Hotel Booking Tips : हॉटेलमध्ये मुक्काम करताना खोलीत शिरताच करा या 5 गोष्टी...नाहीतर आयुष्यभर पश्चाताप

Hotel Tips : अनेकदा पर्यटनाला जातानाच हॉटेलचे आगाऊ बुकिंग (Hotel Booking) केले जाते. त्यामुळे एखाद्या ठिकाणी पोचल्यावर हॉटेल शोधण्याची चिंता राहत नाही. हॉटेल बुकिंग आणि तेथील मुक्काम हा प्रत्येकवेळी सुखदच असेल असे नाही. अनेकदा काही लोकांसाठी हॉटेलमधील मुक्काम हा एखाद्या दु:स्वप्नाप्रमाणे ठरतो. हॉटेलमधील मुक्कामासंदर्भातील महत्त्वाचे मुद्दे आणि टिप्स जाणून घ्या.

Hotel Booking Tips
हॉटेल बुकिंग टिप्स  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • अनेक लोक कुटुंबासह भारतात किंवा परदेशात पर्यटनासाठी जातात
  • अनेकदा पर्यटनाला जातानाच हॉटेलचे आगाऊ बुकिंग केले जाते.
  • हॉटेलमधील मुक्काम अधिक सुखकारक आणि सुरक्षित करण्यासाठी वापरा या टिप्स

Hotel Booking Tips: नवी दिल्ली : भारतीयांमध्ये पर्यटनाचे प्रमाण वाढले आहे. अनेक लोक कुटुंबासह भारतात किंवा परदेशात पर्यटनासाठी (Tourism)जात असतात. प्रवासाच्या आणि राहण्या-खाण्याच्या विविध सुविधांची विपुलता यामुळे लोकांचे पर्यटन वाढले आहे. पर्यटन क्षेत्रात त्यामुळे भरभराट देखील आली आहे. पर्यटनासाठी एखाद्या ठिकाणी गेल्यावर हॉटेलातील मुक्काम (Hotel Stay) हा स्वाभाविकच असतो. अनेकदा पर्यटनाला जातानाच हॉटेलचे आगाऊ बुकिंग (Hotel Booking) केले जाते. त्यामुळे एखाद्या ठिकाणी पोचल्यावर हॉटेल शोधण्याची चिंता राहत नाही. सध्याच्या काळात तुमच्या खिशाला परवडणाऱ्या बजेट हॉटेलपासून लक्झरी श्रेणीतील हॉटेलचे विविध पर्याय उपलब्ध आहेत. त्यामुळे तुम्ही तुमच्या खिशाचा अंदाज घेत हॉटेल बुकिंग करू शकता. मात्र हॉटेल बुकिंग आणि तेथील मुक्काम हा प्रत्येकवेळी सुखदच असेल असे नाही. अनेकदा काही लोकांसाठी हॉटेलमधील मुक्काम हा एखाद्या दु:स्वप्नाप्रमाणे ठरतो. नंतर मग पश्चातापाची वेळ येते. यासंदर्भातील महत्त्वाचे मुद्दे आणि टिप्स (Hotel Booking Tips)जाणून घ्या. याचा वापर करून तुमचा हॉटेलमधील मुक्काम अधिक सुखकारक आणि सुरक्षित करता येईल. (Use these hotel booking tips to enjoy your tourism)

अधिक वाचा - Sitting Job Side Effects: तुमचे काम बैठे आहे का? ऑफिस किंवा घरी तासनतास बसून काम केल्यास लागतील हे आजार...

हॉटेलमधील मुक्कामासंदर्भातील टिप्स-

इंटेलिजन्स किंवा छुपे कॅमेरे चेक करा

अलीकडच्या काळात एखाद्या कुटुंबाचे किंवा कपलचे खासगी फोटो किंवा व्हिडिओ बनवून त्यांचा गैरवापर करण्याचे प्रमाण वाढले आहे. हॉटेलमधील मुक्कामातील सर्वात मोठा धोका हा तेथे कॅमेराद्वारे चोरून करण्यात आलेल्या रेकॉर्डिंगशी संबंधित आहे. अनेकदा हॉटेलच्या खोलीत चोरून कॅमेरे लावलेले असतात. त्यामुळे तुम्ही हॉटेलच्या खोलीत जातातच तेथील बल्ब, घड्याळ, टीव्ही, रिमोट कंट्रोल, पंखा, बाथरूम या सर्व गोष्टी काळजीपूर्वक तपासा. तुमच्या खोलीत कोणताही छुपा कॅमेरा आहे की नाही हे तपासण्यासाठी खोलीत अंधार करा आणि तुमच्या मोबाईलचा लाईट चालू करा. यानंतर जर तुम्हाला कुठून निळा प्रकाश येताना दिसला तर समजा की तिथे छुपा कॅमेरा लावलेला आहे.

अधिक वाचा - Skin Dryness: रुक्ष त्वचेवर करा घरगुती उपाय, असं बनवा मॉइश्चुरायझर

खोलीचे बाथरुम तपासा 

आपल्या खोलीतील सर्वात खासगी जागा म्हणजे बाथरुम आणि टॉयलेट. त्यामुळे साहजिकच खोलीत शिरल्याबरोबर सर्वात आधी बाथरुम आणि टॉयलेट तपासा. बऱ्याचवेळा हॉटेलचे हाउसकीपिंग कर्मचारी खोल्यांचे बाथरूम आणि टॉयलेट व्यवस्थित साफ करत नाहीत. यातून आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. संसर्ग होण्याची शक्यता असते. परिणामी तुम्हाला अनेक प्रकारचे आजारही होऊ शकतात. बाथरूमची स्वच्छता तपासण्यासाठी, तुम्ही त्याच्या फरशीवर एक मग गरम पाणी शिंपडा. जर पाणी शिंपलड्यावर काही  रिअॅक्शन नसेल तर याचा अर्थ फरशी स्वच्छ आहे. मात्र गरम पाणी टाकल्यावर घाण दूर होत असेल तर ते व्यवस्थित साफ करण्यात आलेले नाही. 

बेडशीट आणि उशांची स्वच्छता 

आपण जिथे आराम करतो, झोपतो ती जागा म्हणजे बेड. अनेकदा खोलीतील गादीवरील चादर, उशांचे कव्हर, ब्लॅंकेट यासारख्या गोष्टी स्वच्छ नसतात. हॉटेलमध्ये पर्यटकांची रोजची ये-जा असल्याने अनेक वेळा सफाई कामगार खोल्यांच्या चादरी व ब्लँकेट साफ करण्यात निष्काळजीपणा दाखवतात. मात्र तुम्हाला या गोष्टी घाणेरड्या वाटत असतील तर हॉटेलच्या कर्मचाऱ्यांना त्या त्वरित बदलण्यास सांगा. कोणत्याही परिस्थितीत स्वच्छतेबाबत तडजोड करू नका. हे तुमच्या आरोग्यासाठी आवश्यक आहे.

अधिक वाचा - गँगवॉरमधून 22 वर्षीय तरुणाची हत्या

टीव्ही आणि एसी रिमोटची तपासणी 

अलीकडे हॉटेलच्या रुममध्ये एसी आणि टीव्ही हे असतातच. रुममध्ये असंख्य पर्यटक राहून गेलेले असतात. त्यांनी एसी आणि टीव्हीचा रिमोट कंट्रोल वापरलेला असतो. यावर जंतु किंवा बॅक्टेरियाचा संसर्ग झालेला असतो. त्यामुळे त्यातून तुम्ही आजारी पडू शकता. तुम्हाला रुमचा टीव्ही-एसी चालवायचा असेल तर ते वापरण्यापूर्वी त्यांच्या रिमोट कंट्रोलवर थोडेसे सॅनिटायझर शिंपडा. तसेच सॅनिटायझर वापरून हात स्वच्छ करा.

ग्लास-मगची स्वच्छता 

तुमच्या रुममध्ये पाणी पिण्यासाठी ग्लास किंवा मग असतात. तेदेखील अनेक लोकांनी वापरलेले असतात. वापरण्यापूर्वी तुम्ही त्यांची स्वच्छता तपासली पाहिजे. त्यातील कोणत्याही भांडीवर काही खुणा किंवा डाग दिसल्यास, हॉटेलच्या कर्मचाऱ्यांना ते ताबडतोब बदलण्यास सांगा. असे केल्याने तुम्ही संसर्गापासून स्वत:चा बचाव करू शकता.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी