्के होती आणि सप्टेंबरमध्ये ती 7.4 टक्के होती. रिझर्व्ह बँकेलाही महागाई 6 टक्क्यांच्या खाली आणण्यासाठी ब्ल्यू प्रिंट द्यावी लागेल. भारतातील व्याजदर आणि महागाईसंदर्भात पुढील धोरणासंदर्भात आरबीआयला भाष्य करावे लागेल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी