Investment Tips : या तीन प्रकारे करा गुंतवणूक, मंदीच्या काळातदेखील राहाल फायद्यात

Mutual Fund & Share Market : जेव्हा बाजारात प्रतिकूल परिस्थिती असते किंवा मंदीचे वारे असतात तेव्हा गुंतवणूक ही एक जोखमीचा विषय बनून बसते. मागील वर्षभरापासून भारतातच नव्हे तर जगभरातील शेअर बाजारात (Share Market) अस्थिरता आहे, चढउतार होत आहेत. परिणामी गुंतवणुकदार गोंधळून गेले आहेत. जबरदस्त वाढलेल्या महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी जगातील सर्वच प्रमुख मध्यवर्ती बॅंका व्याजदरात वाढ करत आहेत.

Investment Tips
गुंतवणुकीची सूत्रे 
थोडं पण कामाचं
  • श्रीमंत होण्यासाठी गुंतवणूक ही सर्वात महत्त्वाची गोष्ट
  • वर्षभरापासून भारतातच नव्हे तर जगभरातील शेअर बाजारात (Share Market) अस्थिरता
  • चांगल्या फायद्यासाठी कशा प्रकारे गुंतवणूक करावी

Investment Tips : नवी दिल्ली : संपत्ती निर्मितीसाठी (Wealth Creation) किंवा श्रीमंत होण्यासाठी गुंतवणूक (Investment) ही सर्वात महत्त्वाची गोष्ट असते. मात्र जेव्हा बाजारात प्रतिकूल परिस्थिती असते किंवा मंदीचे वारे असतात तेव्हा गुंतवणूक ही एक जोखमीचा विषय बनून बसते. मागील वर्षभरापासून भारतातच नव्हे तर जगभरातील शेअर बाजारात (Share Market) अस्थिरता आहे, चढउतार होत आहेत. परिणामी गुंतवणुकदार गोंधळून गेले आहेत. जबरदस्त वाढलेल्या महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी जगातील सर्वच प्रमुख मध्यवर्ती बॅंका व्याजदरात वाढ करत आहेत. परिणामी शेअर बाजारावर दबाव येतो आहे. अर्थात यात एक सकारात्मक गोष्ट म्हणजे भारत एक स्थिर अर्थव्यवस्था आहे. भारतीय बाजारपेठेत गुंतवणुकदारांना अजूनही कमाईची संधी दिसते आहे. आरबीआय, सरकार आणि कॉर्पोरेट कंपन्यांनी मिळून आतापर्यंतची परिस्थिती चांगल्या प्रकारे हाताळली आहे. मात्र तरीही तुम्ही गुंतवणूक करताना काय काळजी घेतली पाहिजे आणि कशा प्रकारे केली पाहिजे ते जाणून घ्या. (Use this options in investment amid volatile global markets)

अधिक वाचा - Diabetes Control : ही 5 हिरवी पाने मधुमेहाच्या रुग्णांसाठी आहेत वरदान...पाहा जबरदस्त फायदे

तज्ज्ञ म्हणतात की अशा स्थितीत जगात कोणतीही समस्या निर्माण झाली तर भारताचा शेअर बाजारही त्या तडाख्यातून सुटू शकत नाही. कारण सर्व जगच एकमेकाशी जोडले गेले आहे. मात्र मध्यवर्ती बॅंकांनी व्याजदर वाढीवर आणि महागाई नियंत्रणावर लक्ष केंद्रीत केले असल्यामुळे आगामी काळात इक्विटी प्रकार हा एक प्रमुख मालमत्ता प्रकार म्हणून पुढे येईल. मात्र हे केव्हा होईल हे सांगता येणार नाही. सध्यातरी बाजारात चढउतार सुरू आहेत.

जागतिक मंदीचा भारतावर विशेष परिणाम होणार नाही असे जाणकारांचे म्हणणे आहे. उलट जागतिक मंदीमुळे भारताला तेलाच्या उच्च किंमती, चालू खात्यातील तूट आणि चलनवाढ यासारख्या समस्यांना सामोरे जाण्यास मदत होईल. शेअर बाजारातील घसरणीबद्दल फारशी काळजी करण्याची गरज नाही कारण भारत जगातील सर्वात वेगाने विस्तारणाऱ्या बाजारपेठांपैकी एक आहे. रशिया-युक्रेन संघर्षानंतर युरोप आणि आशियामध्येही भू-राजकीय आव्हाने उभी राहिली आहेत. मात्र तुलनेने भारतीय बाजारांवर त्याचा कमी परिणाम झाला आहे. 

कशी कराल गुंतवणक-

डेट म्युच्युअल फंडात गुंतवणूक (Mutual Fund) आयसीआयसीआय प्रुडेन्शियल म्युच्युअल फंडाचे एमडी आणि सीईओ असलेले निमेश शाह यांच्या मते, डेट म्युच्युअल फंडाला आतापर्यंत फारशी लोकप्रियता मिळालेली नाही. मात्र गेल्या 18-20 महिन्यात या श्रेणीतील म्युच्युअल फंडांनी चांगला परतावा दिला आहे. त्यामुळे त्याविषयी आकर्षण निर्माण झाले आहे. वाढत्या महागाईमुळे आरबीआय आगामी काळात रेपो दरात आणखी वाढ करू शकते. येत्या बैठकीत रेपो दरात वाढ केली जाईल अशी आमची अपेक्षा आहे आणि यामुळे जवळपास सर्व जागतिक अर्थव्यवस्थांमध्ये तसेच भारत आणि आरबीआयसमोर महागाईचे आव्हान आहे.

अधिक वाचा - Weather Change Sickness: सावधान! बदलणारा ऋतु घेऊन येतोय ‘हे’ गंभीर आजार, असा करा बचाव

अशा परिस्थितीत, एखादी व्यक्ती जास्त व्याज असलेल्या  योजनांमध्ये आणि सतत वाढत्या कालावधीसह योजनांमध्ये गुंतवणूक करू शकते. कंपन्या कॉर्पोरेट बॉंड काढतात आि त्यामधील तुमच्या गुंतवणुकीवर व्याज दिले जाते.याशिवाय, फ्लोटिंग रेट बाँड्स म्हणजेच व्याज रूपांतरित रोखे देखील गुंतवणुकीसाठी निवडले जाऊ शकतात. आगामी काळात या प्रकारात आणखी चांगली कामगिरी करण्याची अपेक्षा आहे. गुंतवणूकदारांनी हे लक्षात ठेवले पाहिजे की डेट म्युच्युअल फंड पोर्टफोलिओमध्ये खूप महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष करू नये.

एसआयपी किंवा एसडब्ल्यूपीद्वारे गुंतवणूक

आगामी काळात शेअर बाजार अस्थिरच राहण्याची चिन्हे आहेत. अशावेळी दीर्घकालावधी डोळ्यासमोर ठेवून गुंतवणुकदारांनी एसआयपीद्वारे गुंतवणूक केली पाहिजे. जोपर्यंत फेडरल रिझर्व्ह महागाईचा सामना करण्यासाठी सर्व उपायांचा अवलंब करण्यास वचनबद्ध आहे तोपर्यंत बाजार अस्थिर राहील. इक्विटी गुंतवणुकीच्या दृष्टीकोनातून, गुंतवणुकदारांनी संतुलित पोर्टफोलिओ बनवला पाहिजे.. बूस्टर एसआयपी, बूस्टर एसटीपी, फ्रीडम एसआयपी किंवा फ्रीडम एसडब्ल्यूपी सारख्या वैशिष्ट्यांचा देखील नियोजनबद्ध, शिस्तबद्ध आणि पद्धतशीर पद्धतीने विविध आर्थिक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी विचार केला जाऊ शकतो.

अधिक वाचा - Diabetes अन् Cholesterolसह 15 आजार दूर करते 'ही' भाजी, म्हटलं जातं ऑल इन वन औषधी वनस्पती

गोल्ड-सिल्व्हर ईटीएफ आणि फंड ऑफ फंड

अनिश्चितता लक्षात घेता, सोने आणि चांदीमध्ये गुंतवणूक करण्याची अधिक चांगली संधी आहे. महागाईविरोधात हे धातून बचावाचेदेखील काम करतात. शिवाय यातून मोठा फायदादेखील होतो. यासाठी परंपरागत पद्धतीशिवाय गुंतवणुकदार ईटीएफद्वारे यामध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करू शकतात. ज्यांच्याकडे डिमॅट खाते नाही त्यांच्यासाठी सोने किंवा चांदी आणि फंड ऑफ फंड हा गुंतवणुकीचा चांगला पर्याय आहे.

सध्याच्या अस्थिर वातावरणात सकारात्मक पद्धतीने गुंतवणूक करत त्यात सातत्य ठेवल्यास फायदा नक्की होईल.

(डिस्क्लेमर : आर्थिक साक्षरता वाढवणे हाच टाइम्स नाऊ मराठीचा उद्देश आहे. बाजारातील गुंतवणूक जोखीमयुक्त असते. आम्ही कोणत्याही प्रकारची गुंतवणूक सुचवत नाही. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या आर्थिक सल्लागाराच्या मार्गदर्शनाखाली योग्य तो निर्णय घ्यावा.)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी