Home Buying Tips: घर खरेदी करतांय? मग या गोष्टींची घ्या काळजी...नाहीतर होईल पश्चाताप

House Buying : घर ही गोष्ट नेहमीच सर्वसामान्य नोकरदारांच्या आवाक्याबाहेर असते. त्यातही घर बांधणे आणि तेही मोठ्या शहरात हे तर अलीकडच्या काळात आवाक्याबाहेरची गोष्ट झाली आहे. त्यामुळेच मग एखाद्या सोसायटीत फ्लॅट (Flat Buying) घेतला जातो. घर खरेदी करताना काही गोष्टी लक्षात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. नाहीतर तुम्हाला नंतर पश्चात्ताप करावा लागू शकतो.

House buying tips
घर विकत घेतानाच्या टिप्स 
थोडं पण कामाचं
  • घर विकत घेणे ही सर्वात महत्त्वाची खरेदी
  • घर खरेदी करताना अनेक गोष्टी महत्त्वाच्या
  • या टिप्स वापरून घरखरेदी करा फायद्याची

Real Estate Tips: नवी दिल्ली : घर विकत घेणे (House Buying) ही सर्वसामान्यांच्या आयुष्यातील महत्त्वाची गोष्ट असते. आपले स्वत:चे घर हवे असे प्रत्येकालाच वाटते आणि हे प्रत्येक व्यक्तीचे स्वप्न असते. प्रत्येकजण यासाठी प्रयत्नशील असतो. मात्र घर ही गोष्ट नेहमीच सर्वसामान्य नोकरदारांच्या आवाक्याबाहेर असते. त्यातही घर बांधणे आणि तेही मोठ्या शहरात हे तर अलीकडच्या काळात आवाक्याबाहेरची गोष्ट झाली आहे. त्यामुळेच मग एखाद्या सोसायटीत फ्लॅट (Flat Buying) घेतला जातो.  मात्र, फ्लॅट खरेदी करताना काही गोष्टी लक्षात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. नाहीतर तुम्हाला नंतर पश्चात्ताप करावा लागू शकतो. फ्लॅट खरेदी (House buying tips) करताना कोणत्या गोष्टी लक्षात घ्यायच्या ते पाहूया. (Use these important tips while buying a house or flat)

अधिक वाचा : Earthquake:देशात भूकंपाचे धक्के, दिल्ली-यूपीसह 7 राज्यांमध्ये हादरे; नेपाळमध्ये 6 जणांचा मृत्यू

घर विकत घेताना लक्षात ठेवायचे महत्त्वाचे मुद्दे -

गृहकर्जाचा अभ्यास

बहुतांश नोकरदार किंवा सर्वसामान्य लोकांना घर विकत घेताना गृहकर्ज घ्यावे लागते. यासाठी घर घेताना पैशांची आगाऊ व्यवस्था करावी. त्याचबरोबर गृहकर्ज, त्याची प्रक्रिया, तुम्ही करायचे डाऊन पेमेंट, गृहकर्जाचे व्याजदर, विविध बॅंकांच्या ऑफर, गृहकर्जाचा कालावधी, तुमचे उत्पन्न, ईएमआय यासारख्या गोष्टींची अगोदरच माहिती घ्या. या सर्व गोष्टींचा चांगला तुलनात्मक अभ्यास करा. बऱ्याचवेळा या सर्व गोष्टींचा आधीच विचार केलेला नसल्यामुळे नंतर अनेक अडचणींना आणि आर्थिक संकटाला तोंड देण्याची वेळ येते.   तुमचा गृहकर्जाचा कालावधी जितका जास्त असेल तितका  तुमचा EMI कमी असेल. मात्र तुम्हाला भरावे लागणारे एकूण व्याज जास्त असेल. 

अधिक वाचा : Colloidal silver : अरे बापरे! एका सिल्व्हर सप्लीमेंटमुळे हा माणूस झाला पूर्ण निळा

कोणत्या परिसरात घर घ्यायचे

घर नेमके कोणत्या भागात घ्यायचे हा अत्यंत महत्त्वाचा निर्णय असतो. कारण तिथे तुम्हाला पुढील आयुष्यभर राहायचे असते. घर घेण्याचा निर्णय घेण्यापूर्वी घर कुठे घ्यायचे ते ठरवा. त्या परिसरातील वाहतूक व्यवस्था, सुविधा, शाळा, रुग्णालय अशा पायाभूत सुविधांच्या सुविधांची माहिती करून घ्या. या सर्व गोष्टी तुम्हाला अनूकूल आहेत की नाही हे तपासा. ज्या सोसायटीत घर घेणार तिथे कोणत्या सुविधा आहेत, हे देखील व्यवस्थित लक्षात घ्या.  

चांगला बिल्डर

घर घेताना तुम्ही ज्या सोसायटीत घर घेणार आहेत तिचे बांधकाम करणारा बिल्डर कसा आहे याची माहिती घ्या. कारण ही तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी खरेदी असते. त्यामुळे नेहमीच गुणवत्तेला प्राधान्य द्या. त्या बिल्डरची प्रतिमा किंवा बाजारातील त्याची पत कशी आहे हे तपासा. नवीन बिल्डरकडून फ्लॅट खरेदी करण्याऐवजी, तुम्ही चांगल्या ट्रॅक रेकॉर्ड असलेल्या बिल्डरकडूनच फ्लॅट खरेदी करण्याला प्राधान्य द्या. यात थोडी जास्त किंमत मोजावी लागली तरी या व्यवहारातील विश्वासार्हता अधिक असणार आहे.

अधिक वाचा :  Nirav Modi Extradition: नीरव मोदी लवकरच भारतात येणार; लंडन उच्च न्यायालयाने फेटाळला अर्ज

विविध कागदपत्रे

तुम्ही जे घर विकत घेणार आहात, त्याच्याशी निगडीत कायदेशीर कागदपत्रांच्या बाबतीत दुर्लक्ष करू नका. अनेकदा सर्वसामान्यांना यातील बारकावे माहित नसतात. अशावेळी तुम्ही मार्गदर्शनासाठी वकिलाची मदत घेऊ शकता. कदाचित यासाठी तुम्हाला थोडे जास्त पैसे खर्च करावे लागतील. मात्र एवढा मोठा सौदा करताना ही काळजी घेण्यासाठी केलेला खर्च हा योग्यच ठरतो. भविष्यातील अनेक संकटे यामुळे टाळली जातील आणि तुम्ही निश्चिंतपणे आपला घराचा व्यवहार पूर्ण करू शकाल. 

आगामी भारतातील रिअल इस्टेटला चांगले भवितव्य दिसते आहे. येणाऱ्या काळात जमीन आणि बांधकाम साहित्याची किंमत वाढतच जाणार असल्याने रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करणेदेखील फायद्याचेच ठरणार आहे. घर विकत घेताना ते बांधकाम रेरा नोंदणीकृत आहे की नाही हे तपासा.  

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी